Wednesday, January 20, 2021

 

35 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू     

31 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 20 :- बुधवार 20 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 35 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 25 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 10 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 31 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 720 अहवालापैकी 672 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 160 एवढी झाली असून यातील 21 हजार 49 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 328 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 20 जानेवारीला बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील 72 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 580 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 31 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.98  टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर 2, नायगाव 1, अदिलाबाद 1, नांदेड ग्रामीण 2, भोकर 2, कंधार 5, परभणी 1 असे एकुण 25 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 8, यवतमाळ 1, लोहा तालुक्यात 1  असे एकुण 10 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 328 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 25, मुखेड कोविड रुग्णालय 16, महसूल कोविड केअर सेंटर 13, किनवट कोविड रुग्णालय 4, देगलूर कोविड रुग्णालय 7, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 150, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 51, खाजगी रुग्णालय 27 आहेत.   

बुधवार 20 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 166, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 74 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 97 हजार 121

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 70 हजार 464

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 160

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 49

एकुण मृत्यू संख्या-580

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-328

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9.          

00000

 

मौजे धनगरवाडी येथे ड्रोनद्वारे गावठाण भूमापन कामाचे सर्वेक्षण

 जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून पाहणी

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- भूमि अभिलेख विभाग भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने महाराष्ट्रातील गावठाण भूमापन झालेल्या गावांचे ड्रोन गावठाण भूमापन काम सुरु आहे. नांदेड तालुक्यातील मौजे धनगरवाडी येथे सुरु असलेल्या गावठाण मापन सर्वेक्षण कामाची 19 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हा रिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी पाहणी केली. तसेच नांदेड हिमायतनगर तालुक्यात सुरु असलेल्या सर्व्हेक्षण कामात ग्रामपंचायत कर्मचारी जनतेने सर्व्‍हेक्षण करणाऱ्या पथकांना सहकार्य करावे मिळकतीचे सिमांककरुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठिया यांनी  केले. 

 जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हा रिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर पहाणी करतेवेळी गावातील नागरीकांना गावठाण भुमापन कामाचे महत्व पटवुन दिले. यासाठी ग्रामविकास विभागाच्या 22 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये जीआयएस आधारे गावांच्या गावठाणातील मिळकतींचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. संगणीकृत नकाशे, सनद मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. या गावठाण भुमापनामुळे जिल्हयातील गावठाणातील घरांचे नकाशा सिमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे त्याची नोंद होईल. ग्रामस्थांचे नागरी हक्काचे संवर्धन होईल. गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सिमा निश्चित होवून अतिक्रमण रोता येईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे मिळकत धारकांना घरावर कर्ज घेणेची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी अभिलेख नकाशा उपलब्ध होतील. 

यावेळी जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख श्रीमती सुरेखा सेठीया यांनी प्रत्यक्ष गावठाण ड्रोनसर्व्हेची माहिती दिली. त्यावेळी भारतीय सर्व्हेक्षण विभागाचे सर्व्हेक्षक एस. विनोदकुमार यांनी ड्रोनव्दारे मिळकतीच्या प्रत्यक्ष चालु असलेल्या मोजणी कामाची माहिती दिली. त्यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यु.डी.तोटावाड, विस्तार अधिकारी,  ग्रामसेवक ग्रामपंचायत  प्रशासक हे उपस्थि होते.

00000




 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी

शिष्यवृत्तीसाठी आधार संलग्नीकरण करुन घ्यावे  

नांदेड, (जिमाका) दि.20 :- अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्तीसाठी अद्यापपर्यंत आपले आधार नंबर एनपीसीआय मॅपरशी लिंक केले नाहीत त्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधून आपले आधार क्रमांक एनपीसीआयशी लिंक करुन घ्यावे व महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन करुन आपआपली प्रोप्राईल अद्यावत करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर  यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 2018-19 व 2019-20 या शैक्षणिक वर्षात भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापपर्यंत जमा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक मोबाईल नंबरवर याबाबतचा मेसेज समाज कल्याण कार्यालयामार्फत पाठविण्यात आला आहे. महाविद्यालयामार्फत सुध्दा विद्यार्थ्यांना तसे कळविण्यात आलेले आहे. 

0000

 

विकेल ते पिकेल धोरणातर्गंत  

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळाव्याचे आयोजन

 नांदेड, (जिमाका) दि.20 :- विकेल ते पिकेल या धोरणांतर्गंत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळावा कृषि विभागामार्फत 26 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत आयोजित केला आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे फळे व भाजीपाला, विविध सेंद्रीय उत्पादने, गहु, ज्वारी, तांदुळ इ. धान्य, तुर, मुग, उडीद,  इत्यादी डाळी,  हळद, मिरची पावडर इत्यादी मसाले, लाकडी घाण्याचे तेल, सेंद्रीय गुळ, पाक, मध, विविध प्रकारचे पापड, लोणचे, चटण्या, शेतमालावर प्रक्रिया केलेले विविध पदार्थ इत्यादी शेतकऱ्यामार्फत ग्राहकांना थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...