Friday, December 14, 2018


लोहा तालुक्‍यातील सर्व मतदान केंद्रावर
बीएलओ व बीएलए यांची बैठक दिनांक 16 डिसेंबर रोजी

नांदेड, दि. 14 :- मतदार यादी विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत लोहा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरिय अधिकारी समवेत मतदान केंद्र सहाय्यक यांच्‍या बैठकीचे दिनांक 16 डिसेंबर रोजी आयोजन करण्‍यात आले आहे. अशी माहिती तहसिलदार लोहा तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल पर?ळीकर यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला असून, 11 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करावयाची आहे. त्‍याअनुषंगाने जिल्‍हधिकारी अरुण डोंगरे, उपजिल्‍हाधिकारी निवडणूक दिपाली मो?तीयाळे यांच्‍या मार्गदर्शनाथ व कंधारचे उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर यांच्‍या नियोजनात सदर कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे.
राज्‍याचे मुख्‍य निवडणूक अधिकारी यांच्‍या निर्देशानुसार 88- लोहा विधानसभा मतदार संघातील लोहा तालुक्‍यातील 178 व 87-नांदेड (दक्षिण) विधानसभा मतदार संघातील 37 अशा एकूण 215 मतदान केंद्रावर केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) समवेत सर्व मान्‍यताप्राप्‍त राजकिय पक्षांचे मतदान केंद्र सहाय्यक (बीएलए) यांच्‍या दि. 16 रोजी सकाळी 9 ते साय. 5 यावेळेत बैठकीचे आयोजन करण्‍यात आले असून, सर्व संबंधीतांनी बैठकिस उपस्‍थीत राहण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
सदर रोजी 1 सप्‍टेंबर 2018 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या प्रारुप मतदार यादीचे वाचन करावे, विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्राप्‍त झालेल्‍या फॉर्म नं. सहा, सात, आठ व आठ-अ चे स्‍वीकारलेले व नाकारलेल्‍या फॉर्मच्‍या मतदारांच्‍या यादीचे वाचन करावे. बीएलए व उपस्‍थीत मतदार यांचे नविन दावे, हरकती असल्‍यास त्‍याची वेगळयाने नोंद घ्‍यावी. तसेच ज्‍या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत विखुरलेली आहेत त्‍यांची नोंद घ्‍यावी. दिव्‍यांग मतदारांची दिव्‍यांग्‍याच्‍या प्रकारासह नोंद घ्‍यावी, महत्‍वाच्‍या व्‍यक्‍तींची (व्‍हीआयपी) स्‍वतंत्र नोंद घ्‍यावी. असे निर्देश देण्‍यात आले आहेत.  
000000  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...