Wednesday, October 25, 2017

वाहनांसाठी आरटीओच्या 16 ऑनलाईन सेवा
नांदेड, दि. 25 :- प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे 1 नोव्हेंबर 2017 पासून वाहनांवरील देण्यात येणाऱ्या पुढील 16 सेवांसाठी ऑनलाईन पध्दतीने parivahan.gov.in या संकेतस्थळाद्वारे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. जिल्हयातील नागरिकांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
वाहनासाठी देण्यात येणाऱ्या ऑनलाईन 16 सेवा पुढील प्रमाणे आहेत. Transfer of Ownership, Transfer of Ownership in case of death, Sale of vehicle in case of auction, Change in address, Hypothecation addition, Hypothecation termination, Pay your tax, Duplicate RC, Issue of NOC, Online appointment for Fitness inspection, Alteration of vehicle, Duplicate fitness certificate, Renewal of registration, Converion of Vehicle, RC Cancellation, Application for Trade Certificate. जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करुन ऑनलाईन पध्दतीने शुल्काचा भरणा करावा सर्व नमुन्यांची प्रिंट काढून मुळ नोंदणी प्रमाणपत्र इतर आवश्यक कागदपत्रपुढील कार्यवाहीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे एक खिडकी योजना अंतर्गत जमा करावीत, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
मोटार सायकलसाठी नवीन मालिका
नांदेड, दि. 25 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोटार सायकलसाठी एमएच- 26 बीएच ही नव मालिका सोमवार 30 ऑक्टोंबर पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमाक घ्यावयाचा आहे. त्यांचे गुरुवार 26 ऑक्टोंबर पासून अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. संबंधीतांनी याबाबतीत नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
शाम कैलासे हा मुलगा बेपत्ता
आढळल्यास संपर्क करा
नांदेड, दि. 25 :- शाम बाबुराव कैलासे ( वय 17 वर्षे ) यास 10 ऑक्टोंबर 2017 रोजी बाबानगर नांदेड येथुन फूस लावून पळवुन नेले आहे. या मुलाचा रंग गोरा, बांधा सडपातळ, उंची 6 फुट, अंगात चौकोणी डब्याचा टी शर्ट, पांढऱ्या व चॉकलेटी पट्याचा लांब बाह्याचा व पॅट निळसर जीन्स मील्ट्री कलरची पाठीवरची स्कुल बॅग आहे. सोबत आधार कार्ड नंबर 604391265629 व मो. नंबर 7517227603 हा आहे. या वर्णनाचा मुलगा कोणाला आढळल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड दुरध्वनी क्र. 02462-256520 व सहा. पोलीस निरीक्षक एस. बी. लहाने मो. 9923258716 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन नांदेड शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक एस. बी. लहाने यांनी केले आहे.

00000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शुक्रवार 27 ऑक्टोंबर पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  27 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून रविवार 26 नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

00000
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौंडीचे मंगळवारी आयोजन
             नांदेड, दि. 25 :- सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून 31 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना निर्गमित केली आहे. मंगळवार 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीची सुरुवात महत्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरु होणार असून जुना मोंढा टावर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन एकता दिनाची शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी या राष्ट्रीय एकता दौडीमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचित केले आहे.  

0000000
नेव्ही माजी सैनिकांची मंगळवारी बैठक
नांदेड, दि. 25 :- नेव्हीतील सेवानिवृत्त माजी सैनिक व विधवा यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी वेर्स्टन कंमाड  नेव्हीचे सेवारत कॅप्टन पी. प्रशांत हे मंगळवार 31 ऑक्टोंबर रोजी  सकाळी 10 वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास  भेट  देत आहेत. जिल्हयातील सर्व नेव्ही मधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक व विधवा यांनी  बैठकीस उपस्थीत राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.

000000
सातारा सैनिक स्कुलसाठी प्रवेश सुरु
नांदेड, दि. 25 :- सैनिक स्कुल सातारा येथे सन 2018-19 साठी इयत्ता 6 वी व 9 वी या वर्गासाठी ऑनलाईन व ऑफलाईन  प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विहित नमुन्यातील अर्ज माहिती पुस्तक 400 रुपये व एसी प्रवर्गसाठी 250 रुपये सैनिक स्कुल सातारा येथे उपलब्ध आहेत. वयोमर्यादा  इयत्ता सहावीसाठी पाल्य 2 जुलै 2007 ते 1 जुलै 2005 मधील जन्म झालेला असावा. अर्ज भरण्याची शेवटची  तारीख 5 डिसेंबर 2017 आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साघावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...