Thursday, February 20, 2020


हरवलेल्या व्यक्तीचा शोध
नांदेड दि. 20 :- विनायकनगर नांदेड येथील नरेंद्र दिगांबरराव निमगावकर (वय 32) हा खाजगी नौकरी करणारा युवक 19 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्री मोटार सायकल क्र. एमएच 26 एफ 9385 जांभळा कलरची स्पलेन्डर मोटार सायकलसह त्यांचे राहते घरुन निघुन गेला तो परत आला नाही.
नरेंद्र निमगावकर यांचे वर्णन उंची 5 फुट 8 इंच असून रंग निमगोरा, अंग मजबूत, चेहरा गोल, पोषाख निळ्या रंगाचे स्वेटर व जिन्स पॅन्ट, दाढीची ठेवण वाढलेली, नाक सरळ, भाषा हिंदी, मराठी, इंग्रजी भाषा येते. या वर्णनाचा मुलगा मिळुन आल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड येथे कळवावे, असे आवाहन पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेडचे त. अमलदार यांनी केले आहे.
00000


हमीभावाने तूर खरेदीसाठी
ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ
नांदेड दि. 20 :-  केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये हमीभावाने तुर खरेदी करण्याकरिता शेतकरी नोंदणीची मुदत 15 फेब्रुवारी 2020 वरुन 15 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करावी व हमीभाव खरेदी केंद्रावर तुर विक्री करुन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


निर्यातीस इच्छूक व्यापाऱ्यांना
माहिती नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 20 :- जिल्ह्यातील निर्यातदार व निर्यात करण्यास तयार असलेल्या व्यापारी / उद्योजकांना आवाहन करण्यात येते की, मा. प्रधानमंत्री यांनी स्वातंत्र्य दिन 2019 रोजी प्रत्येक जिल्ह्यास संभाव्य निर्यात केंद्रात रुपांतरित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याअनुषंगाने वाणिज्य सचिव वाणिज्य विभाग यांनी नांदेड जिल्ह्यास निर्यात केंद्रात रुपांतरित करणे, व्यापार, निर्यात क्षमता असलेल्या उत्पादनाची ओळख करुन देणे आणि उत्पादकाना, उत्पादकापर्यंत समन्वय साधून प्रस्तावित केलेल्या उत्पादनापर्यंत पोहचवण्यासाठी सुलभ भूमिका बजविण्याकरीता आपण आपल्या उत्पादनाची माहिती उदा. उत्पादन प्रकार, फर्मचे नाव, ईमेल, मोबाईल क्रमांक आदी माहिती जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन शिवाजीनगर नांदेड येथे नोंदणी करावी, अथवा didic.nanded@maharashtra.gov.in या ईमेलवर देण्यात यावी, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000


दहावी व बारावी परीक्षा केंद्र
परिसरात 144 कलम
नांदेड दि. 20 :- जिल्ह्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (दहावी) केंद्रावर 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (बारावी) केंद्रावर 18 फेब्रुवारी ते 17 मार्च 2020 या कालावधीत परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/ एस.टी.डी/ आय.एस.डी/भ्रमणध्वनी/फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्गमीत केला आहे.
000000


दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु
नांदेड, दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भांबुर्डा शिवाजीनगर पुणे यांच्यावतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडविता याव्यात विभागीय मंडळ स्तरावर याकरिता इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर विभागीय मंडळात 24 तास हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे.
नियुक्ती करण्यात आलेल्या मंडळ अधिकारी / कर्मचारी यांची माहिती खालील प्रमाणे असून विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.
इयत्ता 12 वी लेखी परीक्षेचा कालावधी 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 पर्यंत सकाळी 6 ते दुपारी 2 यावेळेत एच. पी. (व.अ.) कोणेरी भ्र. 9527295491, दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्रीमती एस. आर. मोरे (सा.अ) फक्त कार्यालयीन वेळेत 9819136199, रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत एम. व्ही. केंद्रे (प.लि.) 7350843111.
इयत्ता दहावी लेखी परीक्षेचा कालावधी 3 मार्च ते 23 मार्च 2020 पर्यंत एन. एन. (व.अ.) डूकरे यांना सकाळी 6 ते दुपारी 2 यावेळेत 8379072565 भ्रमणध्वनी दूरध्वनी क्रमांकावर. ए. पी. चवरे (सा.अ.) दुपारी 2 ते रात्री 10 यावेळेत 9421765683. रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत जाधवर एम. डी. (प.लि.) 8855865435 संपर्क करावा.  
00000


दहावी, बारावी परीक्षेसाठी
समुपदेशकाची नियुक्ती
नांदेड, दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382- 251633 व इयत्ता बारावीसाठी 02382- 251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर किंवा समुपदेशकाचे नाव बी. एम. कच्छवे 9371261500 व बी. एम. कारखेडे 9860912898, 8669128735 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000

दिव्यांगासाठी होणार साहित्य वाटप
नांदेड, दि. 20 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिरकरण मुंबई,  भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपूर व एमएलए हॉस्टेल नागपूर यांच्यावतीने 1 ते 7 मार्च या कालावधीत एमएलए हॉस्टेल नागपूर येथे दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव व सहयाभूत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे.
या शिबीरात दिव्यांगाना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कॅलीपर्स, कृत्रिम जयपूर पाय, जयपूर कृत्रिम हात, कुबडया, शुज, बेल्ट, कमी ऐकू येणा-यासाठी श्रवण यंत्र आदी साधानांचे मोफत वाटप होणार आहे. साहित्यासाठी इच्छूकांनी आपली नावे 24 फेब्रुवारी 2020 पर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय, नांदेड येथे सकाळी 11 वाजेपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन दिपक अ. धोळकिया, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड व न्या.  राजेद्र रोटे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांनी केले. 
000000

भोकर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक
प्रभाग रचना / सदस्य पदाच्या आरक्षण निश्चितीबाबत
हरकती असल्यास सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 20 :- नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद भोकरच्या 2020 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मा. राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी ठरवून दिलेल्या आरक्षणाचे प्रमाणपत्रानुसार भोकर नगरपरिषद क्षेत्रातील एकुण प्रभागापैकी अनुसूचित जाती (स्त्री), अनुसुचित जमाती (स्त्री), नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागासप्रवर्ग (स्त्री) आणि सर्वसाधारण स्त्रीयांसाठी 18 फेब्रुवारी 2020 रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले असून प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शन नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी भोकर नगरपरिषद कार्यालय भोकर येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिद्धी नगरपरिषद क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सदरच्या प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण निश्चिती बाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील ते त्यांनी कारणासह मुख्याधिकारी नगरपरिषद भोकर यांचेकडे दिनांक 20 फेब्रुवारी 2020 ते 26 फेब्रुवारी 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी सादर करावे. दिनांक 26 फेब्रुवारी 2020 नंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   280   सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आरटीओ कार्यालय राहणार  सुरु     नांदेड दि.  27  :-  सन  2023 2024  हे वित्तीय वर्ष दिनांक  3...