Monday, May 15, 2017

माळाकोळी शाळा परिसरातील
तंबाखू विक्रेत्यास दंड
नांदेड, दि. 15 :- लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील जिल्हा परिषद शाळ परिसरात तंबाखू विक्रीस बंदी असताना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत होती. तंबाखू नियंत्रण कायदान्वये जिल्हा रुग्णालय माळाकोळी पोलीस स्टेशनच्या पथकांनी संबंधीत तंबाखू विक्रेत्यास दंड आकारुन शाळ परिसरात तंबाखू विक्री करण्यास बंदी घालण्यात आली.  
या पथकामध्ये जिल्हा रुग्णालयातील अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. रोशनी चव्हाण, समुपदेशक प्रकाश आहेर,  सुवर्णकार सदाशव व माळाकोळी पोलीस स्टेशनचे पोलीस हे.कॉ. आर. पी. कदम यांचा सहभाग होता.

000000
राज्य सहकार परिषदचे अध्यक्ष
शेखर चरेगावकर यांचा दौरा
नांदेड, दि. 15 :- महाराष्ट्र राज्य सहकार परिषद पुणे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर हे गुरुवार 18 मे 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 18 मे 2017 रोजी देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. शंकर नागरी सहकारी बँक येथे आगमन व राखीव. स्थळ- नवीन मोंढा मार्केट यार्ड नांदेड. दुपारी 1 ते 2.30 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी बँक येथे आगमन व राखीव (मार्केट यार्ड नांदेड). दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. दुपारी 4.45 वा. रेल्वे स्थानक नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वा. नांदेड-पनवेल एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण करतील.

000000

* लेख क्र. 9

  डेंग्यू रोखण्यासाठी एडीस डास उत्पत्तीला
लोकसहभागातून आळा घालता येणार
 आरोग्य संस्थेत आज राष्ट्रीय डेंग्यू दिन   

डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नाही. याबाबत नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यु दिन मंगळवार 16 मे 2017 रोजी साजरा होत आहे. याविषयी माहिती देणारा हा लेख...

सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे नागरिकांकडून पाणी साठविण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. या साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. त्यातून डासोत्पत्ती होते. डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्यतपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील तीन वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. (तपासलेले रक्तजल नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण). सन 2014 - (459) 122 (तीन). सन 2015 - (427) 74 (निरंक). सन 2016 - (776) 182 ( एक ). एप्रिल 2017 - अखेर (127) 25 (निरंक).
भविष्यात डेंगी ताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक दिवस निश्चित करुन रिकामे करावत. या साठयातील आतील बाजू तळ घासुन पुसुन कोरडरुन पुन्हा वापराव्यात पाण्याचे साठे घट्ट झाकून ठेवावेत. आंगणात परिसरातील खड्डे बुजवावेत. त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतांमध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपतांना र्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरन घेवून झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाटायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऑईल टाकावे. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.
नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल व डास चावणार नाहीत. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी या डासाची उत्पत्ती कमी करण्यासाठी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे आवश्यक आहे. 
          - संकलन काशिनाथ र. आरेवार
 जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

                                                            000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...