Monday, June 7, 2021

 

मोटार कार पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 7:- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने मोटार कार या संवर्गासाठी MH26-BX ही नवीन मालिका 9 जून पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे, त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर व ईमेलसह 9 जून 2021 रोजी दुपारी 2.30 पर्यत करावेत. त्यानंतर येणारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन तथा नोंदणी प्राधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे. 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास 9 जून  रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तसेच या क्रमांकाचा जाहीर लिलाव 10 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे यांची सर्वांनी नोंद घ्यावी असेही, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

0000

 

 

नांदेड जिल्ह्यात 76 व्यक्ती कोरोना बाधित

एकाचा मृत्यू तर  105 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 706 अहवालापैकी  76 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर अँटिजेन तपासणीद्वारे 35 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 445 एवढी झाली असून यातील 87 हजार 366 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 668 रुग्ण उपचार घेत असून 12 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दि. 6 जून 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ममतानगर नांदेड येथील 80 वर्षाच्या महिलेचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 891 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 20, मुदखेड 4, परभणी 4, परभणी2, नांदेड ग्रामीण 7, मुखेड 1, यवतमाळ 1, किनवट 1, लोहा 1, हिंगोली 1, देगलूर 2, हदगाव 1 तर ॲन्टिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18,परभणी 2, नांदेड ग्रामीण 9, हिंगोली 2, हदगाव 2, वाशिम 1, किनवट 1 असे एकूण 76 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 105 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 4,  मुखेड कोविड रुग्णालय 2, लोहा कोविड रुग्णालय 1,मांडवी कोविड केअर सेटर 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, किनवट कोविड रुग्णालय 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत 4, खाजगी रुग्णालय 20, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 48, बिलोली तालुक्यातर्गंत 4,  माहूर तालुक्यातर्गंत 9 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 668कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 35,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  2, किनवट कोविड रुग्णालय 22,देगलूर कोविड रुग्णालय 7,  हदगाव कोविड रुग्णालय 7, लोहा कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 356, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 167, खाजगी रुग्णालय 47 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 114, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 121 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 59 हजार 828

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 55 हजार 284

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 445

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 366

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 891

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-20

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-207

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 668

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-12                        

00000

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

दुसऱ्या डोससाठीच उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 8 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 11 केंद्रावर कोविशील्डचे याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको अशा एकुण 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.  

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले असून हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 6 जून पर्यंत एकुण 4 लाख 43 हजार 737 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 7 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 27 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 25 हजार 700 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 53 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...