Monday, May 14, 2018


सामान्य व्यक्तींच्या समस्या जाणून
बँकेशी संबंधीत कामे पूर्ण करावीत  
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
       
नांदेड दि. 14 :- शेतकरी व सामान्य व्यक्तींच्या समस्या जाणून त्यांची बँकेशी संबंधीत कामे त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. जिल्हास्तरीय बँक समितीची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
            यावेळी आ. वसंत चव्हाण, आ. सुभाष साबणे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय दुर्वे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री डोंगरे म्हणाले, शेतकरी व गरीब व्यक्ती सावकाराकडे जाणार नाही यासाठी त्यांची कर्ज प्रकरणे निकाली काढावीत. शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून मिळणारी रक्कम कर्ज खात्यात जमा करु नये. बँकेकडे जी गावे दत्तक नाहीत ती गावे बँकांना दत्तक देण्यात यावीत. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकांनी सकारात्मक राहून पुढे यावे. बँकांनी पिक कर्ज वाटप त्वरीत करुन कर्ज वितरणाचे उद्दीष्ट पुर्ण करावीत, अशी सुचना त्यांनी केली.  
           
यावेळी जिल्ह्यातील सन 2017-18  पिक कर्ज व इतर कर्ज व शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेण्यात आला. सन 2018-19 मधील पिक कर्ज वितरणाची कार्यपद्धतीबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान नाबार्डद्वारा नांदेड जिल्ह्यासाठी प्रकाशीत डेअरी व शेळीपाल यावर क्षेत्रीय विकास योजना पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीस बँकेचे व संबंधीत कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. शेवटी वित्तीय साक्षरात समन्वयक श्री घेवारे यांनी आभार मानले.
000000




युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती
        नांदेड दि. 14 :- मराठा लाईट इंन्फट्री बेळगांव येथे हेडक्वार्टर कोटा सैन्यभरती  सोमवार  28 मे 2018 पासुन सोल्जर जी डी,  सोल्जर ट्रेडसमॅन व  सोल्जर क्लार्क यापदासाठी होत आहे यामधे फक्त माजी सैनिकांचे पाल्य व पात्र खेळाडूसाठी आहे. यामधे  शहिद जवान यांच्या पाल्यास व विधवा यांच्या पाल्यास प्राधाण्य दिले जाईल. अधिक माहिती व  पात्रता जाणून घेण्यासाठी  सैनिक कल्याण कार्यालयास भेट दयावी, असे आवाहन मेजर सुभाष सासने  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000



सैन्यदलात अधिकारी पदाच्या
भरतीसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण
नांदेड, दि. 14 :-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये  अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी मंगळवार 5 जून ते गुरुवार 14 जून 2018 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 46 चे आयोजन करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे सोमवार 28 मे 2018 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या संकेतस्थळावर www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Cheek List आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन आणावे.
केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एकझामिनेशन (युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी  प्रमाणपत्र किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी नंबर 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


जीईएम पोर्टल वापराबाबत
उद्योग भवन येथे बुधवारी कार्यशाळा     
            नांदेड, दि. 14 :- शासनाच्या गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस या वेब पोर्टलची माहिती सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालय, उत्पादक व पुरवठादारांना व्हावी व त्यानुसार त्यांनी त्याचा वापर करावा, यादृष्टिने एक दिवसीय कार्यशाळा बुधवार 16 मे 2018 रोजी उद्योग भवन सभागृह नांदेड येथे आयोजित केली आहे.
या कार्यशाळेत पुणे येथील हेमंत सुद्रीक, GeM's Consultant हे मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा उद्योग भवन सभागृह पहिला मजला शिवाजीनगर नांदेड येथे उत्पादक व पुरवठादारांसाठी सकाळी 11 वा. तर शासकीय निमशासकीय कार्यालय (खरेदीदार) यांचेसाठी दुपारी 2 वा. आयोजित केली आहे. संबंधितांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन अधिक्षकीय उद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
केंद्र शासनाने शासकीय खरेदीदार विभांगाकडून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी Government e-Market Place (GeM) हे पोर्टल विकसीत केले आहे. राज्याच्या उद्योग उर्जा व कामगार विभागाने दि. 24 ऑगस्ट 2017 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे GeM या वेब पोर्टलद्वारे खरेदीची कार्यपद्धती स्विकृत करुन लागू केली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


जिल्हा नियोजन समितीची 21 मे रोजी बैठक  
            नांदेड, दि. 14 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार 21 मे 2018 रोजी दुपारी 12.30 वा. आयोजित करण्यात करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संपन्न होणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...