Monday, March 29, 2021

 

नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 18 व्यक्ती कोरोना बाधित

19 जणांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 29 :- नांदेड जिल्ह्यात सोमवार 29 मार्च 2021 रोजी 1 हजार 18 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 3 हजार 411 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 383 तर अँटिजेन तपासणीद्वारे 715 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 18 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 41 हजार 6 एवढी झाली आहे. 

शनिवार 27 मार्च 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे गाडीपुरा नांदेड येथील 75 वर्षाची महिला, सहयोगनगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, तरोडा नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, मंत्रीनगर नांदेड 68 वर्षाचा पुरुष, कंधार 66 वर्षाची महिला, रेणुकादेवी मंदिर नांदेड 70 वर्षाची महिला, धर्माबाद येथील 62 वर्षाचा पुरुष, रविवार 28 मार्च रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल अशोकनगर नांदेड येथील 95 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड 65 वर्षाची महिला, दत्तनगर नांदेड 70 वर्षाची महिला, मालेगाव रोड नांदेड 57 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवीन इमारत) महावीर चौक नांदेड 76 वर्षाचा पुरुष, उमरी कोविड केअर सेंटर येथे चौक गल्ली उमरी 65 वर्षाची महिला, हिरडगाव उमरी 65 वर्षाचा पुरुष, खाजगी रुग्णालय शाहूनगर नांदेड 65 वर्षाची महिला, अशिषनगर नांदेड 64 वर्षाचा पुरुष, नांदगाव लोहा येथील 45 वर्षाची महिला, नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, भावित्यानगर मालेगाव रोड नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 750 एवढी झाली आहे. 

आजच्या 3 हजार 411 अहवालापैकी 2 हजार 195 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 41 हजार 6 एवढी झाली असून यातील 30 हजार 212 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 9 हजार 810 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 12, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 597, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 12, कंधार तालुक्यांतर्गत 3, धर्माबाद तालुक्यांतर्गत 22, लोहा कोविड रुग्णालय 11, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 16, मुखेड कोविड रुग्णालय 64, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, हदगाव कोविड रुग्णालय 20, बिलोली तालुक्यांतर्गत 11, भोकर तालुक्यांतर्गत 5, माहूर तालुक्यांतर्गत 20, अर्धापूर तालुक्यांतर्गत 10, मुदखेड तालुक्यांतर्गत 42, खाजगी रुग्णालय 88 असे एकूण 939 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.67 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 215, नायगाव तालुक्यात 18, अर्धापूर 6, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 12, माहूर 17, मुदखेड 21, औरंगाबाद 1, लोहा 20, कंधार 11, मुखेड 36, लातूर 1, धर्माबाद 12, उमरी 10, परभणी 1, हिंगोली 1 असे एकूण 383 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 531, बिलोली तालुक्यात 1, कंधार 8, मुखेड 5, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 35, देगलूर 3, किनवट 35, नायगाव 11, परभणी 1, अर्धापूर 11, धर्माबाद 12, लोहा 50, उमरी 2, भोकर 4, हदगाव 2, माहूर 1, हिंगोली 1 असे एकूण 715 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 9 हजार 810 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 300, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 104, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 119, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 78, मुखेड कोविड रुग्णालय 89, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 36, जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर 64, बिलोली कोविड केअर  सेंटर 137, नायगाव कोविड केअर सेंटर 60, उमरी कोविड केअर सेंटर 45, माहूर कोविड केअर सेंटर 12, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय 54, हदगाव कोविड केअर सेंटर 42, लोहा कोविड रुग्णालय 94, कंधार कोविड केअर सेंटर 18, महसूल कोविड केअर सेंटर 120, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 15, धर्माबाद कोविड केअर सेंटर 58, मुदखेड कोविड केअर सेंटर 41, अर्धापूर कोविड केअर सेंटर 21, बारड कोविड केअर सेंटर 17, मांडवी कोविड केअर सेंटर 20, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 6 हजार 116, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 426, खाजगी रुग्णालय 637, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत. 

सोमवार 29 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 4 हजार 480

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 57 हजार 22

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 41 हजार 6

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 30 हजार 212

एकुण मृत्यू संख्या-750

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.67 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-101

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9 हजार 810

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-126. 

शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसारअली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...