Thursday, September 16, 2021

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

गुरुवार  16 सप्टेंबर  20201 रोजी उमरखेड येथून नांदेड येथे रात्री 10 वाजता आगमन व राखीव. शुक्रवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8.25  वा. शिवाजीनगर निवासस्थान येथून मोटारीने माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड कडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनोत्सावानिमित्त हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनोत्सावानिमित्त राष्ट्रध्वज वंदन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड. सकाळी 9.25 वाजता मराठवाडा गौरव गीताच्या ध्वनीचित्रफितीचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (प्रसिध्द कवी मा. लक्ष्मीकांत तांबोळी) महिला व बालकल्याण विभाग, म.न.पा.नांदेड स्थळ- माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड. सकाळी 9.40 वाजता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयसोलेटेड एम.बी.बी.आर टेक्नालॉजीने बांधण्यात आलेल्या मल शुध्दीकरण केंद्राचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ माता  गुजरीजी विसावा उद्यान नांदेड. सकाळी 10 वाजता महात्मा फुले मार्केट (शॉपिंग सेंटर) पुर्नविकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ महात्मा फुले मार्केट (गणेशनगर रोड) शिवाजी नगर नांदेड. दुपारी 4.30 वाजता येळेगाव, ता.अर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ येळेगाव ता. अर्धापूर. सायंकाळी 6 वाजता नांदेड येथील नवनिर्मित दक्षता संकल्पचित्र विभाग (पुल व इमारती) कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- स्नेहनगर नांदेड. सायंकाळी 6.30 वाजता नांदेड येथील नवनिर्मित दक्षता व गुण नियंत्रण विभाग कार्यालय व क्षेत्रिय प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- स्नेहनगर नांदेड. सोईनुसार नांदेड निवासस्थान येथे आगमन व राखीव.

00000

 नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित तर 7 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 692 अहवालापैकी 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 303 एवढी झाली असून यातील 87 हजार 618 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 32 रुग्ण उपचार घेत असून 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, माहूर तालुक्यांतर्गत 1, धर्माबाद 3 असे एकुण 9 बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 3, मनपा अंतर्गंत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 4 असे एकुण 7 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 34 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 9, खाजगी रुग्णालय 4 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 23 हजार 233
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 19 हजार 972
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 303
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 618
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-34
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...