Monday, November 30, 2020

 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक- 2020

या चार मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल  

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 ची मतदान प्रक्रिया मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यत पार पडणार आहे. नांदेड जिल्‍हयात या निवडणूकीसाठी मतदान केंद्राच्‍या अंतिम यादीनूसार 114 + 9 सहायकारी असे एकूण 123 मतदान केंद्र अंतिम करण्‍यात आले आहेत. यातील चार मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

 

यात केंद्र क्र. 358 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथील केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कार्यालय रुम नंबर 1 नांदेड येथे करण्यात आले आहे.

 

केंद्र क्र. 358 अ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथील केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कार्यालय रुम नंबर 2 नांदेड (सहायकारी मतदान केंद्र) येथे करण्यात आले आहे.

 

केंद्र क्र. 362 नरसिंह विद्यामंदिर जयभिमनगर नांदेड येथील मतदान केंद्र शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्‍था रूम नं. 1 नांदेड येथे करण्यात आले आहे.

 

केंद्र क्र. 365 जिल्हा परिषद शाळा चौफाळा येथील मतदान केंद्र मदीना उल तलुम उच्‍च माध्‍यमिक शाळा रूम नं. 1 देगलुर नाका, नांदेड येथे करण्यात आले आहे. या ठिकाण बदलाची नोंद घेऊन पात्र पदवीधर मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

00000

 

ऑनलाईन अर्ज करुनही पिक विमा जमा न झाल्यास

कृषि कार्यालयास करावा संपर्क 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पूर्व सूचना देऊन शासनाच्या निकषाचे पालन केले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यास त्यांनी तालुका कृषि कार्यालय किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. यात अनेक प्रकरणात बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याने विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे निदर्शनास येत आहे. 

नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2020 मध्ये काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिक विम्याच्या निकषानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट, भुस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार केले होते. ऑनलाईन पध्दतीने ईमेल, ॲप व टोल फ्री क्रमांकाद्वारे तसेच विमा कंपनी, कृषि विभाग व महसुल विभाग यांच्याकडे नुकसानीची पुर्व सूचना देण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार जिल्ह्यातील साधरणत: 64 हजार शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पुर्वसुचना कंपनीस दिल्या होत्या. या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करुन त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याच काम संबंधित विमा कंपनीतर्फे चालु आहे. 

ज्या शेतकऱ्यांचे पिक कापुन शेतात ठेवल्यानंतर (काढणी पश्चात) पावसामुळे पिकाचे नुकसान झाले होते असे साधारणत: 12 हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीस पुर्व सुचना दिल्या होत्या. त्या शेतकऱ्यांचे देखील विमा कंपनीद्वारे नुकसान भरपाई देण्याचे काम सुरु आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या बाबीसाठी विमा कंपनीने 64.89 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली असून ज्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे सुचना दिली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येत आहे. 

सरसगट पिक विमा हा उत्पादनाच्या आकडेवारीवर आधारीत असतो. मागील सात वर्षातील सर्वोत्तम पाच वर्षाच्या सरासरीचे 70 टक्के एवढे उंबरठा उत्पन्न काढले जाते. चालु वर्षाच्या उत्पादकतेची आकडेवारी काढण्यासाठी प्रत्येक महसुल मंडळामध्ये 12 पिक कापणी प्रयोग महसुल जिल्हा परिषद व कृषि विभागामार्फत घेतले जातात. चालु वर्षाच्या उत्पादकतेच्या सरासरीची  उंबरठा उत्पादनाशी तुलना केली असता ज्या महसुल मंडळामध्ये चालु वर्षाची उत्पादकता उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी येते तेथे त्या तुलनेत पिक विमा लागु होतो. ही आकडेवारी सर्व यंत्रणांकडून गोळा करुन पिक विमा कंपनीस सादर करण्याचे काम सुरु आहे. सदरील आकडेवारी विमा कंपनीस पोहोचल्यानंतर साधारनत: एक महिन्यानंतर उत्पादकता कमी आलेल्या महसुल मंडळामध्ये पिक विमा मंजूर होणार आहे.

00000

 

 

पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदानासाठी

1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा

औरंगाबाद, दिनांक 30 (विमाका) :- औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2020 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबर 2020 रोजी कर्मचाऱ्यांना नैमित्तीक रजा मंजूर करावी. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवार, दि.1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून पदवीधर कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी, ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

****

 

 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

मतदारांनो मतदानाचा हक्क बजावून लोकशाही भक्कम करा

मतदानासाठी ही 9 कागदपत्रे ग्राह्य   

नांदेड (जिमाका) दि. 30 :- निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी  पत्रकानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 साठी मतदारांना सुकर मतदान करता यावे यासाठी पुढील 9 कागदपत्रे मतदाराची ओळख म्हणून पटविण्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातील. यात 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) पारपत्र (पासपोर्ट) 5) केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक संस्थेने वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) मा. खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाने वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र हे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अंतिम करण्यात आलेल्या मतदार यादीतील पात्र उमेदवारांना या 9 पुराव्यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करता येईल. सर्व पदवीधर मतदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.

0000

 

28 कोरोना बाधितांची भर तर

23 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सोमवार 30 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 28 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 23 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या एकुण 1 हजार 37 अहवालापैकी 973 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 388 एवढी झाली असून यातील 19 हजार 257 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 388 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 549 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5, भोकर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, खाजगी रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9, मुखेड तालुक्यांतर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1 असे एकूण 23 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, लोहा तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 2, किनवट 2 असे एकुण 15 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, माहूर तालुक्यात 1, देगलूर 1, मुखेड 1 असे एकुण 13 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 388 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 34, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 34, मुखेड कोविड रुग्णालय 17, किनवट कोविड रुग्णालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 10, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 86, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 132, खाजगी रुग्णालय 34 आहेत. 

सोमवार 30 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 169, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 75 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 52 हजार 34

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 26 हजार 898

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 388

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 257

एकूण मृत्यू संख्या- 549

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-13

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-437

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-388

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...