Thursday, June 27, 2019

प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2019-20 शेतकऱ्यांना 24 जूलै पर्यंत विमा प्रस्ताव भरण्याचे आवाहन



नांदेड दि. 27 :-  प्रधनमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019-20 हंगामात राबविण्या बाबत / बिगरकर्जदार शेतकऱ्यांना लागू राहणार आहे.भात, ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मुग, तुर, भुईमुग, कारळ, तीळ, सोयाबीन,सुर्यफुल व कापूस या पिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्याची अंतिम मुदत 24 जुलै,2019 आहे. तरी विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वरील योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहिती साठी संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  उपविभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी / जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक / राष्ट्रीयकृत बँक अथवा ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
00000 

विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थावर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी प्रशासक यांचे पॅनेलसाठी अर्ज करावेत



नांदेड दि. 27 :-  विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था लातूर विभागातील सकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲण्ड ए) उच्चतम सहकार पदविका ( एच.डी.सी.) धारक चार्टड अकाऊंट्ट  (सी.ए.) इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट ॲण्ड वर्कस अकाऊंट्ट  (आय.सी.डब्ल्यू.ए.)कंपनी सेक्रेटरी (सी.ए.)सहकार खात्यातील प्रशासन/लेखापरिक्षण र्विभागातील अधिकारी / कर्मचारी नागरी / कर्मचारी सहाकारी बँकेमध्ये व्यवस्थापक यांचेकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्जाचे विहीत नमुने विभागातील विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था लातूर विभाग लातूर ,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था लातूर / उस्मानाबाद / बीड / नांदेड व लातूर विभागातील सर्व विभागील सर्व  तालूका  उपनिबंधक  सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात दिनांक 27 जून,2019 ते 31 ऑगस्ट,2019 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. याबाबतची जाहीर सूना या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. असे  श्रीकांत  देशमूख ,विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000 

शासकीय अध्यापक महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यंती साजरी



नांदेड दि. 27 :-  शासकीय अध्यापक महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून 26 जून रोजी साजरी करण्यात आली.
छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यावर प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी प्रकाश टाकला. पुरोगामी महाराष्ट्राला राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराची गरज आहे. त्यांचे विचार समाजात रुजल्यास जाती-जातीमध्ये सामाजिक दरी निर्माण होणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जातील. शेतीवरील उद्योग व्यवसायाची वाढ होऊन शेतकरी सुखी होतील. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला अधिक प्राधान्य देवून गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, राहण्याची सोय मोफत करुन दिली. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक विचार घेऊन अधिक शिक्षण घ्यावे, असे आवाहन डॉ. रोडगे यांनी सांगितले.  
प्रास्ताविक डॉ. विठ्ठल घोनशेटवाड यांनी केले. यावेळी डॉ. सय्यद शाकेर, डॉ. हारुण शेख, डॉ. मुरुमकर, शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
00000  

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील पुनर्मूल्यांकन गुणात बदलाबाबत आवाहन



नांदेड दि. 27 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागीय मंडळ लातूर या कार्यालयाकडे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2019 साठी पुनर्मूल्यांकनात ज्या विद्यार्थ्यांना गुणात बदल झाल्याबाबतचे पत्र देण्यात आली आहेत, त्यांनी पत्राची प्रत संबंधीत अभ्यासक्रमाच्या सुविधा केंद्रावर (F.C.) सादर करावीत, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील पुनर्मूल्यांकन गुणात बदलाबाबत आवाहन



नांदेड दि. 27 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागीय मंडळ लातूर या कार्यालयाकडे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2019 साठी पुनर्मूल्यांकनात ज्या विद्यार्थ्यांना गुणात बदल झाल्याबाबतचे पत्र देण्यात आली आहेत, त्यांनी पत्राची प्रत संबंधीत अभ्यासक्रमाच्या सुविधा केंद्रावर (F.C.) सादर करावीत, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000

बालकासाठी कार्यरत संस्थांना नोंदणी प्रमाणपत्राच्या त्रुटीचे आवाहन


नांदेड दि. 27 :- विधीसंघर्षग्रस्त आणि काळजी संरक्षणाची गरज असलेल्या बालकासाठी कार्यरत इच्छुक स्वयंसेवी, शासकीय संस्थाना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. ऑनलाईन, ऑफलाईन सादर केलेल्या प्रस्तावापैकी ज्या संस्थाच्या प्रस्तावामध्ये 10 टक्के पेक्षा कमी त्रुटी आहेत, अशा संस्थांनी त्रुटीची पुर्तता बुधवार 3 जुलै 2019 पर्यंत संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करावीत, असे आवाहन माहिला व बालविकास कार्यालयाकडून करण्यात आले आहे.  
बालन्याय (मुलांची काळजी संरक्षण) अधिनियम 2015 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी संरक्षण) नियम 2018 अंतर्गत कलम 41 (1) अंतर्गत विधीसंघर्षग्रस्त आणि काळजी संरक्षणाची गरज असलेल्या बालकासाठी कार्यरत इच्छुक असणाऱ्या राज्यातील सर्व स्वयंसेवी शासकीय संस्थाना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. राज्यातुन ऑनलाईन / ऑफलाईन 893 संस्थेनी अर्ज 20 मे 2018 पर्यंत सादर केले होते. त्यापैकी 131 संस्थांना दिनांक 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित संस्थेच्या प्रस्तावामध्ये (ऑनलाईन अर्ज क्रमांक 1 ते 713 पैकी ऑफलाईन अर्ज क्रमांक 1 ते 180 पैकी) आढळून आलेल्या त्रुटीबाबत संबंधी संस्थेना अवगत करण्यात आले आहे. बुधवार 3 जुलै 2019 या मुदतीनंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे त्रुटीपुर्तता स्विकारल्या जाणार नाहीत, असे आवाहन आयुक्त महिला बाल विकास पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000

कृषि दिन कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन



नांदेड दि. 27 :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कै. यशंवतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे सोमवार 1 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...