Friday, December 14, 2018


लोहा तालुक्‍यातील सर्व मतदान केंद्रावर
बीएलओ व बीएलए यांची बैठक दिनांक 16 डिसेंबर रोजी

नांदेड, दि. 14 :- मतदार यादी विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत लोहा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरिय अधिकारी समवेत मतदान केंद्र सहाय्यक यांच्‍या बैठकीचे दिनांक 16 डिसेंबर रोजी आयोजन करण्‍यात आले आहे. अशी माहिती तहसिलदार लोहा तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल पर?ळीकर यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला असून, 11 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करावयाची आहे. त्‍याअनुषंगाने जिल्‍हधिकारी अरुण डोंगरे, उपजिल्‍हाधिकारी निवडणूक दिपाली मो?तीयाळे यांच्‍या मार्गदर्शनाथ व कंधारचे उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर यांच्‍या नियोजनात सदर कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे.
राज्‍याचे मुख्‍य निवडणूक अधिकारी यांच्‍या निर्देशानुसार 88- लोहा विधानसभा मतदार संघातील लोहा तालुक्‍यातील 178 व 87-नांदेड (दक्षिण) विधानसभा मतदार संघातील 37 अशा एकूण 215 मतदान केंद्रावर केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) समवेत सर्व मान्‍यताप्राप्‍त राजकिय पक्षांचे मतदान केंद्र सहाय्यक (बीएलए) यांच्‍या दि. 16 रोजी सकाळी 9 ते साय. 5 यावेळेत बैठकीचे आयोजन करण्‍यात आले असून, सर्व संबंधीतांनी बैठकिस उपस्‍थीत राहण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
सदर रोजी 1 सप्‍टेंबर 2018 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या प्रारुप मतदार यादीचे वाचन करावे, विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्राप्‍त झालेल्‍या फॉर्म नं. सहा, सात, आठ व आठ-अ चे स्‍वीकारलेले व नाकारलेल्‍या फॉर्मच्‍या मतदारांच्‍या यादीचे वाचन करावे. बीएलए व उपस्‍थीत मतदार यांचे नविन दावे, हरकती असल्‍यास त्‍याची वेगळयाने नोंद घ्‍यावी. तसेच ज्‍या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत विखुरलेली आहेत त्‍यांची नोंद घ्‍यावी. दिव्‍यांग मतदारांची दिव्‍यांग्‍याच्‍या प्रकारासह नोंद घ्‍यावी, महत्‍वाच्‍या व्‍यक्‍तींची (व्‍हीआयपी) स्‍वतंत्र नोंद घ्‍यावी. असे निर्देश देण्‍यात आले आहेत.  
000000  


  बस चालकांना रस्ता सुरक्षा विषयावर प्रबोधन मार्गदर्शन

नांदेड, दि.14:- मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी दि.22  नोव्हेंबर, 2018 रोजीच्या व्हीडीओ कॉन्फरन्सीमध्ये विविध बस चालकांना रस्ता सुरक्षा विषयावर प्रबोधन मार्गदर्शन करण्याबाबत निर्देशीत केले होते. त्यानुसार या कार्यालयातील निर्देशानुसार नांदेड मधील मुख्य ट्रॅव्हल्स मालक जसे की शर्मा ट्रव्हल्स् खुराणा ट्रॅव्हल्स् इत्यादींना त्यांच्याकडे कार्यरत बस चालकांना रस्ता सुरक्षा सुरक्षा विषयक प्रबोधन मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यालयात सदर बाबतचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले.
            त्यानुसार दि.05 दि.06  डिसेंबर, 2018 रोजी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ते सुरक्षा मार्गदर्शन कक्षात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे शंभर बस चालकांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी उप प्रादेश्कि परिवहन अधिकारी श्री. अविनाश राऊत, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अनंत भोसले, श्री.अनंता जोशी, मोटार वाहन निरीक्षक श्रीमती सविता पवार, सहा.मोटार वाहन निरीक्षक श्री.गणेश तपकिरे, श्री. संजय पल्लेवाड यांनी उपस्थित बस चालकांना रस्ते अपघात टाळण्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारी, चालकांच्या होणाऱ्या चूका तसेच आरोग्य विषयक सवयी याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी चालकांना रस्ते सुरक्षा विषयक चित्रफिती दाखविण्यात आल्या.
            नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्या अर्जदारांचे कार्यालयातील सुरु करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा मार्गदर्शन कक्षात प्रबोधन करण्यात येते प्रबोधनपर चित्रफिती दाखवण्यात येतात.
0000



मोटार वाहन कायद्याचे काटेकोर पालन करण्याबाबत
परिवहन विभागातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येणार
नांदेड, दि. 14 :- राज्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन मृत्यूमुखी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी मोटार वाहन कायदाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुध्द विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये परिवहन विभाग, शहर वाहतुक शाखा, तसेच महामार्ग पोलीस यांच्याद्वारे ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
यामध्ये विना हेल्मेट वाहन चालविणे, विना लायसन्स वाहन चालविणे अतिवेगाने वाहन चालविणे, विना सिटबेल्ट वाहन चालविणे, नशा करुन वाहन चालविणे,वाहन चालविताना माबाईलवर बोलणे, सिग्नल पाळणे इतर गुन्ह्या विरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सर्व वाहन चालकांनी विधीग्राह्य कागदपत्रे वाहन चालवितांना सोबत बाळगावी तसेच दूचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करावा.
            ज्या वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल त्यांना रस्ता सुरक्षा संदर्भात एक तासाचे मार्गदर्शन बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे एक तासाचे समुपदेशन बंधनकारक करुन त्यानंतरच त्यांचा दंड घेतला जाणार आहे.
            पुढील गुन्हयासाठी वाहन चालकांचे लायसन्स तीन महिन्याकरिता निलंबित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये सिग्नल पाळणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, नशा करुन वाहन चालविणे, जादा भार वाहतुक करणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे यावरही कारवाई केली जाईल.
              याद्वारे सर्व वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी मोटार वाहन कायद्याचे काटेकोर पालन करावे व अपघातापासून आपला व इतरांचा बचाव कराव तसेच लायसन्स निलंबन होण्यापासून परावृत्त व्हावे.
000000


जल समृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेतील
पात्र अर्जदारांमधून सोडत काढण्याबाबत
पात्र अर्जदारांनी 21 डिसेंबर, 2018 रोजी सोडतसाठी  उपस्थित राहणेबाबत आवाहन
नांदेड, दि. 14 :-राज्यातील जलयुक्त शिवार अभियान तसेच जल व मृद संधारणाची कामेकरण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याजअर्थसहाय्य योजनेंतर्गत शासन निर्णय दि. 29 ऑक्टोबर, 2018 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय समितीने निवडलेले प्रथम व द्वितीय यादीतील 15 पात्र लाभार्थ्यास कर्जवाटपा संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि. 12 डिसेंबर, 2018 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तद्नंतर उर्वरित पात्र अर्जदारांमधून    दि. 21 डिसेंबर, 2018 (शुक्रवार) रोजी दुपारी 1.00 वाजता  बचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड कार्यालयात अर्थमुव्हर्स यंत्रसामुग्री वाटपासंदर्भात सोडत काढण्यात येणार आहे; याची सर्व पात्र अर्जदारांनी नोंद घ्यावी. पात्र अर्जदारांनी सदर योजनेच्या सोडतीचा लाभ घेण्यासाठी उक्त दिनांक व वेळेस जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हास्तरीय समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अध्यक्ष प्रवीण फडणीस यांनी केले आहे. तसेच यामध्ये बदल करण्याचे अधिकार अध्यक्ष, जिल्हास्तरीय समिती यांचेकडे राखीव असतील.
0000

हदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदानासाठी
संबंधित गावातील आठवडी बाजार बंद
नांदेड, दि. 14 :-   कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक हदगाव निवडणुकीच्या दिवशी म्हणजे शनिवार, दि. 22 डिसेंबर, 2018 रोजी  मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा. तसेच मतदान शांततेत पार पडावे या दृष्टीकोनातून कृषी उत्पन्न बाजार समिती हदगाव निवडणूक क्षेत्रात  तामसा , कवान व  पळसा या तीन गावी / ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. 
या गावचे / ठिकाणांचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार, दि. 23 डिसेंबर, 2018 रोजी भरविण्यात यावेत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे असे आदेशात नमूद केले आहे.
                                                                                   000000  

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...