Thursday, January 12, 2023

वृत्त क्रमांक 23

 सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 12 :- राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान राबविण्याबाबत येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे सोमवारी 16 जानेवारी  रोजी सकाळी ते 9.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीचा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयछत्रपती शिवाजी महाराज पुतळाएसपी ऑफीसकलामंदीरशिवाजीनगरआयटीआय पर्यत असून आयटीआय येथे रॅलीचा समारोप आहे. जिल्ह्यातील सर्व वाहन चालक महिलांनी दुचाकी हेल्मेट रॅलीस उस्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 22

 ग्रामपंचायत निवडणूक खर्च

20 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे निर्देश

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी जाहीर झाला. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवांरावर अपात्रेची कारवाई निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात येणार आहे. हिशोब सादर करण्याची अंतिम मुदत ही येत्या 20 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. या दिनांका पुर्वी हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केली जाईल. यातील गांभीर्य लक्षात घेवून ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब तातडीने उमेदवारांनी सादर करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

या निवडणुकीत सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या 1 हजार 572 जागांसाठी 2 हजार 706 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच 375 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण 3 हजार 81 उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब 20 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशेब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक 21

 मकर संक्रांती भोगी हा दिवस

पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून होणार साजरा

-  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकरी व  सर्व सामान्य व्यक्तींना पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत याबरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेतला आहे.  यानुसार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मकर संक्रांती-भोगी हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये पौष्टिक तृण धान्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

 

या दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील गावांमध्ये कृषि विभागामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य ज्वारीबाजरीनाचणीवरईराळा व राजगिरा पिका पासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ आहारासाठी पौष्टीक असल्याने यांची माहिती व कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत.  14 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती-भोगी हा दिवस जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 20

 धान / भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला दिली मुदतवाढ  

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- आधारभुत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान / भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान / भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली (कासराळी) येथील केंद्रावर सुरु आहे. या ऑनलाईन नोंदणीला रविवार 15 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 

या नोंदणीसाठी चालु हंगामातील पीकपेराऑनलाईन नोंद असलेला सात / बाराबँक खात्याची साक्षांकित प्रतआधार कार्डची प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन दरम्यानचा लाइव्ह छायाचित्र अपलोड करावयाचे आहे. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावीअसे आवाहन नांदेडचे जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 19

 राज्य रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- ‘राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023’ चे उदघाटन प्रादेशिक परिवहन कार्यालयात नुकतेच करण्यात आले. दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी श्रीछत्रपती शिवाजी विदयालय सिडको संस्थेचे संस्थाचालक राजेश महागावेडॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविदयालयाचे डॉ.महेमुद यांची उपस्थिती होती.

यावेळी देशातीलराज्यातील व जिल्हयातील अपघाताची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिली. अपघातामुळे अनेक कुटूंबे उध्दस्त झालेली आहेत. याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये एक समिती नेमण्यात आलेली असून या समितीने प्रत्येक प्रत्येक वर्षी किमान 10 टक्के अपघात कमी करण्याबाबत निर्देश दिले असल्याचे सांगितले. फुटपाथ नसलेल्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजून चालावे (Walk on Right) याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते एका नविन उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. या नविन संकल्पनेची जनजागृती संपूर्ण जिल्हयामध्ये करण्यात येणार आहे. या राज्य रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन अविनाश राऊत यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमोल आवाड यांनी केले. आभार प्रदर्शन अनिल डुब्बेवार यांनी मानले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक अमोल आवाडमनोज चव्हाणगणेश तपकिरेभरत गायकवाडअभिजित कोळी व सहा.मोटार वाहन निरीक्षक धोंडीबा आवाडअनिल टिळेकरकज कंतेवारडुब्बेवार लिपीक कर्मचारी, मुख्य लिपिक राजेश गाजुलवाडरोहित कंधारकरगजानन शिंदेदिलीप गाडचेलवारश्रीमती जयश्री वाघमारेनरेश देवदेलिपीक प्रदीप बिदरकरसंजय कोंगलवारमोतिराम पोकलेछत्रपती शिवाजी विद्यालय सिडको येथील मुख्याध्यापकशिक्षकविद्यार्थी उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 50 जणांनी रक्तदान केले. शिबिरासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविदयालयाचे पथक उपस्थित होते.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...