Tuesday, July 26, 2022

 महसूल सहायकास 5 हजाराची लाच घेतांना अटक  

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- तहसिल कार्यालयातील महसूल सहायक संदीपकुमार लक्ष्मणराव नांदेडकर वय वर्षे 42 याला 5 हजाराची लाच स्विकारतांना आज अटक करण्यात आली. 73 वय वर्षे असलेल्या पुरुषाने दिलेल्या तक्रारीवरून लाचलूचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील, सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक राहूल पखाले, पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी कार्यवाही करून लाचेची 5 हजार रक्कम हस्तगत केली.

 

सोमवार 25 जुलै रोजी याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार प्राप्त झाली होती. विभागाने तात्काळ दुसऱ्या दिवशी याची पडताळणी केली. दिनांक 26 जुलै रोजी सापळा रचून आरोपी लोकसेवकास अटक केली. लोकसेवकाने तक्रारदार यांच्या विरुद्ध सीआरपीसी कलम 111 प्रमाणे निघालेल्या नोटीसमध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व नोटीस निकाली काढण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी करून ही रक्कम स्वत: स्विकारली आहे. लोकसेवकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली. या कार्यवाहीमध्ये पोलीस हवलदार हनुमंत बोरकर, पोलीस नाईक गणेश तालकोकुलवार, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर जाधव, पोना सोनटक्के यांनी सहाय्य केले.

 

लाचचेची मागणी कोणी करीत असल्यास

तात्काळ संपर्क साधा - पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्रकुमार शिंदे   

 

नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना नेमून दिलेली कर्तव्य प्रामाणिकपणे बजावली पाहिजेत. कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यक्तीरिक्त अन्य लाचेची मागणी जर कोणी करत असेल तर याची त्वरीत माहिती आम्हाला कळवा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्रकुमार शिंदे यांनी केली आहे. संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

 

डॉ. राजकुमार शिंदे

पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड

संपर्क क्रमांक 9623999944.

 

राजेंद्र पाटील

पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड

संपर्क क्रमांक 7350197197.

 

टोल फ्री क्रमांक 1064

कार्यालयीन दूरध्वनी 02462-253512.  

00000

 नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 129 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, मुदखेड 1, किनवट 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे बिलोली 2 असे एकूण 7 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 101 एवढी झाली असून यातील 1 लाख 367 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 42 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 7  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 2 असे एकूण 9 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 16, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 19, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7 असे एकुण 42 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 12 हजार 188
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 91 हजार 711
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 101
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 367
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.34 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-42
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1
0000

 नागरिकांना अतिवृष्टी काळात

प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- मागील काही दिवसापासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात सर्वदूर नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी मुख्य रस्ते व पुलावरुन पाणी वाहत आहे. रस्त्यावरुन व पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्या ठिकाणाहून वाहतूक करु नये. अशा वेळेस वाहतूक केल्यास व्यक्तीची जिवीतीहानी तसेच त्यांच्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे नागरिकांनी खबरदारी घेवून प्रवास करावा व अनावश्यक रस्ते अपघात टाळावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी  केले आहे.

0000

 शेतकऱ्यांनी रासायनिक खतासोबत

नॅनो युरीया खताचा वापर करावा

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :खरीप हंगाम पेरणीचे कामे जवळपास पुर्ण झालेली आहेत. जिल्हयातील शेतकरी खते खरेदीसाठी बाजारपेठेत चाचपणी करीत आहेत. खताबरोबर नॅनो युरीयाचा वापर केल्यास अधिक फायदेशीर होईल. नॅनो युरीया खताचा नत्राचा नायट्रोजन स्त्रोत आहे. जो पिकांची योग्य वाढ आणि विकासासाठी आवश्यक असणारा एक पोषक घटक आहे. सुक्ष्म कणांसाठी व पाने पुर्ण ओली  होण्यासाठी प्लॅट फॅन किंवा कट नोझल असलेल्या फवारणी पंपाचा वापर करावा. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. ज्यावेळेस दवबिंदु पडलेले नसतील. गरज असल्यास नॅनो युरीया सोबत जैविक उत्तेजक बायोस्टीमुलटस )  शंभर टक्के  विद्राव्य खते आणि कृषि रसायन मिसळावीत. पण मिसळया आणि फवारणी आधी सुसंगता चाचणी करावी. नॅनो युरीया खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी.चलवदे यांनी केले आहे.

 

जगात नॅनो युरीया हा प्रथम इफको तंत्रज्ञान संशोधन संस्था यांनी  गुजरातमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसीत केलेला आहे. संपुर्ण भारतभर वेगवेगळया ठिकाणी व वेगवेगळया पिकांवरती घेण्यात आलेल्या चाचण्यांनुसार हे निश्चित करण्यात आले आहे कीनॅनो युरीयाच्या वापराव्दारे पारंपारिक नत्रयुक्त खतांचा 50 टक्के  पर्यंत वापर कमी करता येऊ शकतो. पारंपरीक पध्दतीने दिल्या जाणाऱ्या युरीया खतामधील फक्त 30-50 टक्के  नत्र हे पिकांना उपलब्ध होते. बाकी नत्र वायुरुपात अमोनियानायट्रस ऑक्साइड हवेत उडुन जाते व नायट्रेट रुपातील जमीन हवा व पाणी प्रदुषित करते.

 

नॅनो युरीया चे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

नॅनो युरीया मुळे उत्पन्नावर कोणताही परिणाम न होता युरीया खताचा वापर कमी होतो. पिकाच्या उत्पादकते मध्ये वाढ व खर्चात बचत यामुळे शेतक-यांना उत्पन्नात वाढ होते. जमीनहवा व पाणी यांची गुणवत्ता सुधारते.नॅनो युरीया मध्ये एकुण वजनाच्या 4 टक्के नत्र आहे. नॅनो युरीया मधील नत्राचा सरासरी आकार हा 30-50 नॅनोमीटर दरम्यान आहे.

 

वापरण्याचे प्रमाण व पध्दत

2-4 मि.लि.नॅनो युरीया एक लिटर पाण्यात मिसळुन दोन वेळेस फवारणी करावी पहिल फवारणी फुटवे फांद्या निपण्याच्या अवस्थेत (उगवल्यानंतर 30-35 दिवसांनी किंवा लागवडी नंतर 20-25 दिवसांनीआणि दुसरी फवारणी फुल निघण्याच्या 7-10 दिवस अगोदर करावी.

0000

 जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाच्या

आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आरक्षणाची सोडत सुधारित कार्यक्रमानुसार गुरुवार 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथील प्रेक्षागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी कळविले आहे.

 

तसेच जिल्ह्यातील किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व देगलूर या तालुका मुख्यालयी  गुरुवार 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता  व तालुका माहूर , हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, नायगांव (खै), लोहा व मुखेड येथे 28 जुलै रोजी दुपारी 4 वाजता संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांचेकडून संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणात पंचायत समिती सदस्य पदांसाठीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. संबंधितानी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000 

 हिमायतनगर नगरपंचायतीच्या

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम-2022 जाहीर केलेला आहे.

 

त्यानुसार हिमायतनगर नगरपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवार 28 जुलै 2022 सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे नियंत्रण अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी या आरक्षण सोडतीच्या सुधारित कार्यक्रमास सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

0000

 दहा नगरपरिषदेच्या आरक्षण व सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील एकूण दहा नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व  सर्वसाधारण महिला आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम 2022 जाहीर केला आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडतीचा सुधारित कार्यक्रम गुरुवार 28 जुलै 2022 रोजी नियंत्रण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.   

 

गुरुवार 28 जुलै रोजी देगलूर नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय देगलूर येथे,  मुखेड नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मुखेड येथेबिलोली नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय बिलोली येथेकुंडलवाडी नगरपरिषदेची सोडत सकाळी 11 वा. उपजिल्हाधिकारी भूसंपादन लसिका नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय कुंडलवाडी येथेधर्माबाद नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय धर्माबाद येथेउमरी नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वाजता उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय उमरी येथेभोकर नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय भोकर येथेमुदखेड नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वा. उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली  तहसिल कार्यालय मुदखेड येथेहदगाव नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालय हदगाव येथेकंधार नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय कंधार येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी या आरक्षण व सोडतीच्या कार्यक्रमास सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.20 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात मंगळवार 26 जुलै 2022 रोजी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 708.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

जिल्ह्यात मंगळवार 26 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 1 (658.60बिलोली-30.60 (762), मुखेड- 22.40 (660.60), कंधार-20.70 (682.30), लोहा-8.10 (635.70), हदगाव-6.20 (634.80), भोकर- 11.70 (804), देगलूर-15.30 (619.90), किनवट-42.30 (773.40), मुदखेड- 1.90 (852.80), हिमायतनगर-25 (929.10), माहूर- 37.30 (646.40), धर्माबाद-48.70 (794.10), उमरी- 17.80 (867.10), अर्धापूर- 00.50 (645.40), नायगाव- 14.50 (648.20मिलीमीटर आहे.

0000

 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :-आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह माहूर येथे आदिवासी मुलांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. या वसतिगृहात शासकीय नियमानुसार इयत्ता आठवी ते पदवीत्तर पदवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहासाठी निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सोईसुविधा शासनाच्यावतीने देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर अत्यावश्यक कागदपत्रासह 20 ऑगस्ट 2022 पर्यत प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

00000 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...