Sunday, April 12, 2020

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची जयंती घरीच साजरी करावी
- जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नांदेडदि. 13 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घरीच साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
मंगळवार 14 एप्रिल 2020 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा आनंदाचा दिवस आहे परंतु देशात कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक त्रस्त आहेत. हा आजार संसर्गजन्य असून त्याची लागण होण्याची भीती असल्याने नागरिकांनी एकत्रित येऊन सामूहिकपणे हा दिवस साजरा न करता घरीच राहून तो साजरा करावा.
जिल्ह्यात कलम 144 लागू केली आहेत तसेच संचारबंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडता येणार नाही. सोबतच  जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदासुद्धा लागू असून त्या कायदाची देखील पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.
सध्याची परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होवून फैलाव होण्याच्या भीतीमुळे, खबरदारी म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना साथ रोग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात मोठा समुदाय आला तर संसर्ग पसरण्याची जास्त भीती आहे. अशा वेळी सर्वांनी घरीच राहून कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपन व पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
0000  

विशेष लेख :
नांदेड आरोग्य यंत्रणा करतेय मिशन मोडवर काम...

नांदेड शहर म्हटले की डोळ्यासमोर येते शीख बांधवांचे धार्मिक स्थळ  तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये मत्था टेकण्यासाठी अनेक नागरिक पंजाब आणि हरियाणा मधून येत असतात. देशात 23 मार्च नंतर लॉकडाऊन झाल्याने नांदेडमध्ये आलेल्या नागरिकांची सोय केली. यामध्ये  तीन हजार सातशे पंचावन्न (3755) नागरिकांची सोय गुरुद्वारा बोर्ड आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.
या दरम्यान सर्व संगत मधील यात्रेकरुंचे जवळपास 3 हजार 755 णांची आरोग्य तपासणी नांदेड महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने केली. प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी तीन दिवस सलग चार टीम काम करीत होत्या. यासाठी ताप तपासणीसाठी थर्मलगनचा वापर करण्यात आला होता. यात्रेकरुंची आरोग्य तपासणी करून तसेच महानगरपालिकेच्या  क्षेत्रात (8355)आठ हजार तीनशे पंचावन्न नागरिकांना  शहरी भागात घरीच विलगिकरण करण्यात आले आहे. त्यांची दैनंदिन भेट देवून आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकारी यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी विषयी घरोघरी जाऊन विचारपूस केली जात आहे. नांदेड शहरात अनेक परदेशी नागरिकांना देखील विलगिकरण  करण्यात आले असून यामध्ये 130 नागरिकांचा  समावेश आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी केली असून  याबरोबरच नांदेड महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांनी कोरोणाच्या संसर्गाविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनाची जाणीव जागृती करण्याचे काम नांदेड आरोग्य यंत्रणा करीत आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग हा जगासमोरील आताची सर्वात मोठी आपत्ती आहे पण देश आणि राज्य पातळीवर  प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणा सतर्कतेने काम करताना दिसते आहे. नांदेड जिल्ह्याने आरोग्यविषयक काळजी आणि त्याप्रमाणे उपाययोजना केल्यामुळे आतापर्यंत  नियंत्रण मिळवले आहे.  संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या  समन्वयाने  आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य यंत्रणेने काम केल्याने सर्व परीचरिका, आशा कार्यकर्त्या, डॉक्टर यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.  

 - मीरा ढास , 
प्र. जिल्हा माहिती अधिकारी नांदेड


प्रधानमंत्री गरीब कल्‍या अन्‍न योजनेतील
 मोफत तांदळाचे जिल्ह्यात वितरण सुरु
          नांदेड दि. 12 :- प्रधानमंत्री गरीब कल्‍या अन्‍न योजनेतील मोफत तांदळाचे जिल्ह्यात वितरण सुरु करण्यात आले असून सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड व जिल्‍हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्‍यातील विशिष्‍ट आपत्‍कालीन परिस्थिती विचारात घेता, लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील लाभार्थ्‍यांना तीन महिन्‍यांचा शिधा एकत्रितरित्‍या उपलब्‍ध करुन देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. या सुचनांमध्‍ये बदल करुन आता शासनाने असा निर्णय घेतला आहे.
एप्रील, मे व जून 2020 साठी अन्‍नधान्‍याच्‍या दिलेल्‍या नियमित नियतनानुसार अंत्‍योदयकार्ड धारकांना 23 किलो गहू व 12 किलो तांदुळ असे एकूण 35 किलो धान्‍य, प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना प्रति व्‍यक्‍ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ आणि ए.पी.एल. शेतकरी यांना प्रति व्‍यक्‍ती गहू 3 किलो व तांदुळ 2 किलो (सर्व योजनांसाठी गहू 2 रुपये व तांदुळ 3 रुपये किलो) याप्रमाणे वाटप त्‍या-त्‍या महिन्‍यात करण्यात येणार आहे.
एप्रील, मे व जून 2020 या तीन महिन्‍याचे वरीलप्रमाणे नियमित अन्‍नधान्‍याचे वाटप झाल्‍यानंतर त्‍या-त्‍या महिन्‍यात प्रधानमंत्री गरीब कल्‍याण  अन्‍न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील पात्र लाभार्थ्‍यांना ज्‍यामध्‍ये प्राधान्‍य कुटुंब योजनेतील लाभार्थ्‍यांना प्रति सदस्‍य प्रतिमाह 5 किलो तांदुळ (मोफत) त्‍याचबरोबर अंत्‍योदय योजनेतील लाभार्थ्‍यांना शिधापत्रिकेतील सदस्‍य संख्‍येनुसार प्रति सदस्‍य 5 किलो प्रमाणे प्रतिमाह तांदळाचे (मोफत) वाटप करण्‍यात येणार आहे. या दोन्‍ही प्रकारचे वाटप PoS मशीन मार्फत होणार आहे. सध्‍या नांदेड जिल्‍हयातील नायगाव, हदगाव, बिलोली, नांदेड, मुदखेड, कंधार तालुक्‍यात मोफत तांदळाचे वितरण सुरु झाले असुन उर्वरित तालुक्‍यात चालु आठवड्यामध्‍ये मोफत तादुळाचे वितरण सुरु होणार आहे. मोफत तांदुळ एपीएल शेतकरी लाभार्थी यांना मिळणार नाही.
       याबाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्‍हयातील सर्व स्‍वस्‍तधान्‍य दुकानदार यांना वरीलप्रमाणे जिल्‍हयातील पात्र लाभार्थ्‍यांना धान्‍य वाटप करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत.        नांदेड जिल्‍हयात एकूण 1 हजार 993 रास्‍त भाव दुकानदार असन या सर्व रास्‍त भाव दुकानदार यांना सर्व योजनेचे एप्रिलसाठी 24 हजार 206 मेट्रीक टन धान्‍य सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतर्गत लाभार्थ्‍यांना वितरणासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे.
        दिनांक 12 एप्रिल 2020 पर्यंत माहे एप्रिल 2020 चे नियमीत अन्‍न धान्‍य वितरण नांदेड जिल्‍हयातील 1993 रास्‍त भाव दुकानदाराकड  अंत्‍योदय योजनेचे 2025.85, प्रा. कू. योजनेचे 5828.00 आणि केशरी (शेतकरी) योजनेचे 1294.62 असे एकुण  9 हजार 148.62 मेट्रीक टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थीयांना वितरण करण्‍यात आले आहे.
      अन्‍न व नागरी पुरवठा ग्राहक सरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचा शासन निर्णय दिनांक 9 एप्रिल 2020 मध्‍ये शासनाने असेही निर्देश दिले आहेत की, नोव्‍हेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील. अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडींग झाले नसेल अशा शिधापत्रिकाधारकांना, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ज्‍यांचे वार्षीक कटुंबीक उत्‍पन्‍न 1 लाखाच्‍या आत आहे. अशा लाभार्थ्‍यांसाठी मे व जून 2020 या 2 महिन्यांच्‍या कालावधीसाठी प्रतिमा प्रतिव्‍यक्‍ती 3 किलो गहु  (8 रुपये प्रतिकिलो प्रमाणे), व तांदुळ 2 किलो (12 रु प्रतिकिलो प्रमाणे)  दराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी नांदेड व जिल्‍हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
000000


कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात
नांदेड दि. 12 :- कोरोनाच्या संसर्गाच्या बाबतीत आजपर्यंत  परिस्थिती नियंत्रणात असून पॉझिटीव्ह रुग्ण- 0 (शून्य) आहे. आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन असणारे 461 जण होते. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेले 122 आहेत यातील अजून 31 जणं निरीक्षणाखाली आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये  01 जणाला करण्यात आले आहे. घरीच क्वारंटाईनमध्ये असलेलेची संख्या-460 आहे. आज 3 तपासणीसाठी नमुने घेतले आहेत. एकुण 199नमुने तपासणी केले गेले आहेत. यातील 187निगेटीव्ह  आले आहेत आणि 7 नमुने तपासणी अहवाल  येणे बाकी आहे. नाकारण्यात आलेले नमुने - 5 आहेत. जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 72098 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. असे आरोग्य विभाग, नांदेड मार्फत कळवण्यात आले आहे.
000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...