Tuesday, June 23, 2020


वृत्त क्र. 568   
सोयाबीन उगवण न झालेल्या क्षेत्रात
आपत्कालीन पीक व्यवस्थापन करावे
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची कासरखेड येथे शेतीची पाहणी
नांदेड (जिमाका) दि. 23 :-  कासारखेडा येथे खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर पाच ते सहा दिवसांनी काही गावातील बियानांची उगवण होत नसल्याबाबत शासनाकडे लेखी व वर्तमानपत्रातून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मौजे कासारखेडा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष सोयाबीन उगवणीची पाहणी केली. सोयाबीन उगवण कमी होण्याची कारणे शेतकरी व शास्त्रज्ञांकडून जाणून घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांसोबत असून सोयाबीनची उगवण ज्या क्षेत्रामध्ये  झालीच नाही अशा शेतावर दुबार पेरणी करावी व  अल्प प्रमाणात उगवलेल्या ठिकाणी मूग, उडीद, तूर ,सूर्यफूल अशा पिकांची लागवड करावी, असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत सोयाबीनला आपत्कालीन पिकांचा पर्याय निर्माण करून खरीप हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन केले.
     यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय कृषी अधिकारी सुखदेव रविकुमार, कृषी विकास अधिकारी श्री. नादरे, तहसीलदार सारंग चव्हाण, तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री राऊत ,मंडळ  कृषी अधिकारी सतीश सावंत, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक यांचेसह शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
000000
     





वृत्त क्र. 566   
निवृत्ती वेतनधारकांनो अत्यावश्यक
गरज असल्यास कोषागारासाठी घराबाहेर पडा
नांदेड दि. 23 :- जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी अत्यावश्यक गरज असल्यास कोषागारासाठी घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका. निवृत्ती वेतनधारकांनी घरी राहून सुरक्षित रहा, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
निवृत्ती वेतधारकांकडे प्राप्त झालेले सुधारित निवृत्तीवेतन प्राधिकारपत्र कोषागारालाही प्राप्त होतात व त्यावर त्वरीत कार्यवाही केली जाते. निवृत्ती वेतनधारकांनी अर्ज देण्याची आवश्यकता नाही. तसेच वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 10 टक्के वाढ, विक्री केलेली रक्कम 15 वर्षांनी पुन:स्थापित करण्यासाठी कोषागाराला येण्याची आवश्यकता नाही. अत्यंत अपरिहार्य परिस्थितीत अर्ज देणे आवश्यकच असल्यास अर्ज पोस्टाने पाठवावा किंवा पेटीत टाकावा, असेही आवाहन कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000


26 जून रोजी सामाजिक न्याय दिन
नांदेड दि. 23 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जून 2019 रोजी सामाजिक न्याय दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधीत विभागांना निर्देश दिले आहेत.
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि. 14 जुलै 2003, शासन परिपत्रक उपसचिव 12 डिसेंबर 2019 दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, सहा. आयुक्त समाज कल्याण नांदेड, जि.प. समाज कल्याण अधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी, शिक्षणाधिकारी निरंतर, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी योग्य ती कार्यवाही करावी व कार्यवाहीचा अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...