Wednesday, June 19, 2019


इयत्ता दहावी, बारावी परीक्षा
शुल्क भरणा करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 19 :- लातूर, नागपूर, मुंबई विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी जुलै-ऑगस्ट 2019 साठी आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर केल्यानंतर आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे परीक्षा शुल्काचे चलन ऑनलाईन तयार होणार असून ते आपण डाउनलोड करुन घ्यावयायचे आहे. परीक्षा शुल्क प्रचलित पद्धतीने बॅक ऑफ इंडियामध्ये भरणा न करता ते एचडीएफसी बँकेत भरणा करण्याबाबतची सुधारीत कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे.
सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईएफटी, आरटीजीएसद्वारे चलनावरील नमूद बँक अकाउंट नंबर व आयएफएससी कोड HDFC0000007 (एचडीएफसी सहा वेळा शुन्य सात) प्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे.
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी / आरटीजीएस केलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच अकाउंट नंबर व आयएफएससी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधीत मुख्याध्यापक / प्राचार्य यांची राहील. तसेच माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे शुल्क मंडळाकडे जमा झाल्याशिवाय त्यावरील पुढील प्रक्रिया होणार नाही याची दक्षता सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी घ्यावयाची आहे, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
0000000


सामाजिक न्याय दिन
साजरा करण्याचे निर्देश
नांदेड दि. 19 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जून 2019 रोजी सामाजिक न्याय दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधीत विभागांना निर्देश दिले आहेत.  
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि. 28 एप्रिल 2006 दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जि.प. समाज कल्याण अधिकारी, उच्च शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी निरंतर जि.प. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा क्रीडाधिकारी, प्राचार्य तंत्रशिक्षण, प्राचार्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहा. आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी योग्य ती कार्यवाही करावी व कार्यवाहीचा अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
000000

सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचे निर्देश



नांदेड दि. 19 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जून 2019 रोजी सामाजिक न्याय दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधीत विभागांना निर्देश दिले आहेत.  
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि. 28 एप्रिल 2006 दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जि.प. समाज कल्याण अधिकारी, उच्च शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी निरंतर जि.प. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा क्रीडाधिकारी, प्राचार्य तंत्रशिक्षण, प्राचार्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहा. आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी योग्य ती कार्यवाही करावी व कार्यवाहीचा अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
000000

योग साधनेची रंगीत तालीम संपन्न



नांदेड, 19 :- योगऋषि स्वामी रामदेवजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक 21 जून 2019 रोजी नांदेडमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय योगदिनानिमित्‍त राज्‍यस्‍तरीय योग शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. यानिमित्‍त शिवरत्‍न जिवाजी महाले चौक (मामा चौक), असर्जन येथील मैदानावर आज बुधवार दिनांक 19 जून 2019 रोजी पहाटे 5 वाजता योग साधनेची रंगीत तालीम घेण्‍यात आली. यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरीक यांनी प्राणायाम व योगसाधनेचा सराव केला.
     याप्रसंगी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पतंजली योगपीठाचे मुख्‍य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, लेखाधिकारी निलकंठ पाचंगे, राजेश पवार, जि.प. सदस्‍या पुनम पवार, मिलिंद देशमुख, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी सामान्‍य योग, शिथिलीकरण आसन, उभे राहून करण्‍यात येणारे ताडासन, पादहस्‍तानसन, अर्ध्‍दचक्रासन, त्रिकोणासन तर बसून करण्‍यात येणा-या आसनामध्‍ये दण्‍डासन, भद्रासन, वीरासन, उर्ध्‍द अष्‍ट्रासन, शशकासन, उत्‍तानमंडूकासन, वक्रासन, उत्‍तनमंडूकासन, पोटावर झोपून करावयाचे आसनामध्‍ये मकरासन, भुजंगासन, शलभासन तसेच पाठीवर झोपून करण्‍यात येणा-या आसनामध्‍ये सेतूबंध आसन, अत्‍तानपाद आसन, अर्ध हलासन, पवन मुक्‍तासन, श्‍वासन, योग निद्रा त्‍याचप्रमाणे प्राणायामामध्‍ये कपालभारती, अनुलोमविलोम, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम व ध्‍यान अशा सात प्रकारातील विविध आसने व प्राणायामाचे प्रशिक्षण देण्‍यात आले. यावेळी विविध कार्यालयाचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पतंजली योग समितीचे सदस्य, पत्रकार, महिला व पुरुष यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. उद्या गुरुवार 20 जून रोजी पहाटे साडेचार वाजता पुन्‍हा एकदा रंगीत तालीम याच मैदानावर घेण्‍यात येणार आहे.
सुस्थितीत कार्यक्रम पार पाडावा - खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
योगऋषि स्वामी रामदेवजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक 21 जून 2019 रोजी नांदेडमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय योगदिनानिमित्‍त राज्‍यस्‍तरीय योग शिबीर घेण्‍यात येत आहे. हा कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्‍यासाठी सर्वांनी सहाकार्य करावे असे आवाहन नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
आज शिवरत्‍न जिवाजी महाले मैदान असर्जन येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत योग दिनानिमित्‍त घेण्‍यात येणा-या शिबिर पूर्व तयारीचा आढावा त्‍यांनी घेतला. यावेळी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्‍हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे आयुक्‍त लहुराज माळी, जिल्‍हा पोलिस अधिक्षक संजय जाधव, अप्‍पर जिल्‍हाधिकारी कुशालसिंह परदेशी, जि.प. सदस्‍य तथा माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, चैतन्‍यबापू देशमुख, मिलिंद देशमुख, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी रावसाहेब कोलगणे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी व्‍ही.आर. कोंडेकर, यू.डी. इंगोले, एस.व्‍ही. शिंगणे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कुंडगीर, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. बी.पी. कदम यांच्‍यासह विविध विभागाचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
21 जून रोजी अधिकारी, कर्मचारी, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, गावकरी, महिला बचतगटातील सदस्‍य, आरोग्‍य कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक तसेच महिला व पुरुषांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.
0000

वृत्‍त क्र.   364 निवडणूक कर्मचा-यांसाठी 108 बसेसची व्‍यवस्‍था ·     प्रशासनाचा परिवहन मंडळाशी करार नांदेड दि.  19  :  नांदेड व हिंगोली लोकस...