Sunday, June 25, 2023

छाया : सदा वडजे नांदेड

 


































योजना कल्याणकारी, शासन आपल्या दारी

अन् आता हक्काची भाकर मिळाली !
लक्ष्मीबाईंनी व्यक्त केला आनंद
नांदेड दि.25 (जिमाका) : जिंदगीनं नेहमी परीक्षा घेतली… लेकरं लहान असताना नवरा मेला, लेकरांना मोठं करताना, शेतीनं पोटाची भूक भागवली... पिढ्यानं पिढ्या जमीन कसत होतोच, पण जमीन नावावर नव्हती. त्यामुळं कोणत्याही शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता… आज मुख्यमंत्री सायबांनं 6 एकर जमीन नावावर केल्यानं मला हक्काची भाकर मिळाल्याचा आनंद लक्ष्मीबाई भिमराव कुसराम यांनी बोलून दाखविला.
लक्ष्मीबाई किनवट तालुक्यातील माळ बोरगावच्या गोंड आदिवासी महिला आहेत. "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमात आज त्यांना वन निवासी हक्क अधिनियमानुसार सहा एकर जमिनीचा हक्क देण्यात आला. त्यांना याबाबत विचारले असता, त्यांचे डोळे भरून आले. ‘ज्या शेतीत माझ्या सासू-सासऱ्यांचे आयुष्य गेले… माझा नवरा या शेतात राबला. लेकरं लहानाची मोठी झाली. पण त्या जमिनीवर मालकी हक्क नव्हता, याची मनात नेहमीच रूखरूख असायची. आता पिढ्यानं पिढ्या कसलेली जमीन आमच्या नावावर झाल्यानं मोठं समाधान वाटलं.’
संधीचं केलं सोनं…
‘मी स्त्री आहे आणि मी फक्त चार भिंतीत माझं अस्तित्व बांधून ठेवावं, हे मला मान्य नव्हतं.. मी साडी सेंटर टाकलं आणि मदतीला धावून आले ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. तीन लाख रुपयाचे कर्ज घेतले… त्याचा परतावा आता वेळच्या वेळी मिळतो... संधी मिळाली.. संधीचे सोनं केलं’ हे सांगत होत्या नांदेडच्या श्रीमती अर्चना रामराव रेवले. त्यांच्या बोलण्यात एक आत्मविश्वास जाणवत होता. महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाचे हे अत्यंत बोलके उदाहरण शासन आपल्या दारी या कार्यक्रमात पहावयास मिळाले.
स्वयंरोजगारातून मिळाले आर्थिक बळ…
अडीच एकर शेतीवर संसार चालवणे ही तारेवरची कसरत, पण त्याला एका खंबीर व्यवसायाची जोड मिळाली तर सगळं चित्र कसं बदलू शकतं, हे उमरी तालुक्यातील रहाटीचे रहिवासी गंगाधर गायकवाड यांच्या यशातून कळते. "मी 12 वी शिकलेला सुशिक्षित बेरोजगार, अडीच एकर शेतीत मुला बाळांना शिकवणं, उत्तम सांभाळ करणं शक्य नाही, या जाणीवेतून जेसीबीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. माझ्या या निर्णयाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने कर्जाची फाईल मंजूर करून बळ दिलं... आता आत्मविश्वास निर्माण झाला आहे…उत्तम व्यवसाय करतो आहे, चांगले पैसे मिळतायत. मुलांना उत्तम शिक्षण देऊ शकेन, घरच्यांच्या आवडी- निवडी पुरविल्याचे समाधान मिळतेय."
फक्त ठेव नाही भविष्य सुरक्षित झालं….
कोलाम आदिवासी समाजाच्या तीन मुली, शीतल रामदास आत्राम, इयत्ता 9 वी, रेश्मा लक्ष्मण आत्राम इयत्ता 9 वी आणि सुनीता माधव आत्राम इयत्ता 8वी... अत्यंत आनंदाने सांगत होत्या, की “आज शासनाने "अदिम जमाती कन्या शिक्षण प्रोत्साहन योजनेंतर्गत" प्रत्येकी 70 हजार रुपये एवढ्या रक्कमेची ठेव आमच्या नावाने बँकेत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे खूप आनंद वाटत आहे. या पैशातून आमचे भविष्य सुरक्षित होणार आहे. या पैशामुळे घरचे पुढील शिक्षणाला विरोध करणार नाहीत. ही रक्कम आमचं आयुष्य उभं करण्यासाठी मोठं पाठबळ असेल." या मुली अठरा वर्षाच्या झाल्यानंतर, अविवाहित असताना ही रक्कम मिळेल. त्यामुळे बाल विवाहसारख्या प्रथा बंद व्हायला मदत होईल. या आर्थिक बळावर त्यांचे शिक्षण होईल आणि त्यामुळ प्रवाहात येतील, हा केंद्र शासनाच्या या योजनेच्या मागचा उद्देश असल्याचे किनवटच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हा अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले. तर ही योजना युनेस्कोच्या कन्याश्री या योजनेच्या प्रेरणेतून सुरू केल्याचेही त्या म्हणाल्या.
*****








 येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य माणसाचा !

त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत राहणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

·  शासन आपल्या दारी कार्यक्रमात विविध विभागाच्या योजनांमधून

  हजार 213 कोटी रुपयांचे लाभ  

·  मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शहिदांना अभिवादन करून

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद  

·  लाभधारकांच्या अभूतपूर्व गर्दीने अबचलनगर फुलले

·   40 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतली अनुभूती

  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- शासनाने केवळ 11 महिन्यात घेतलेले निर्णय हे मागील अडीच वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढणारे असून सरकारी काम सहा महिने थांब ही संकल्पना आपण सर्वांनी मोडीत काढून दाखविली आहे. सरकारी कामासाठी आता सर्वसामान्यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीतकारण शासनच आपल्या दारी आले आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य जनतेचा असेल व त्यांच्या हितासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण सतत काम करत राहू या शब्दात आश्वस्त केले.  नांदेड येथील अबचलनगर येथे आयोजित शासन आपल्या दारी या भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार संतोष बांगर, आमदार ज्ञानराज चौगुले, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक, विविध योजनांचे लाभार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी माहूरगड येथील श्री रेणुकादेवीश्री गुरूगोविंद सिंघजीछत्रपती शिवाजी महाराज आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामातील सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचाहुतात्म्यांचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची बांधिलकी आम्ही स्विकारली आहे. नांदेड जिल्ह्यातील जनतेसाठी विविध शासकीय विभागांच्या  योजनांमधून सुमारे 2 हजार 213 कोटी रुपयांचे लाभ दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.  

 

शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत उभे

शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्याच्या कष्टाचा सन्मान सर्वांनी करायला हवा असे मुख्यमंत्री म्हणाले. शासनाला आता कुठे एक वर्षच पुर्ण होईल परंतू या अल्पकाळात शासनाने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. शासनाने एनडीआरएफच्या दरापेक्षा दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत केली, आतापर्यंत शासनाने जवळपास 10 हजार कोटी रुपयांची मदत आपदग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची नुसतीच घोषणा झाली होती परंतू हे 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे काम या शासनाने केले आहे. सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय शासनाने केला, त्यासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतूदही केली. शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. प्रधानमंत्री महोदयांनी  6 हजार रुपयांची शेतकरी सन्मान योजना सुरु केली होती आपण त्यात आणखी सहा हजार रुपयांची भर घालून शासनाने ही रक्कम 12 हजार रुपये इतकी केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

सरकार सर्वसामान्यांचे

सर्वसामान्य माणसांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे शासन काम असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  या शासनाने सर्वसामान्य माणसाच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय असो, पर्यटनाचा, ई फाईलिंगचा निर्णय असो की अन्य कोणताही, शासनाने 75 हजार युवक-युवतींना शासकीय नोकऱ्या देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. विविध कंपन्यांसमवेत चर्चा आणि समन्वय करून आपल्या तरूणांच्या हाताला रोजगार देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करत असून आतापर्यंत दीड दोन लाख लोकांना रोजगार देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

 

कृषि महाविद्यालयाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय

नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पैनगंगा नदीवर 1 हजार 600 कोटी रुपये खर्चाचे  सात बंधारे बांधण्यास शासनाने मंजुरी दिली आहे यातून 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. विविध सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने 6 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचेही ते म्हणाले, लेंडी प्रकल्प असो की नांदेडला जोडणारे रेल्वे प्रकल्प असो, शासन नांदेडच्या विकासासाठी  पूर्ण सहकार्य करील, समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हिंगोलीमध्ये शंभर कोटीचा हळद प्रकल्प शासन सुरु करत आहे. नांदेडच्या कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव तपासून त्यावरही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले

 

हक्काचे सरकार आणि हक्काचा माणूस..

महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली असून लेक लाडकी उपक्रम असेल, बचतगटांच्या वस्तुचे ब्रॅण्डिग आणि मार्केटिंग असेल, महिलांना एस.टीत 50 टक्के तिकिट दरात सवलत असेल, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एस.टी प्रवास असेल या सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांचा लाभ आज राज्यातील नागरिक घेत आहे, हे आपल्या हक्काचे सरकार आणि मी आपल्या हक्काचा माणूस असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

गावापर्यंत पोहचण्याचा शुद्ध हेतू म्हणजे

शासन आपल्या दारी

पालकमंत्री गिरीश महाजन

दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या योजना पोहोचाव्यात या शुद्ध हेतूने शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम आपण राबवित आहोत. सर्वसामान्य माणसाला बऱ्याचवेळा त्यांच्या हक्काच्यातो ज्या योजनेला पात्र आहे त्या योजनेबाबत नेमकी कुठे अर्ज करावा लागतो याची कल्पना नसते. त्या-त्या योजनांचे निकषही त्याला माहित नसतात. अशावेळी शासन ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचते याला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे. कर्तव्याची भावना आणि जबाबदारी स्विकारून शासकीय योजनेत अधिक पारदर्शकता व साक्षरता यातून निर्माण होईलअसा विश्वास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दररोज सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे दु:ख समजून घेत आहेत. त्यांच्यासाठी शासन पातळीवर अनेक योजना घेऊन ते पोहोचत असल्याचे गौरव उद्गार नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काढले.

 

शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी आम्ही सदैव तत्पर

-        कृषि मंत्री अब्दुल सत्तार

निसर्गाच्या आव्हानात शेतकरी हा नेहमी गुरफटलेला असतो. विविध आव्हानात गुरफटलेल्या शेतकऱ्यांना अनेक विकास योजनांच्या माध्यमातून आर्थीक विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकरी निसर्गाकडून आणि बाजारपेठेतील शेतमालाच्या भावात होणाऱ्या बदलातून सदैव त्रस्त असतो. जेंव्हा शेतमालाचे उत्पादन अधिक होते तेंव्हा बाजारात भाव नसतो. शेतकऱ्यांची ही आर्थिक कुचंबना थांबविण्यासाठी शासनाने गोडाऊन योजनेवर भर दिला आहे. यासाठी तब्बल 60 टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जात आहे. बाजारात जेंव्हा शेतमालाला भाव नसतील तेंव्हा हा शेतमाल गोडाऊनमध्ये साठवता येईलअसे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधतांना सांगितले. शेतीसमवेत शेतीपूरक उद्योग व्यवसायावर अधिक भर दिला आहे. महिला बचतगटांना शेळी याचबरोबर गाई व म्हशीबाबतचा निर्णय शासनाने घेतला. मागेल त्याला शेततळेसौरऊर्जाऔजार बँकनांगरवकरट्रॅक्टरहार्वेस्टरड्रोनने फवारणी यासाठी विद्यापीठ पातळीवर प्रशिक्षणसौरऊर्जेवर कृषिपंप अशा विविध योजना घेऊन सरकार शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध असल्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.  

 

उद्योग विकासाला चालना मिळेल

-  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावीतत्पर सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी झटत आहेत. हे सरकार देणारे असल्याचे सांगून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात उद्योग व रस्ते विकासाचा प्रलंबित अनुशेष पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

शासन आपल्या दारी अभियानाच्या अनुभूतीने

सर्वसामान्यांचा विश्वास वाढला

- खासदार हेमंत पाटील

शासनाशी संबंधित सर्वसामान्य माणसाला अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. साध्या प्रमाणपत्रापासून ते लाभाच्या योजनेपर्यंत त्याला कार्यालयात खेटे मारावे लागतात. शासन आणि लाभार्थी यांच्यामधील ही दरी कमी करण्यासाठी शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम अत्यंत मोलाचा असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले. रिक्षा चालविण्यापासून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अनुभव घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप काही अनुभवले आहे. ही अनुभवाची शिदोरी घेऊन शासकीय योजनांना त्यांनी अधिक जबाबदार व लोकाभिमूख केल्याचे त्यांनी सांगितले.

 

कृषि महाविद्यालयाची आ. कल्याणकर यांची मागणी

या कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून शासना आपल्या दारीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात शासकिय योजनांना गती मिळाल्याचे सांगितले. याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील कृषिचे क्षेत्र लक्षात घेता कृषि महाविद्यालयाची मागणी केली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे वितरणही करण्यात आले. माझी मुलगी माझा अभिमान अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 5 हजार घरांना मुलींचे नाव दिले. या अभियानाला अधोरेखीत करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सौ. लताताई एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी कुमारी प्रगती व्यंकट नव्हाते या लहान मुलीच्या हस्ते मुख्यमंत्री यांना देण्यात आली. याचबरोबर त्यांच्या हस्ते शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 2 हजार 123 शेतकऱ्यांना 2 कोटी 5 लक्ष एवढे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

00000










































  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...