Friday, August 4, 2017

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा दौरा 
           नांदेड दि. 4 :- राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे नांदेड  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शुक्रवार 4 ऑगस्ट 2017 रोजी औरंगाबाद येथुन शासकीय वाहनाने रात्री 11 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
            शनिवार 5 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 9 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत शिवसेना पदाधिकारी यांचे समवेत बैठक. सायं. 4.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायं. 5 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन शासकीय वाहनाने शिर्डी जि. अहमदनगरकडे प्रयाण करतील.
000000
           
पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
           नांदेड दि. 4 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

            शनिवार 5 ऑगस्ट 2017 रोजी देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी सोईनुसार जालनाकडे प्रयाण करतील. 
000000
रेल्वे भूसंपादन : महसूल राज्यमंत्री संजय राठोड घेणार सुनावणी
* वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी जाणून घेणार
* 25 ऑगस्टपर्यंत मागविल्या तक्रारी व आक्षेप
यवतमाळ, दि. 4 :-  वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाकरीता या तिन्ही जिल्ह्यात संपादित करण्यात आलेल्या जमिनीसंदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सामूहिकरितीने सोडविण्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासंदर्भात लवकरच सुनावणी घेणार आहेत.
सन 2009 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाचे भूमिपूजन यवतमाळात झाले होते. त्यानंतर या रेल्वेमार्गासाठी या तिन्ही जिल्ह्यात भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. सध्या हे काम  प्रगतीपथावर असून अनेक गावांमधील नागरिकांनी रेल्वे भूसंपादनासंदर्भात होत असलेल्या अनियमिततेबाबत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी ना. संजय राठोड, भूसंपादन विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथे सुनावणी होणार आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या अडचणी, तक्रारी, आक्षेप येत्या 25 ऑगस्टपर्यंत ना. संजय राठोड यांचे जनसंपर्क कार्यालय, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, गोदणी रोड यवतमाळ येथे पाठवाव्या. तक्रार अर्ज, सोबत सर्व कागदपत्रं, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी सर्व माहिती अर्जासोबत दोन प्रतित जोडून प्रत्यक्ष, पोस्टाने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000000

खाजगी उपसा सिंचन परवानगीसाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 4 :- कोल्हापुरी बंधारे, बॅरेजेस व कालवा नसलेले साठवण तलावातील पाणी वापरासाठी सर्व लाभधारकांनी 15 ते 30 ऑगस्ट 2017 या कालावधीत उपसा सिंचन परवाने, मंजुरी प्रस्ताव, अर्ज सात-बारा व 8 अ उताऱ्यासह संबंधीत प्रकल्पांचे सिंचन शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.
उपसा सिंचनासाठी शासनाच्या महाऑनलाईन या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. प्रस्तावाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांची 5 सप्टेंबर रोजी शाखा कार्यालयात परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील नांदेड पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारितील कोल्हापुरी बंधारे, बॅरेजेस व कालवा नसलेले साठवण तलावात दरवर्षी जवळजवळ 100 टक्के पाणीसाठा निर्माण होत असतो. या पाणी साठ्याचा उपयोग लाभार्थ्यांनी स्वत: उपसा करुन घ्यावयाचा आहे. या पाणी वापरासाठी आवश्यक परवाने लाभार्थ्यांनी घेतले नसल्याचे दिसुन आले आहे. पाणी साठ्याचा पुरेपुर वापर होण्याच्या दृष्टिने सचिव (लाक्षेवि) यांचे सुचनेनुसार या प्रकल्पांवर शाखानिहाय शिबिराचे आयोजन करुन वैयक्तिक उपसा सिंचन परवाने, मंजुरी देण्याची कार्यवाही करण्याची मोहिम हती घेण्यात आली आहे.

000000
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा दौरा
           नांदेड दि. 4 :- राज्याचे परिवहन, खारभुमी विकास मंत्री दिवाकर रावते हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शुक्रवार 4 ऑगस्ट 2017 रोजी औरंगाबाद येथुन रात्री 9.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, मुक्काम व राखीव.
            शनिवार 5 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन शासकीय मोटारीने विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वा. नांदेड येथुन विमानाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.

000000

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...