Tuesday, October 17, 2023

  18 आक्टोबरला माहूर येथे नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा

▪️नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड, दि. 17 आक्टोंबर : नवरात्रीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील 10 ठिकाणी नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देण्यासाठी बुधवारी, दिनांक 18 आक्टोंबर, 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री. रेणुकादेवी महाविद्यालय माहुर यांच्या सभागृहात आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून, या कार्यक्रमास मार्गदर्शन श्री. विकास खारगे, मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. 

दिनांक 18 ते 23 आक्टोंबर या कालावधीत महाराष्ट्राच्या 06 महसुली विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी (मुंबई, पुणे, नाशिक, छ.संभाजीनगर, अमरावती व नागूपर ) तसेच साडेतीन शक्तीपिठांच्या ठिकाणी (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, वणी ) नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक 18 आक्टोंबर, 2023 रोजी माहूर येथील श्री. रेणुकादेवी महाविद्यालय माहुर यांच्या सभागृहात नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री श्री. गिरीष महाजन, श्री. हेमंत पाटील, मा. सदस्य लोकसभा, श्री.भीमराव केराम, मा. विधानसभा सदस्य हे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. 

हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणाऱ्या समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

00000

 वृत्त

प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत

आता प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र

  •  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 511 गावात दृकश्राव्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने परंपरागत चालत आलेल्या कौशल्याल्यासमवेत नवीन तंत्रकुशलतेची जोड देऊन प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्‍य विकास केंद्र राज्यातील 511 गावात सुरू होत आहेत. या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर रोजी सायं. 4 वा. दृकश्राव्य प्रणालीद्वारे केला जाणार आहे. राज्यातील या 511 केंद्रापैकी नांदेड जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी हे केंद्र सुरू होत आहेत.

 

ग्रामीण भागातून शहरी भागात रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी व्हावे हा उद्देश प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामागे निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावातच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पारंपारिक कौशल्यासह नवीन रोजगाराची क्षेत्र तपासून त्या अनुरूप त्यांना तंत्र कौशल्य मिळावे त्यासाठी या केंद्रात विविध प्रशिक्षण व कार्यानुभव दिला जाईल.

 

यात नांदेड तालुक्यातील धनेगाव, अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, धर्माबाद तालुक्यातील येताळा, हदगाव तालुक्यातील तामसा, हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे सोलारपंप तंत्रज्ञ, शिवनकाम या विषयातील कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भोकर तालुक्यातील वाकड, देगलूर तालुक्यातील हानेगाव, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे फॅब्रिकेशन वेल्डींग, फिटर, मल्टी स्किल, नायगाव तालुक्यातील नरसी येथे फिल्‍ड टेक्निशीयन, उमरी तालुक्यातील शिंदी येथे शिवनकाम, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे इलेक्ट्रीशीयन, इनर्व्हटर, मुदखेड तालुक्यातील बारड येथे इलेक्ट्रीकल, फॅब्रिकेशन, माहूर तालुक्यातील वाई व किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे डाटा इन्ट्री ऑपरेटर, शिवणकाम, कंधार तालुक्यातील कुरूळा येथे इलेक्ट्रीकल तंत्रज्ञ, बिलोली तालुक्यातील कासराळी येथे शिवनकाम व डाटा इन्ट्री आदी कौशल्य शिकविली जाणार आहेत. यासाठी युवा विकास सोसायटी परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा. या संस्थांची निवड करण्यात आली आहे.

000000

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन सादर करण्याच्या वेळेत वाढ

 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी

नामनिर्देशन सादर करण्याच्या वेळेत वाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्य निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणाली द्वारे निवडणूक प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. दिनांक 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार 16 ऑक्टोबरपासून संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशनाची प्रक्रीया सुरु झाली आहे.

 

नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणकप्रणालीद्वारे भरले जात आहे. मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहे. या तांत्रिक अडचण महा ऑनलाईनकडून दूर करण्यात आल्या आहेत. तरी 18 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी 11 ते दु. 3 वा पर्यतची वेळ सांय. 5.30 वाजेपर्यत वाढविण्यात आली आहे असे राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांनी पत्रका द्वारे कळविले आहे.

0000

रानभाजी पाककला स्पर्धेचे 19 ऑक्टोबर रोजी आयोजन

 रानभाजी पाककला स्पर्धेचे 19 ऑक्टोबर रोजी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- प्रकल्प संचालक, आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने 19 व 20 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात 19 ऑक्टोबर रोजी रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी रानभाजी विशेष पाककला स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून जिल्हयातील सर्व महिला व पुरूषांनी सहभागी होऊन स्पर्धेचा लाभ घ्यावा. या स्पर्धेची नोंदणी 19 ऑक्टोबर रोजी दु. 2 वाजल्यापासून सुरु होईल. सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक स्वरूपात प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्या या गुणधर्माने परिपूर्ण असल्याने, आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्या वैविध्यपूर्ण असून काही औषधी वनस्पती म्हणूनही वापरल्या जातात. रानभाजी पासून विविध पदार्थ जसे कि, भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून वरण भाजी आदी खाद्यान्न यापासून तयार केले जातात. रानभाज्या बाबत शहरातील नागरीकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या भाज्यांची ओळख आणि त्याचे गुणधर्म जाणून घेण्याच्या अनुषंगाने चवळी, अळिंबी (मशरूम), पाथरी, तरोटा, घोळ, करटूले, बांबूचे कोंब, टाकळा, हरभऱ्याची कोवळी पाने, माठ, तांदूळजा, रान तोंडली, शेवग्याची पाने व फुले, कुरडू, सुरणाची कोवळी पाने, तेर अळू, भोकर, रताळ्याचे कोंब, रक्तकांचन, पाथरी, इ. रानभाज्या पासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांची पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

0000  

शासकीय रुग्णालय स्तरावर आवश्यक औषधी खरेदीची जलद कार्यवाही सुरु

 शासकीय रुग्णालय स्तरावर आवश्यक 

औषधी खरेदीची जलद कार्यवाही सुरु

नांदेड (जिमाका) दि. 17 :- नांदेड जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2023 रोजी सखोल आढावा घेतला. या आढाव्यातील मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत रुपये 5 कोटी 90 लक्ष रुपये व आदिवासी उपयोजना सन 2023- 24 अंतर्गत 91 लक्ष 66 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी एकूण 6 कोटी 81  लक्ष रुपयांची अर्थ संकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णय ५ ऑक्टोबर २०२३ नुसार व मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या ऑक्टोबर 2023 रोजीच्या निर्गमित आदेशान्वये औषधी, साहित्य, सामग्री खरेदीची कार्यवाही तातडीने करण्याचे सूचित केले होते. त्याअनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय स्तरावरून (ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दर करारानुसार २० टक्के मर्यादित अत्यंत आवश्यक असणारी औषधी खरेदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. उर्वरित अनुदानातून औषधी व साहित्य, सामग्रीची खरेदी तातडीने उपलब्ध करून घेण्यासाठी या स्तरावरून 11 ऑक्टोबर 2023 ते 17 ऑक्टोबर २०२३ या दरम्यान अल्प कालावधीची जाहीर ई-निविदा प्रकाशित करण्यात आलेली आहे. यानुसार शासकीय रुग्णालयात औषधी उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही जलद करण्यात येत आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्‍सवाचा ग्राहकांनी लाभ घ्‍यावा - जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत

 रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य

 महोत्‍सवाचा ग्राहकांनी लाभ घ्‍यावा

-         जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत

 

·         रानभाजी व खाद्य महोत्सवाचे 19 व 20 ऑक्टोबर रोजी आयोजन

·         19 ऑक्टोबर रोजी रानभाज्याच्या पाककलेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्‍सवाचे 19 व 20 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजन केले आहे. या महोत्सवाचे सकाळी 10 ते सायं. 6 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजन करण्‍यात आले आहे. या महोत्‍सवात सहभागी होवून ग्राहकांनी थेट शेतकऱ्याकडून रानभाजी व इतर शेतमाल खरेदी करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.  

 

रानभाज्‍यांमध्‍ये विविध प्रकारचे शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक अन्‍नघटक असतात. तसेच या रानभाज्‍या नैसर्गिकरित्‍या येत असल्‍यामुळे त्‍यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्‍यात येत नाही. या रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक असल्‍याने या संपत्‍तीचा योग्‍य वापर आवश्‍यक आहे. शहरी लोकांमध्‍ये याबाबत जागृती करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. यासाठी नांदेड येथे रानभाजी महोत्‍सव आयोजित करण्‍यात आला आहे.


या महोत्‍सवात जिल्‍हयातील शेतकरी गट व महिला गटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या महोत्सवात विक्रीच्‍या ठिकाणी  जिल्‍हयात उपलब्‍ध होणाऱ्या सर्व रानभाज्‍याचा समावेश आहे. यात प्रामुख्याने कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळू, कपाळफोडी, कुरडू, गुळवेल, तांदुळजा, रानमाठ, पांढरी वसु, गोखरु, बिव्‍याचे फुले, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व ड्रँगन फ्रुट, सिताफळ व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेला माल, सेंद्रीय उत्‍पादने, गुळ, हळद, लाकडी घण्‍याचे करडीचे तेल, मध, धान्य, विविध डाळी व केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

 

या महोत्सवात 19 ऑक्टोबर 2023 रोजी रानभाज्यांच्या पाककलेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी स्पर्धकांनी यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) अनिल गवळी यांनी केले आहे.

000

 प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या

जिल्हा अंमलबजावणी समितीची बैठक संपन्न


नांदेड (जिमाका) दि. 17 :- पीएम विश्वकर्मा योजनेत शहरी व ग्रामीण भागातील पात्र कारागीर यांनी सीएससी सेंटरवर नोंदणी करावी. या योजनेत नोंदणीसाठी कोणतीही फी आकारली नसून नोंदणी विनामुल्य आहे. या नोंदणीसाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, राशनकार्ड व बँक खाते तपशील आवश्यक आहे. तरी शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेचा पात्र कारागीरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा अंमलबजावणी समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अग्रणी बँकेचे अनिल गचके, सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रविण खडके यांची उपस्थिती होती. या बैठकीचे सुत्रसंचालन सदस्य सचिव तथा प्र. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर यांनी केले.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...