Saturday, July 3, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 14 व्यक्ती कोरोना बाधित तर 21 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 651 अहवालापैकी  14 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 11 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 267 एवढी झाली असून यातील 88 हजार 667 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 101 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, लोहा तालुक्यात 2, हदगाव 1, भोकर 3, परभणी 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, भोकर तालुक्यात 1, लोहा 1 असे एकूण 14 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 21 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मुखेड कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन, गृह विलगीकरण व जम्बो कोविड सेंटर मधील 10, अर्धापूर तालुक्यांतर्गत 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 101 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, देगलूर कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 48, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 40 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 126, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 13 हजार 928

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 10 हजार 972

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 267

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 667

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.15 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-18

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-81

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-101

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3                       

00000

 

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेशाच्या सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- आरोग्य वैद्यकिय क्षेत्रा साथच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दू व्हावा यासाठी नांदेड जिल्ह्या2021 करिता मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवक-युवतींनी मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमा आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.   

या कार्यक्रमाच्या माध्यमातू आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींना जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, वैद्यकीय संस्था तसेच 20 पेक्षा अधिक बेडची सोय असणारी रुग्णालये या कार्यक्रमांतर्गत व्यवसायि प्रशिक्षण संस्था म्हणू सुचिबद्ध होऊन त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास पात्र होऊ शकणार आहेत. हे संपुर्ण प्रशिक्षण उमेदवार, लाभार्थ्यांना पूर्णपणे नि:शुल्क असू सुचिबद्ध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणाचे शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येईल. 

या कार्यक्रमांतर्गत अधिकृत प्रशिक्षण केंद्राचे नाव डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे उपलब्ध अभ्यासक्रम (कोर्सेस) एमरजंसी मेडीकल टेक्निशीएन - बेसीकसाठी  शैक्षणिक पात्रता 12 विज्ञान. जनरल ड्यूटी असिस्टंट- 8 वी, होम हेल्थ एड- 8 वी, फ्लेबोटॉमीस्ट- 12 वी शैक्षणिक पात्रता असावी. 

एसजीजीएस स्मारक शासकीय रूग्णालय शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नांदेड येथे उपलब्ध अभ्यासक्रम (कोर्सेस) सेंन्ट्रल स्ट्राइल सर्व्हिस डिपार्टमेंट असिस्टंटसाठी शैक्षणिक पात्रता 12 विज्ञान, हॉस्पीटल फ्रंट डेस्क कॉर्डिनेटर-12 वी, मेडिकल इक्यूपमेंट टेक्नॉलजी असिस्टंट- आयटीआय/डिप्लोमा संबधीत क्षेत्राशी, मेडिकल रिकॉर्ड ॲन्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन- 12 विज्ञान. 

शासकीय महिला रूग्णालय श्यामनगर नांदेड येथे उपलब्ध अभ्यासक्रम (कोर्सेस) फ्लेबोटॉमीस्ट- 12 वी, ड्रेसर (मेडिकल)- 10 वी, जनरल ड्यूटी असिस्टंट- 8 वी, जनरल ड्यूटी असिस्टंट-ॲडव्हांन्स- 10 वी, मेडिकल रिकॉर्ड ॲन्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन- 12 विज्ञान, सॅनेटरी हेल्थ एड- 10 वी. 

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय वजिराबाद नांदेड उपलब्ध अभ्यासक्रम (कोर्सेस) असिस्टंट योगा इंन्स्ट्रक्टर- 8 वी, आयुर्वेदा आहार ॲन्ड पोशक सहायक- 10 वी, आयुर्वेदा डायटीशीयन बीएएमएस, कुपिंग थेरपी असिस्टंट- 10 वी, क्षारा कर्मा टेक्निशियन- 10 वी, पंचकर्मा टेक्निशियन- 12 वी, योगा थेरपी असिस्टंट- 12 वी, योगा वेलनेस ट्रेनर- 12 वी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे  याबाबत अधिक माहितीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 येथे संपर्क साधावा, असेही आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.  

00000

 जिल्ह्यातील 62 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 62 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. रविवार 4 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

कोविशील्ड लसीचे मनपा क्षेत्रातील शहरी दवाखाना कौठा येथे 80 डोस, शहरी दवाखाना जंगमवाडी व दशमेश हॉस्पिटल येथे प्रत्येकी 50 डोस, शहरी दवाखाना करबला व अरबगल्ली येथे प्रत्येकी 40 डोस तर शहरी दवाखाना सांगवी येथे 20 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

मनपा क्षेत्रातील स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको या 7 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. श्री गुरुगोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना कौठा, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 9 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 80 डोस उपलब्ध आहेत.  

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय बिलोली, कंधार, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, उमरी या 10 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 9 प्राथमिक आरोग्य केंद्रावर 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 2 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 21 हजार 25 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 3 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 92 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 55 हजार 660 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 48 हजार 590 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...