Tuesday, January 20, 2026

वृत्त क्रमांक 73

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न

नांदेड, दि. २०- हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गौरवशाली इतिहासाची, अतुलनीय बलिदानाची व समाजहितासाठी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने नांदेड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत जिल्हाभरातील शाळांमध्ये चित्रकला, वक्तृत्व, गायन व निबंध अशा चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शालेय व तालुकास्तरावरील निवड प्रक्रियेनंतर प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात आले होते.

आज नांदेड येथील गुरु ग्रंथसाहेबजी भवन येथे या जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

या स्पर्धांचे कामकाज जिल्हा निवड समिती यांच्या देखरेखीखाली पार पडले. समितीमध्ये डॉ. अमोल निळेकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिदास बस्वदे  यांचा समावेश होता. तसेच सचखंड पब्लिक स्कूलचे प्राचार्य अनिल कौर खालसा यांनी गुरु ग्रंथसाहेबजी भवन व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

या स्पर्धेतून निवड झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

०००००



वृत्त क्रमांक 72

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात 

बहिरेपणा असलेल्या बालकांना श्रवणयंत्र वाटप  

नांदेड, दि. २० जानेवारी :- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत आयोजित शिबिरात नांदेड जिल्ह्यातील ७३ बालकांची तपासणी करण्यात आली असून ६० श्रवणयंत्रासाठी पात्र झालेल्या बालकांना आज २० जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या हस्ते श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहे. या बालकांना वेळेत श्रवणयंत्र उपलब्ध करून दिल्याने त्या बालकांना ऐकू येण्यास मदत होणार असल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्याने व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील ४५ आरोग्य पथकांद्वारे वर्षातून २ वेळा अंगणवाडीतील व एकवेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ० ते १८ या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात. 

याचाच एक उपक्रम म्हणून १६ ऑक्टोबर २०२५  रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली जन्मजात बहिरेपणाचा आजार असलेल्या बालकांचे तपासणीचे शिबीर जिल्हा रुग्णालय नांदेड येथे घेण्यात आले होते. 

हृदयरोग तपासणी (2D ECHO) ,नेत्र रोग, आकडी/फेफरे यांची मोठ्याप्रमावर शिबिरे आयोजीत करून निदान व औषधोपचार करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक मुला-मुलीना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो.  तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत ० ते ०६ वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळलयास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे. 

या शिबिरासाठी अनिल कांबळे RBSK समन्वयक, विठ्ठल तावडे DEIC व्यवस्थापक, श्रीमती अनिता चव्हाण तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेतले.

0000





विशेष वृत्त क्रमांक 71

श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शाहिदी समागमाच्या निमित्ताने नांदेडमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रभक्तीचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नांदेड, दि.२० जानेवारी :- श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शाहिदी समागमाच्या निमित्ताने ‘हिंद दी चादर’ अंतर्गत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. हा दोन दिवसीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होणार असून यामध्ये देशभरातून १० ते १२ लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

या ऐतिहासिक कार्यक्रमाला  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मंत्रीसंत-महंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विविध समाजघटकांचा सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असून सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव वारकरी संप्रदायातील मोठ्या संख्येने नागरिक या समागमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांपर्यंत व तरुण पिढीपर्यंत देशासाठी बलिदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांची माहिती पोहोचवणे हा आहे. श्री गुरु तेग बहादूरजी यांनी धर्म, मानवता व राष्ट्रासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आजच्या पिढीपर्यंत पोहोचल्यास त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती, त्याग व सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ होईल, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नमूद केले.

दि. २५ जानेवारी रोजी होणारा मुख्य कार्यक्रम यशस्वी करून श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या बलिदानाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. या भव्य समागमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक मूल्यांचा जागर करण्यात येणार असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

***




 विशेष वृत्त क्रमांक 69 

दिव्यांगतेवर मात करत कलागुणांचा उत्सव नांदेडमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

 

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

 

नांदेडदि. 20 जानेवारी :- दिव्यांग कल्याण आयुक्तालयजिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात भव्य व प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सुमारे ५८ मुकबधीरअंधमतिमंद व अपंग विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सशक्त दर्शन घडविले.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी महान समाजसुधारिका हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेसामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावारमाध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगरनियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडेजिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवारसहाय्यक संचालक दिनकर नाठेअधिक्षक बळीराम येरपूलवारमाजी प्राचार्य पंजाबराव अंभोरेडॉ. सान्वी जेठवाणीभार्गवी देशमुखसुधीर फुसांडेरमेश वडगावकरसीएम फेलो भार्गवी मुंढेअर्थव मुळकमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाडशुभम तेलेवारजनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारेसाईचरण मुगावे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दिव्यांगतेवर मात करत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण प्रेक्षागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. ‘गाडी झुमक्याची’, ‘शेतकरी नृत्य’, ‘चला जेजुरीला जाऊ’, ‘राधे-राधे’, ‘मल्हारी मिक्स’, ‘दैवत छत्रपती’, ‘दोनच राजे इथे गाजले’, ‘काठी न घोंगड घेऊद्या की’, ‘राणू मुंबई की राणू’, ‘आदिवासी ठेमसा’, ‘आया रे तुफान-छावा’, ‘रिमिक्स जलवा’, ‘माऊली-माऊली’ तसेच गरीब मुलांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षावर आधारित सादरीकरणभावगीतलावणी व गीतगायन अशा विविध सादरीकरणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासजिद्द व कलागुणांचे विशेष कौतुक करत दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केल्याचे प्रतिपादन केले.

 

याच कार्यक्रमात नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद दी चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त होणाऱ्या भव्य विशेष कार्यक्रमाबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. या संदर्भातील माहिती देऊन संबंधित गीत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मुरलीधर गोडबोले यांनी केलेतर निखिल किरवले व सारिका सावळे यांनी दुभाष्य म्हणून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

00000











 विशेष वृत्त क्रमांक 68 

350 व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी आरोग्य विभाग सज्ज

भाविकांसाठी मोफत तपासणी व आपत्कालीन सेवा उपलब्ध

 

नांदेडदि. 20 जानेवारी – नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी विविध विभागांमार्फत सेवा स्टॉल उभारण्यात येत असूनआरोग्य विभागानेही जय्यत तयारी केली आहे. आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य सेवांचे स्टॉल उभारण्यात येणार असूनया सेवांचा लाभ भाविक व नागरिकांनी जास्तीत जास्त घ्यावाअसे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय एम. पेरके यांनी केले आहे.

 

मुख्य कार्यक्रम २५ जानेवारी २०२६ रोजी असलातरी भाविकांची मोठी उपस्थिती लक्षात घेता २२ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोग्य सेवा व्यवस्थापन राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व शासकीय आरोग्य यंत्रणांसह नांदेड व परभणी जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेशी संलग्न खाजगी रुग्णालये देखील सहभागी होणार आहेत.

 

कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना विविध कामकाजाचे वाटप करण्यात आले असूनकार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना दर्जेदार व तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

 

मुख्य कार्यक्रमस्थळी २ बाह्यरुग्ण विभाग (OPD) तसेच ५ खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात येणार आहे. येथे विविध तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत असंसर्गजन्य रोगकर्करोगदंतरोगमहिलांचे आजार यांची मोफत तपासणीवैद्यकीय सल्ला व औषधोपचार सेवा दिली जाणार आहे. कार्यक्रमस्थळी १० शासकीय रुग्णवाहिका तसेच टोल फ्री क्रमांक १०८ अंतर्गत १५ रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहेत.

 

तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयामार्फत नेत्र तपासणी करून गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार असूनतपासणीअंती वृद्ध नागरिकांना काठीचे वाटप करण्यात येणार आहे.

 

विविध योजनेशी संलग्न खाजगी रुग्णालयांमार्फत नांदेड शहरातील प्रमुख मार्गवाहनतळतसेच विशेषरित्या उभारण्यात आलेल्या निवासस्थानी भाविकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यापक जनजागृतीसाठी जिल्हातालुका व ग्रामीण स्तरावर अरुणोदय सिकल सेल तपासणी शिबिरेरक्तक्षयअसंसर्गजन्य रोगवृद्ध व बालकांची आरोग्य तपासणीआर.के.एस.के. कार्यक्रम तसेच आभा कार्ड निर्मिती यांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

 

याशिवाय डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयविष्णुपुरीशासकीय आयुर्वेद महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयनांदेड येथे विशेष राखीव खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.

 

नांदेड येथे शहीदी समागम कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना सर्वतोपरी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णतः सज्ज असूननागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

 विशेष वृत्त क्रमांक 67 

सेवा स्टॉलच्या माध्यमातून सेवेची सुवर्णसंधी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

हिंद दी चादर शहीदी समागमानिमित्त सेवाभावी संस्था व नागरिकांना आवाहन

 

नांदेडदि. २० जानेवारी :- नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी हिंद दी चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत.

 

या पार्श्वभूमीवरकार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी शहरातील विविध ठिकाणी सेवा स्टॉल्सची उभारणी करण्यात येत आहे. या सेवा स्टॉल्सवर भाविकांसाठी चहापाणीनाश्ताफलाहार आदी सुविधा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

या सेवाकार्यासाठी विविध सेवाभावी संस्थाव्यापारी व व्यावसायिक आस्थापनाउद्योजकशासकीय कार्यालयेबँकिंग क्षेत्र तसेच सेवा देण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक भाविकांना उत्तम सेवा देता यावी यासाठी आणखी जास्तीत जास्त संस्था व नागरिकांनी पुढे यावेअसे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

 

सेवा हीच खरी श्रद्धांजली असूनसेवा स्टॉलच्या माध्यमातून समाजसेवेची संधी सर्वांनी साधावीअसे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

 

सेवा स्टॉल्सच्या नोंदणीसाठी इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयनांदेड येथे तहसीलदार महसूल यांचेशी संपर्क साधावाअसेही त्यांनी कळविले आहे.

00000

 कृपया सुधारित वृत्त :

विशेष वृत्त क्रमांक 70 

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

 

नांदेडदि. २० जानेवारी:- ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावायासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानेकाटेकोर नियोजनासह जबाबदारीने काम करावेअसे स्पष्ट निर्देश नगरविकासपरिवहनसामाजिक न्यायवैद्यकीय शिक्षणअल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

 

नांदेड येथे होणाऱ्या या शताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या आयोजनाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीराज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकसमिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंगविभागीय माहिती उपसंचालकजिल्हा माहिती अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

 

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या कीकार्यक्रमस्थळी पुरेसे पिण्याचे पाणीस्वच्छ व पर्याप्त शौचालय व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी. कार्यक्रमाची प्रचार–प्रसिद्धी व्यापक प्रमाणात करण्यात यावी. स्थानिक स्तरावर होणाऱ्या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आवश्यक असून सोशल मीडियाइलेक्ट्रॉनिक मीडिया व मुद्रित माध्यमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जावीअसेही त्यांनी निर्देश दिले.

 

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व प्रेरणा निर्माण व्हावीयासाठी शाळा स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करावी. तसेच सिनेमागृहांमध्ये भक्तिगीत प्रसारित करणेप्रत्येक जिल्ह्यात होर्डिंग्ज लावून कार्यक्रमाचा संदेश पोहोचवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

मुख्य कार्यक्रमास महिलाज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना सहज सहभागी होता यावेयासाठी पार्किंग क्षेत्रापासून कार्यक्रमस्थळापर्यंत योग्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

 

हिंद दी चादर’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी असरजन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५२ एकर मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाहमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथआंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मंत्रीसंत-महात्मे उपस्थित राहणार आहेतअशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

 

कार्यक्रमाच्या अनुषंगाने मैदानावर युद्धपातळीवर काम सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली असूनमैदानालगत दोन भव्य टेन्ट सिटी उभारण्यात आल्या आहेत. एका टेन्ट सिटीत सुमारे १४ हजार भाविकांची निवास क्षमता असूनयासोबतच शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमस्थळी स्वच्छतास्वयंसेवक व्यवस्थाविविध प्रकारचे मोफत सेवा स्टॉल्सतसेच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५० हजार नेत्र तपासणी व विशेष कर्करोग तपासणी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

 

भाविकांसाठी भव्य लंगर व्यवस्था करण्यात आली असूनयाचा लाभ सुमारे १० लाख भाविकांना घेता येणार आहे. निवासभोजनवाहतूकआरोग्य व सुरक्षा याबाबत सर्व विभाग समन्वयाने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आतापर्यंत करण्यात आलेल्या व पुढील कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्रचार–प्रसिद्धी उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.

00000












विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...