Monday, November 7, 2016

निवृत्तीवेतन, कुटुंबवेतनधारकांनी  हयात

  प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन

नांदेड , दि. 7 :- सन 2016 या वर्षाचे हयात प्रमाणपत्र कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन 1 ते 30 नोव्हेंबर 2016 या कालावधीमधील हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी , असे आवाहन कोषागार अधिकारी एम. एस. गग्गड यांनी केले आहे.

00000

बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवारी

भरती मेळाव्याचे आयोजन

नांदेड , दि. 7 :-  जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-4 चे आयोजन करण्यात आले आहे. अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारानी शुक्रवार  11 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास बिल्डींग श्रीनगर वर्कशॉप रोड नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
एसआयएस इं. लि. हैद्राबाद या कंपनीत सेक्युरिटी गार्डच्या पुरुषांसाठी 100 पदांसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, कार्यक्षेत्र हैद्राबाद राहील. वेतन दरमहा 8 ते 12 हजार रुपये दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच ग्लोसरी सॉफ्ट टेक प्रा. लि. हैद्राबाद या कंपनीत महिला व पुरुषांसाठी सेल्समनच्या 100 पदासाठी  पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. कार्यक्षेत्र हैद्राबाद राहील. वेतन दरमहा 11 हजार व  भत्ते दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष आवश्यक आहे.
ऑनलाईन सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन आयडी पासवर्ड टाकून लॉगइन व्हायचे. जॉब फेअरमध्ये जावून जॉब इन्व्हेन्टमधून जिल्हा निवडणे. नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-3 च्या उजव्या बाजूस ॲक्शनमध्ये जावून पार्टीसिपेशनला क्लिक करणे. टर्म अन्ड कंडीशनला आय ॲग्री करुन अप्लाय करणे. पुन्हा ॲक्शनवर येवून इंट्री पास काढून घेणे व हा इंट्री पास घेवूनच मेळाव्यात यावे लागेल. काही अडचण आल्यास दूरध्वनी क्र. 02462-251674 यावर संपर्क साधावा.
या मेळाव्यासाठी ऑनलाईन सहभाग, इच्छुकता दर्शविल्याशिवाय सहभागी होता येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्या उमेदवाराची नोंद झाली नाही त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची सोय शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. इंट्री पास शिवाय मेळाव्यात सहभागी होता येणार नाही. याबाबत होणारा प्रवास खर्च व इतर कोणताही खर्च दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

000000
विधान परिषद निवडणकीसाठीच्या
मतदान केंद्राना आयोगाकडून मान्यता
नांदेड , दि. 7 :- महाराष्‍ट्र विधान परिषद नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक- 2016 साठी शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. या मतदानाकरीता जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली होती. या केंद्राना भार‍त निवडणूक आयोगाने मान्‍यता दिल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.
मतदान केंद्रांची यादी मतदान केंद्राचे ठिकाण, केंद्र ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीचे नाव,  त्या मतदान केंद्रास जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव अशा क्रमाने पुढीलप्रमाणे.
नांदेड- तहसील कार्यालय नांदेड : जिल्‍हा परिषद नांदेड  (सर्व पं.स. सभापतीसह) नांदेड वाघाळा मनपा नगर पंचायत अर्धापूर.
किनवट- तहसील कार्यालय किनवट :  नगर पंचायत माहूर नगर परिषद किनवट.
हदगाव- तहसील कार्यालय हदगाव :  नगर पंचायत हिमायतनगर नगर परिषद हदगाव.
भोकर- तहसील कार्यालय भोकर : नगर परिषद भोकर नगर परिषद मुदखेड.
कंधार- तहसील कार्यालय कंधार :  नगर परिषद लोहा नगर परिषद कंधार.
धर्माबाद- तहसील कार्यालय धर्माबाद : नगर परिषद उमरी  नगर परिषद धर्माबाद.
बिलोली- तहसील कार्यालय बिलोली : नगर पंचायत नायगाव, नगर परिषद कुंडलवाडी नगर परिषद बिलोली.
देगलूर- तहसील कार्यालय देगलूर : नगर परिषद देगलूर नगर परिषद, मुखेड. याची संबंधित मतदार तसेच यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000000
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी
'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 जाहीर
लघुपट सादर करण्यास 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ
नांदेड , दि. 7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे  राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषि विकास, जलसंधारण या विषयावर ' महाराष्ट्र माझा शेतकरी राजा ' लघुचित्रपट स्पर्धा 2016 आयोजित करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेची घोषणा केली  आहे.या स्पर्धेसाठी लघुपट सादर करण्यास दि.30 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक विजेत्या लघुचित्रपटास 51 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
लघुचित्रपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील. लघुचित्रपट हा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा असावा. चित्रीकरण HD गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे, यशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी हे लघुचित्रपट दि. 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत dgiprnews01@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. लघुचित्रपटाचे चित्रिकरण हे सद्दस्थितीतील असावे. ते संकलीत करून यशोगाथा स्वरूपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे.  जुने चित्रिकरण असलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही. स्पर्धकांनी चित्रिकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे.
परिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज् आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सागरकुमार कांबळे, सहायक संचालक (माहिती) ८६०५३१२५५५ यांचेशी  संपर्क साधावा.
******


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...