Sunday, July 23, 2017

किनवट नगरपरिषद निवडणूक
प्रभाग रचना, आरक्षण निश्चितीवर   
आक्षेप, हरकती, सूचना 31 जुलै पर्यंत मागविल्या
नांदेड, दि. 23 :- किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2017 च्‍या प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीबाबत ज्‍या कोणत्‍याही व्‍यक्‍तींचे आक्षेप / हरकती / सूचना असतील ते त्‍यांनी कारणासह मुख्‍याधिकारी, नगरपरिषद किनवट यांचेकडे सोमवार 24 ते 31 जुलै 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी सादर करावे. त्यानंतर आलेले आक्षेप / हरकती / सूचना विचारात घेतल्‍या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्‍या माहितीसाठी किनवट नगरपरिषद कार्यालय किनवट येथे पाहण्‍यासाठी उपलब्‍ध आहेत. सदस्‍य पदाच्‍या आरक्षणाची प्रसिध्‍दी नगरपरिषद क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्‍यात आली आहे. तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आले आहे.  
नांदेड जिल्‍हयातील नगरपरिषद किनवटच्‍या 2017 मध्‍ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणकीसाठी राज्‍य निवडणूक आयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य यांनी ठरवून दिलेल्‍या आरक्षणाचे प्रमाणानूसार, किनवट नगरपरिक्षेत्रातील एकूण प्रभागापैकी अनुसूचित जाती (स्‍त्री), अनुसूचित जमाती (स्‍त्री), नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्‍त्री), आणि सर्वसाधारण स्‍त्रीयांसाठी दिनांक 20 जुलै 2017 रोजी आरक्षण निश्चित करण्‍यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.   

00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...