Thursday, October 15, 2020

 236 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

94 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 15 :- गुरुवार 15 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 236 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 94 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 65 बाधित आले. 

आजच्या एकुण 972 अहवालापैकी 832 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 792 एवढी झाली असून यातील  15  हजार 392 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 820 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 43 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात पाच जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवार 14 ऑक्टोंबर रोजी बिलोली तालुक्यातील आदमपूर  येथील 40 वर्षाची एक महिला, लोहा तालुक्यात कलंबर येथील 60 वर्षाची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी रुग्णालयात, बिलोली तालुक्यात डोणगाव येथील 50 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर 15 ऑक्टोंबर रोजी हदगाव येथील 80 वर्षाची एका महिलेचा हदगाव कोविड केअर सेंटर येथे, समतानगर मुखेड येथील 70 वर्षीय एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 469 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 2, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 11, नायगाव कोविड केंअर सेंटर 9, मुखेड कोविड केंअर सेंटर 12, हदगाव कोविड केंअर सेंटर 4, लोहा कोविड केंअर सेंटर 5, किनवट कोविड केंअर सेंटर 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12, कंधार कोविड केंअर सेंटर 6, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 11, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 112, बारड कोविड केंअर सेंटर 2, बिलोली कोविड केंअर सेंटर 10, खाजगी रुग्णालय 32 असे 236  बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 89.77 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 19, अर्धापुर तालुक्यात 1,  बिलोली 1, उमरी 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 1, धर्माबाद 1, हिंगोली 2, हैद्राबाद 1 असे एकुण 29 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 34, अर्धापूर तालुक्यात 5,  लोहा 1, हदगाव 1, बिलोली 3, नायगाव 2, उमरी 2, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 2, किनवट 4, देगलूर 4, मुखेड 1, धर्माबाद 2, अदिलाबाद 3 असे एकूण 65 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 820 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 144, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 105, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 56, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 35, हदगाव कोविड केअर सेंटर 17, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 39, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 34, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 36,  मांडवी कोविड केअर सेंटर 6, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 11, लोहा कोविड केअर सेंटर येथे 17, बारड कोविड केअर सेंटर 2, मुदखेड कोविड केअर सेटर 9, माहूर कोविड केअर सेंटर 21, किनवट कोविड केअर सेंटर येथे 29, धर्माबाद कोविड केअर सेंटर 13, उमरी कोविड केअर सेंटर 32, कंधार कोविड केअर सेंटर येथे 8, अर्धापूर कोविड केअर सेंटर 17, भोकर कोविड केअर सेंटर 12,  खाजगी रुग्णालयात दाखल 176, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1 असे बरे झाले आहेत. 

सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या 

गुरुवार 15 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 80, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 72 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 96 हजार 720,

निगेटिव्ह स्वॅब- 75 हजार 819,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 792,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 15 हजार 392,

एकूण मृत्यू संख्या- 469,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 89.77

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 324, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 820,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 43.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000 

 खाजगी दवाखाण्यात उपचार घेणाऱ्या कोविड बाधितांना

रेमडिसेव्हीर इंजेक्शन 2360 रुपयांना असेल उपलब्ध    

नांदेड (जिमाका) दि. 15 :-कोविड-19 बाधित रुग्णांच्या उपचारासाठी रेमडिसेव्हीर शंभर मिली ग्रॅम हे इंजेक्शन वापरले जाते. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये हे इंजेक्शन कोविड बाधितांसाठी मोफत उपलब्ध आहे. परंतू खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बाधितांना हे औषध मिळत नसल्याच्या व मिळाले तरी महाग दराने मिळत असल्याच्या असंख्य तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने यासाठी निश्चित दर ठरवून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते कोणत्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या मेडिकल स्टोअर्सचे नाव जाहिर केले आहेत. यानुसार आता खाजगी दवाखाण्यामध्ये उपचार घेत असलेल्या कोणत्याही कोविड-19 बाधितांना या इंजेक्शनची प्रतिक्षा करावी लागणार नाही. हे इंजेक्शन आता अल्पदरात म्हणजेच रुपये 2360 या किंमतीत असेल,  असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी कळविले आहे. 

या इंजेक्शनबाबत जिल्हा प्रशासनातर्फे दक्षता घेतली जात असून शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसारच ते गरजूंना दिले जाईल याबाबत खबरदारी घेतली जात आहे. निर्धारीत केलेल्या किंमतीत गरजू कोविड बाधितांना इंजेक्शन मिळावे यासाठी नियमावली ठरविण्यात आली आहे. ज्या खाजगी दवाखाण्यात बाधित उपचार घेत आहेत त्याला या इंजेक्शनची आवश्यकता भासल्यास संबंधित खासगी हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी बाधिताची माहिती दिलेल्या नमुन्यात भरुन ते पत्र जिल्हा शल्यचिकित्सकाच्या मंजुरीसाठी पाठविले जाईल. जिल्हा शल्यचिकित्सक कोविड बाधिताची स्थिती लक्षात घेऊन निर्धारीत दरामध्ये इंजेक्शन घेता यावे यादृष्टिने बाधिताच्या नातलगाला तसेच पत्र देईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक हे जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाकडून आलेली मागणी लक्षात घेऊन या इंजेक्शनची दैनिक गरज निश्चित करतील. याबाबत संचालक आरोग्य सेवा पुणे यांना कळविले जाईल. यावर संचालक हे जिल्ह्यातील रुग्ण संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्याचा कोटा अन्न व औषध प्रशासन हे ठरवून देतील. नांदेड जिल्ह्यात हे इंजेक्शन मे. श्रीनाथ मेडिकल ॲड जनरल स्टोअर्स, श्रीनगररोड, वर्कशॉप कॉर्नर नांदेड येथे आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र विष्णुपूरी नांदेड येथे उपलब्ध असेल.

****----****

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...