Thursday, August 12, 2021

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा


नांदेड (जिमाका) दि. 12 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

शुक्रवार 13 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 11.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. शनिवार 14 ऑगस्ट रोजी सायं. 4 वा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. रविवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वा. भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज वंदन समारंभास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सकाळी 9.30 वा. किनवट तहसिल कार्यालयाच्या नुतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (व्हीसीद्वारे) स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सकाळी 10 वा. मिशन आपुलकी कार्यक्रमास व गाव तिथे खोडे कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सकाळी 10.30 वा. 112 क्रमांकाच्या वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान नांदेड. सकाळी 11 वा. कॉमन मॅन पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड. सकाळी 11.30 वा. अत्याधुनिक अल्ट्रा सोनोग्राम मशिनचे उद्घाटन, विशेष नवजात शिशु अतिदक्षता केंद्राचे उद्घाटन व थैलेसिमिया उपचार केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- स्त्री रुग्णालय कॉलेज रोड हर्षनगर श्यामनगर नांदेड.
00000 

 

नांदेड जिल्ह्यात  6 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 713 अहवालापैकी  6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 242 एवढी झाली असून यातील 87 हजार 532 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 51 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, नांदेड ग्रामीण 2 असे एकूण 6 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 51 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3,  देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 38, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 127, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 82 हजार 929

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 80 हजार 554

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 242

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 532

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 659

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.99 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-19

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-51

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3                      

00000

 

जिल्ह्यातील 53 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 


नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 53 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 13 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शहरी दवाखाना जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, सिडको, पौर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, हैदरबाग, शिवाजीनगर, श्रावस्तीनगर (विजयनगर) या 13 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर स्त्री रुग्णालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, रेल्वे हॉस्पिटल या 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 10 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस  दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय कंधार, नायगाव 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस  दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद,हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, उमरी या 13 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस  उपलब्ध केले आहेत. ग्रामीण भागात 13 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. तर 10 प्राथमिक आरोग्य केद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत.

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 11 ऑगस्ट 2021 पर्यंम एकुण 8 लाख 81 हजार 795 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 12 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 96 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 35 हजार 800 डोस याप्रमाणे एकुण 9 लाख 31 हजार 830 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

जिल्हा ग्रंथालय कार्यालयात रंगनाथन जयंती साजरी

नांदेड, (जिमाका) दि. 12:- भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 129 वी जयंती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे साजरी करण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. गंगाधर पटने, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, नाराणराव चव्हाण विधी माहाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. राजीव वाघमारे, प्रताप सुर्यवंशी, के. एम. गाडेवाड यांची उपस्थिती होती.

00000

 

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान, बिजभांडवल योजनेसाठी 

कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 12:- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेंतर्गत 20 लाभार्थी व बीजभांडवल योजनेंतर्गत 16 लाभार्थ्यांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज 12 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायं 6.15 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर तळमजला, कामठा रोड, नांदेड येथे स्विकारले जातील. जिल्ह्यातील चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील बेरोजगार युवक युवतीनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. 

या दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत पुढील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपसिथत राहून दाखल करावीत. त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसिलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, बिजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स परवाना बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरुण सी. राऊत यांनी केले आहे.

00000

 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत ऑनलाईन वेबिनारचे आज आयोजन 

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेची संपूर्ण माहिती व जनजागृती करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत शुक्रवार 13 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वा. झूम ॲपवर वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार सर्वांसाठी खुला असून जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अनुषंगाने नागरिकांच्या अडीअडचणी व शंकाचे निराकरण करण्यासाठी समितीचे अधिकारी मागदर्शन करुन नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. सर्व अर्जदार, पालक, विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदारांना शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर कारणासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन जात वैधता प्रमाणापत्र प्राप्त करावे लागते. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेबाबत जनजागृती करणेसाठी व गरजु अर्जदारांना विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज कसा करावा. त्यासोबत कोणते पुरावे सादर करावे याबाबत या वेबिनारचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम झूम ॲप डाऊनलोड करावे. जॉईन मिंटीग हा पर्याय निवडावा. त्यानंतर मिटींग आयडी : 334 156 8480 हा असून पासवर्ड 1234 हा समाविष्ट करण्यात यावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने  संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव आ. ब. कुंभारगावे यांनी केले.

000000 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...