Wednesday, October 4, 2017

हवामानावर आधारित पीक विमा
योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
नांदेड दि. 4 :- प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना अंबिया बहारासाठी लागु करण्यात आली आहे.. शासन निर्णय 28 सप्टेंबर 2017 नुसार पिक विमा भरण्याची अंतिम मुदत द्राक्ष पिकासाठी 15 ऑक्टोंबर 2017, केळी, मोसंबी पिकासाठी 31 ऑक्टोंबर 2017,  आंबा पिकासाठी 31 डिसेंबर 2017  पर्यंत आहे. जास्तीतजास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
ही योजना अधिसुचित पिकांसाठी कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  ऐच्छिक असून बजाज अलायझ इन्शुरन्स कंपनी येरवाडा पुणे या कंपनीकडून योजना कार्यन्वयीत केली आहे.
विमा हप्ता दर
फळपिक
विमा संरक्षित रक्कम (नियमित)
गारपीट विमा संरक्षित रक्कम
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम
नियमित
गारपीट
द्राक्ष
280000
93300
14000
4665
मोसंबी
70000
23300
3500
1165
केळी
120000
40000
6000
2000
आंबा
110000
36700
5500
1835
योजना अंमलबजावणी वेळापत्रक व अधिसुचित मंडळे
            ही योजना नांदेड जिल्ह्यात पुढील प्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल.
अधिसुचित फळपिक
तालुके
अधिसुचित महसुल मंडळे
द्राक्ष
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपूरी.
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
मोसंबी
नांदेड
लिंबगाव, विष्णूपूरी
मुदखेड
बारड
अर्धापूर
मालेगाव
केळी
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपूरी
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
किनवट
किनवट, बोधडी
आंबा
अर्धापूर
मालेगाव, दाभड
प्रधानमंत्री फसल बिमा योजना हवामानावर आधारित फळपिक विमा आंबीया बहारामध्ये अंतिम दिनांकापुर्वी जास्तीतजास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी व नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000
मराठवाड्यात अतिवृष्‍टीचा इशारा;
नागरिकांनी सतर्कता बाळगावी
नांदेड दि. 4 :- मराठवाडा, विदर्भ, मध्‍य-महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाने 5 ते 14 ऑक्टोंबर दरम्यान अतिवृष्‍टीचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्‍हयातील नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता अतिवृष्टीत पुरापासून सतर्कता बाळगावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.   
सध्या शंकरराव चव्‍हाण विष्‍णुपुरी प्रकल्‍पात 95 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्‍याचा येवा वाढत राहिल्‍यास केंव्‍हाही अतिरिक्‍त जलसाठा विसर्ग करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्‍हयातील इतर नदीकाठच्‍या ठिकाणी या अतिवृष्‍टीचा धोका होऊ शकतो. याकाळात शेतकऱ्यांनी धान्‍ये सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. विजेचा कडकडाट होत असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे. कोणत्याही परस्थितीत उंच झाडाचा आसरा घेऊ नये. विद्यार्थी व नागरिकांनी नदी, ओढ्याकाठच्‍या धोकादायक स्वरुपात पाणी वाहणाऱ्या पुलावरुन किंवा पाण्यात जाण्याचे टाळावे. आणीबाणीच्या प्रसंगी सतर्क राहुण याबाबत वेळोवेळी कुठल्‍याही प्रकारची गरज पडल्‍यास जिल्‍हा प्रशासनाच्‍या वरीष्‍ठ कार्यालयांना त्वरीत कळवावे. जिल्‍हा पुर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन, नांदेड हे 24 तास कार्यरत असून त्‍यांचा दुरध्‍वनी क्रमांक (02462) 263870 असा आहे.

00000
 मुग, उडीद खरेदीसाठी
शेतकऱ्यांची नोंदणी सुरु
नांदेड दि. 4 :-  केंद्र शासनाचे नाफेड मार्फत खरीप हंगाम 2017-18 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे हमी भावाने मुग, उडीद खरेदी करण्यासाठी देगलूर, बिलोली, धर्माबाद येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी या नोंदणी केंद्रावर येताना सोबत एकुण क्षेत्र व पीक निहाय नोंदी असलेला सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक अनुषंगीक आदी कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणुन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 4 :- जिल्ह्यात मंगळवार 17 ऑक्टोंबर 2017 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 4 ते 17 ऑक्टोंबर 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...