Wednesday, August 18, 2021

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 ऑगस्ट 2021 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 सप्टेंबर 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 

ब्रेक द चेनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना

मॉलमध्ये प्रवेश करतांना मुलांना वयाचा दाखवावा लागेल पुरावा   

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या आदेशातील मुद्दा क्र. 4 हा 4 अ म्हणून दर्शविण्यात आला आहे आणि 4 ब नुसार नि‍म्नलिखित सुधारणा अंतर्भुत करण्यात येत असल्याचे निर्देशीत केले आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 13 ऑगस्टच्या‍ आदेशातील मुद्दा क्र. 3 हा मुद्दा क्र. 3 अ म्हणून दर्शविला आहे. आणि 3 ब नुसार संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे सुधारणा 17 ऑगस्ट पासून शासनाच्या पुढील आदेशापर्यंत अंर्तभूत केल्या आहेत. तसेच आपत्ती निवारण कायदा 2005 नुसार राज्य व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष व सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशाचे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात काटेकोरपणे पालन करण्यासाठी आदेश निर्गमीत केले आहेत. 

3) शॉपिंग मॉल्स - अ) जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजे पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. परंतू शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल. तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहिल. ब) वय वर्षे 18 खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू न झाल्याने वय वर्षे 18 खालील वयोगटातील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. असे आदेश 17 ऑगस्ट रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित

5 कोरोना बाधित झाले बरे तर एकाचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 619 अहवालापैकी 7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे एक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 705 एवढी झाली असून यातील 87 हजार 994 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 51 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 660 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआरद्वारे 6 तर ॲटीजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 7 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 5 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 4, देगलूर कोविड रुग्णालय येथे 1 असे एकूण 5 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 51 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 35, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत.

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 92 हजार 768

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 89 हजार 899

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 705

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 994

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 660

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.1 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-5

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-51

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

000000

 

 

जिल्ह्यातील 83 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 83 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 19 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 13 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय लोहा या केंद्रावर प्रत्येकी 50 डोस दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, धर्माबाद, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १५ ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 45 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 6 प्राथमिक आरोग्य केद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 17 ऑगस्ट 2021 पर्यंम एकुण 9 लाख 11 हजार 329 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 18 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 7 लाख 50 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 44 हजार डोस याप्रमाणे एकुण 9 लाख 94 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 अकरावी प्रवेशाची सामाईक प्रवेश परीक्षा रद्द

प्रवेश प्रक्रियेच्या स्वतंत्र मिळणार सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- राज्य शासनाने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द केली आहे. या परीक्षा घेण्याचा शासन निर्णय अधिक्रमित केला असून दहावी निकालाच्या आधारावर 11 वीची प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत शासन स्तरावरुन स्वतंत्र सूचना देण्यात येणार आहेत. 

राज्यात सामाईक प्रवेश परीक्षचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार अर्ज स्विकारण्याची कार्यवाही करण्यात आली होती. यासंदर्भात रिट याचिकेबाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णयास अनुसरुन शासन निर्णय 11 ऑगस्ट रोजी निर्गमीत केला आहे. त्यानुसार ही सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द केली आहे. संबंधित विद्यार्थी, पालक, आदी घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले.

0000

 

बचतगटांनी योजनेच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करावी - पालकमंत्री अशोक चव्हाण

मानव विकास कार्यक्रमांतर्गत महिला शेतकरी गटांना ट्रॅक्टरचे वितरण 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- औजारे बँकेचा लाभ घेतलेल्या महिला बचतगटांनी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. मानव विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत जिल्ह्यातून 13 महिला शेतकरी गटांची निवड करण्यात आली आहे. याअनुषंगाने लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील जयकिसान महिला शेतकरी गट व मुदखेड तालुक्यातील निवघा येथील श्री स्वामी समर्थ महिला शेतकरी गटांना ट्रॅक्टरचे वितरण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते चाब्या देऊन या उपक्रमाचे लोकार्पण नांदेड येथे नुकतेच करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, आ. अमर राजुरकर , आ. बालाजीराव कल्याणकर, आ. मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) थोरात, सर्व गट प्रमुख व कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रति प्रकल्प किंमत 19 लाख 38 हजार असून 75 टक्के अनुदान महिला गटांना कृषि विभागामार्फत देण्यात येणार आहे. औजारे बँक प्रकल्पात ट्रॅक्टर, ट्रॉली, मळणीयंत्र, पेरणीयंत्र, रोटाव्हेटर, पलटी नांगर, लॅड लेव्हलर आदी औजारे व औजारांसाठी शेड याबाबी समाविष्ट आहेत. मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कृषि विभागास 2 कोटी विशेष निधी मंजूर केला आहे.

00000



 

शिकाऊ परवानाधारकांना घरबसल्या चाचणी सुविधा

पात्र वैद्यकीय व्यावसायिकांना सारथी प्रणालीवर युझरआयडी 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस शिकाऊ अनुज्ञप्ती सेवेचा लाभ घेण्याची तरतुद शासनाने केली असून अर्जदारास घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती (परवाना) चाचणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. चाचणीत उत्तीर्ण होऊन घर बसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रिंट घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही.   

मोटार वाहन कायदा व अनुषंगिक नियमात नमूद अनुज्ञप्ती विषयक कामांसाठी आवश्यक नमुना-1 (अ) हे मेडीकल प्रमाणपत्र पात्र डॉक्टरामार्फत (नोंदणीकृत एमबीबीएस वैद्यकीय व्यावसायिक किंवा त्यावरील अर्हता प्राप्त) ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत विकसित केली आहे. अर्जदारांची तपासणी संबंधीत डॉक्टारामार्फत करुन नमुना-1 (अ) अपलोड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र डॉक्टरांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन परिवहन कार्यालयामार्फत युझरआयडी प्राप्त करावाचा आहे. सर्व संबंधित वैद्यकीय व्यवसायिकांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह अनुज्ञप्ती विभाग प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून युझर आयडी प्राप्त करुन पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

000000

 

 

जुन्या वाहनांच्या नोंदणीसह थकीत पर्यावरण कर भरणे अनिवार्य 

नांदेड (जिमाका) दि. 18 : खाजगी संवर्गातील दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनाची वयोमर्यादा नोंदणीस 15 वर्षे पूर्ण झाली आहे अशा वाहनांची नोंदणी ही विधीग्राह्य राहणार नाही. या वाहनाच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे मोटार वाहन नियम 1989 अन्वये अनिवार्य केले आहे. नूतनीकरण न झालेल्या विधिग्राह्यता संपलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणी पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. 

तसेच ज्या वाहनाच्या नोंदणीस 15 वर्षे पुर्ण झाली आहेत व परिवहन संवर्गातील मालवाहतूक करणारे लोडींग ऑटो, टेम्पो, ट्रक, बसेस याची वयोमर्यादा 8 वर्षे पूर्ण झाली आहे अशा वाहनांना पर्यावरण कर भरणा न केल्यास 2 टक्के प्रती महिना व्याज आकारण्यात येते. ज्या वाहनांचा पर्यावरण कर थकीत आहे अशा वाहनधारकांनी तातडीने थकीत कराची भरणा करुन भरारी पथकाद्वारे होणारी कारवाई  टाळावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

श्वेता पोटुडे माहिती अधिकारी पदी रुजू 

वरिष्ठ लिपीक विवेक डावरे यांना निरोप तर अनिल चव्हाण, म. युसूफ रुजू   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- नांदेड जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी वर्ग 2 या रिक्त पदावर श्वेता पोटुडे या रुजू झाल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने निवड करण्यात आलेल्या श्वेता भास्करराव पोटुडे यांनी यापूर्वी नागपूर दूरदर्शन, आकाशवाणी तसेच वृत्तपत्रात काम केले आहे. हिंगोली येथून बदलीने लिपिक टंकलेखक अनिल चव्हाण व वाहन चालक म. युसूफ म. मौलाना हेही नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात रुजू झाले. वरिष्ठ लिपीक विवेक डावरे यांची बदली लातूर येथे झाल्याने त्यांना आज कार्यमुक्त करण्यात आले. 

जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी कार्यालयात रुजू झालेल्या माहिती अधिकारी श्वेता पोटुडे व लिपीक अनिल चव्हाण, वाहन चालक महमंद युसूफ यांचे स्वागत करुन कार्यास शुभेच्छा दिल्या. तर या कार्यालयातील वरिष्ठ लिपीक तथा दुरमुद्रण चालक विवेक डावरे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करुन त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप दिला. यावेळी आहरण व संवितरण अधिकारी मीरा ढास, माहिती सहायक अलका पाटील, लिपीक के. आर. आरेवार, संदेश वाहक गंगाधर निरडे उपस्थित होते.

00000




  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...