Monday, November 29, 2021

 आता काळजी घ्याल तरच पुढे एकमेकांना सावरू

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

· कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून सावरण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाचे सक्तीचे निर्देश 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोरोनाच्या धोक्यापासून सावरत असतांना जगभर नवीन धोकादायक ओमीक्रोम नावाचा कोरोना विषाणू युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रिया, युके व इतर युरोपीयन देशात थैमान घालत आहे. त्याचा झपाट्याने होणारा प्रसार यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. कोरोनापेक्षा हा नवीन विषाणू पाचशेपट अधिक घातक असल्याने आता सर्वच नागरिकांनी लसीकरण आणि मास्कसह दैनंदिन जीवनात पंचसुत्री वापरल्याशिवाय तरणोपाय नाही. आता काळजी घेऊ तरच एकमेंकांना सावरू या स्पष्ट शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्हावासियांना आवाहन केले आहे. 

जिल्ह्यात लसीकरणाबाबत सर्वच स्तरातून एक उदासीनता दिसून येत आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्ह्यातील  प्रत्येक आरोग्य केंद्रांवर लसीकरणासाठी सर्व सुविधा तत्पर ठेवलेली आहे. वेळोवेळी नागरिकांना आवाहनही केले जात आहे. असे असूनही नांदेड जिल्ह्यातील असंख्य लोक आपला बेजबाबदारपणा सोडयला तयार नाहीत. लोकांनी येऊ घातलेला कोरोनाचा विषाणू लक्षात घेता आपल्या वर्तणातून आपण जबाबदार नागरीक असल्याचे कर्तव्य पार पाडावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी कारण नसतांना वाढणारी गर्दी व लोकांची वर्दळ ही चिंतेची बाब आहे. यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावर स्पष्ट आदेश निर्गमीत केले असून विविध सेवा प्रदाते व आस्थापना, यंत्रणा यांच्यावर आदेशान्वये जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यात कसूर दिसल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारू असे त्यांनी सांगितले. 

किरकोळ व घाऊक दुकानदार, मॉल, मोंढा येथे विक्रेते

सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:च्या दुकानातील कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे.

 पेट्रोल पंप

सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व पंपावरील कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे. 

हॉटेल्स आणि परमीट रूम

सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे, हॉटेल्स व परमीट रुम मधील कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री करावी. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (शासकीय व खाजगी)

सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व चालक-वाहक, इतर कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रवाशांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे. 

सेतू सुविधा केंद्र

सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे.  

हातगाडीवाले, फळे, भाजीपाला, मांस विक्रेते, आठवडी बाजारातील सर्व विक्रेते

सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे. 

हमाल व माथाडी कामगार

सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे. 

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था, अभ्यागत

सर्व कार्यालय प्रमुखांनी स्वत:चे व अधिनस्त सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित अभ्यागतांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे. तसेच कार्यालयातील सर्वांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र आस्थापनाकडे असल्याची खात्री करुन त्याची लेखी नोंद ठेवणे आवश्यक आहे.  

सर्व शाळा व महाविद्यालय सर्व खाजगी शिकवणी वर्ग

सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी स्वत:चे व अधिनस्त सर्व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी तसेच संबंधित 18 वर्षावरील विद्यार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे. तसेच कार्यालयातील सर्वांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र आस्थापनाकडे असल्याची खात्री करुन त्याची लेखी नोंद ठेवणे आवश्यक आहे.    

गॅस पुरवठादार, रास्त दुकानदार व ग्राहक

सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व अधिनस्त कर्मचारी तसेच त्यांच्या ग्राहकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे. 

सर्व जबाबदार यंत्रणांनी फिरते तपासणी / पडताळणी पथक तयार करुन कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन करणारे सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती यांची आकस्मिक तपासणी / पडताळणी करुन त्यांना शास्ती करावी. तसेच सेवा प्रदाते व व्यक्ती यांचे कोविड लसीकरण असल्याचे सुद्धा खात्री करावी. सर्व सेवा प्रदाते यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करताना आवश्यक असलेल्या वस्तू हॅड सॅनिटायजर, साबण, पाणी व तापमापक आदी गोष्टी उपलब्ध करुन घ्याव्यात.    

अन्यथा असे असेल दंडाचे स्वरुप

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस प्रतीप्रसंगी 500 रुपये इतका दंड राहील. सेवा प्रदाते / संस्था  यांनी आपले अभ्यागत व ग्राहक इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे आढळल्यास त्या व्यक्तीवर दंड याव्यतीरिक्त अशा संस्थाना/आस्थापनांना 10 हजार रुपये दंड करण्यात यावा. एखाद्या संस्थेने तसेच सदर संस्था वारंवार या कर्तव्यात कसूर करत असेल तर ती संस्था / आस्थापना कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत किमान दोन दिवस बंद करण्याबाबत आदेशीत केले आहे.   

सेवा प्रदाते / संस्था  यांनी कोविड अनुरूप वर्तन करणे अपेक्षित आहे. यामध्ये कसूर आढळल्यास अशा संस्था/आस्थापनांना 50 हजार रुपये इतका दंड करण्यात यावा. एखाद्या संस्थेने तसेच सदर संस्था वारंवार या कर्तव्यात कसूर करत असेल तर ती संस्था / आस्थापना कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत किमान बंद करण्याबाबत आदेशीत केले आहे.   

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (चारचाकी वाहन, बस इत्यादी) यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न केल्यास कसूर करणाऱ्या व्यक्तींना 500 रुपये इतका दंड व सेवा पुरवठादार  यांना 500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल.

 0000

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 683 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 486 एवढी झाली असून यातील 87 हजार 809 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 24 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1, असे एकुण 1 बाधित आढळला. आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2, व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  

आज 24 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गंत गृह विलगीकरण 20, खाजगी रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 74 हजार 399

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 70 हजार 454

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 486

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 809

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-24

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1.  

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 

 लसीकरण प्रमाणपत्राशिवाय

प्रवाशांच्या वाहतुकीला मनाई 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतुक करू नये अन्यथा दंड आकारण्यात येईल, असे आवाहन सर्व खाजगी व सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनचालक-मालकांना प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

राज्य शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड यांनी परिपत्रक निर्गमीत केले आहे. जगात सध्या कोरोनाचा नवीन धोकादायक व्हेरीएंट ओमीक्रोनचे संकट असून त्याच्या वाढत्या प्रभावास तोंड देण्यासाठी 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक / खाजगी वाहनांतून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहनचालक, मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोवीड लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक पुरविणाऱ्या वाहन मालकांनी कोवीड अनुरूप वर्तनाचे पालन न केल्यास कसूर करणाऱ्यास व सेवा पुरवठादार यांना 500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. बसेसच्याबाबतीत कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी 10 हजार रुपये इतका दंड आकारण्यात येईल. 

वारंवार या कर्तव्यात कसूर होत असेल तर कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लॉयसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन किमान दोन दिवस बंद करण्यात येईल. याची दक्षता सर्व खाजगी तसेच सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा / टॅक्सी / बस / जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक, मालक व प्रवासी यांनी घ्यावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 बिनवादाचे बदल अर्ज निकाली

काढण्यासाठी विशेष मोहिम 

नांदेड (जिमाका) दि. 29:- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत सोमवार 13 डिसेंबर ते शुक्रवार 24 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रलंबित असलेले बिनवादाचे बदल अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम धर्मादाय सहआयुक्त औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे. सर्व संबंधित विधिज्ञ व पक्षकारांनी बदल अर्ज निकाली काढण्यासाठी कार्यालयास सहकार्य करावे असे, आवाहन धर्मादाय उप आयुक्त किशोर वसंतराव मसने यांनी केले आहे.

0000 

 जागतिक मृदा दिन 5 डिसेंबरला साजरा करावा

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांचा त्याबरोबर पाण्याच्या अति वापरामूळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. याचाच विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना पीक उत्पादन व मृदाबाबत माहिती होण्यासाठी मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण 5 डिसेंबर मृदा दिनाच्या निमित्ताने करण्याचे नियोजन आहे. 

कोविड-19 चा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सुरक्षिततेचा उपाययोजना म्हणून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. पुणे कृषि आयुक्तालयाने दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यात 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील संबंधित विभागाना दिले आहेत.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...