Wednesday, August 2, 2017

पीक विमा भरण्यासाठी
सीएससी केंद्र उशीरा पर्यंत सुरु राहणार
           नांदेड दि. 2 :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 च्या पीक विम्‍याचा हप्‍ता भरण्‍यासाठी शुक्रवार 4 ऑगस्ट 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बिगर कर्जदार शेतक-यांचा पीक विमा भरून घेण्‍यासाठी जिल्‍हयातील सर्व सीएससी केंद्र चालकांनी उशीरा शेतकरी असेपर्यंत केंद्र चालू ठेवावीत. शेतक-यांचे अर्ज विनाअडचण भरून घेण्‍यात यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 पीक विम्‍याचा हप्‍ता भरण्‍यासाठी अंतीम मुदत दिनांक 31 जुलै, 2017 पर्यत होती. केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसार अर्ज भरण्‍यामध्‍ये तांत्रिक अडचणी लक्षात घेता पीक विमा भरण्‍यासाठी 4 ऑगस्ट 2017 पर्यंत ही मुदतवाढ देण्‍यात आली आहे.

000000
जिल्हा ग्रंथालय कार्यालयात
अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना आदरांजली
           नांदेड दि. 2 :- लोकमान्य टिळक यांचा स्मृती दिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथ त्यांना ग्रंथप्रदर्शनाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महादेव किरवले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याशी संबंधीत असलेल्या ग्रंथाचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते. त्याचे उदघाटन तहसीलदार श्री. किरवले यांचे हस्ते करण्यात आले. श्री. किरवले यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे हे दोघेही ग्रंथप्रेमी, देशप्रेमी होते. यांनी भारतीय साहित्यांमध्ये मोठी भर टाकली आहे. अण्णाभाऊच्या  कांदबऱ्या, टिळकांचे चिंतन, संशोधनपर लिखाणामुळे या दोन्ही महान विभुती अमर आहेत, असे सांगितले  
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले. सुत्रसंचालन प्रताप सुर्यवंशी तर आभार अजय वट्टमवार यांनी मानले. अनेक विद्यार्थ्यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.

000000
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे
सदस्य न्या. थूल यांचा नांदेड दौरा
           नांदेड दि. 2 :-  राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी. एल. थूल हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
         शनिवार 5 ऑगस्ट 2017 रोजी देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.30 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. नवीन कौठा परिसरात एका बौद्ध परिचकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या सोबत घटनास्थळाला भेट. दुपारी 3 ते सायं. 5 वाजेपर्यंत विविध अनुसूचित जाती व जमातीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन. रविवार 6 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 8.30 वा. नांदेड येथून डीव्ही कारने परभणीकडे प्रयाण करतील.

00000000
पीक विमा भरण्यास
4 ऑगस्टची मुदतवाढ
           नांदेड दि. 2 :- प्रधानमंत्री पी विमा योजना खरीप हंगाम 2017 मध्ये 5 ऑगस्ट 2017 पर्यंत मुतदवाढीचा शासन निर्णय अधिक्रमित करुन राज्य शासनाने सुधारीत शासन निर्णय निर्गमित केला आहे. यानुसार बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभागाची मुदतवाढ शुक्रवार 4 ऑगस्ट 2017 करण्यात आली आहे.
ही मुदत वाढ केवळ बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठीच असुन मुदतवाढीच्या कालावधी दरम्यान केवळ ऑनलाईन पध्दतीने जनसुविधा केंद्राच्या माध्यमातुन अथवा स्वत: शेतकऱ्यांनी थेट भरलेले अर्जच मान्य करण्यात येणार असुन बँका विमा प्रस्ताव घेऊ शकणार नाहीत.  ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांना विमा भरण्याचे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...