Friday, October 15, 2021

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाला बरा  

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 730 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे  1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 352 एवढी झाली असून यातील 87 हजार 679 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 1 बाधित आढळला आहे. आज जिल्ह्यातील मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आज 21  कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 44 हजार 323

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 40 हजार 778

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 352

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 679

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-17

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000


 आसना नदीवरील नवीन पुलावरुन एकमार्गी वाहतूक सुरू 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- नांदेड शहरातून भोकर फाटा-अर्धापूरकडे जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी यासह सर्व प्रकारच्या वाहनधारकांसाठी आसना नदीवरील जुना पूल पाडून नवीन बांधलेल्या पुलावरुन (छोटा पूल) एक मार्गी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबतची अधिसूचना निर्गमीत केली आहे. 

अर्धापूरकडून नांदेड शहराकडे येण्यासाठी दुचाकी, चारचाकी यासह सर्व प्रकारच्या वाहनधारकांसाठी आसना नदीवरील सध्या अस्तित्वात असलेला उंच पुलावरून एक मार्गी वाहतूक सुरु राहील. ही अधिसूचना 15 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत अंमलात राहणार आहे.    

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...