Wednesday, January 15, 2020

एंन्जेडर हेल्थ, कर्मा कार्यक्रमाचा गौरव समारंभ
नांदेड, दि. 16:- प्रसूती पश्च्यात कुटुंब नियोजन व गर्भपात पश्च्यात कुटुंब नियोजन सेवा गुणवत्तापूर्ण प्रदान करण्याकरिता तसेच राज्यांतर्गत आरोग्य संस्थांची क्षमता बांधणी करण्यासाठी एंन्जेडर हेल्थ ही संस्था व राज्य कुटुंबकल्याण कार्यालय पुणे यांच्या  द्वारे राज्यांतर्गत 20 जिल्ह्यामध्ये  कर्मा हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मा. सहसंचालक (माताबाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे ) यांच्या सूचनेप्रमाणे हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.  याचाच एक  एक भाग म्हणजे सन 2018-2019 या कालावधीत नांदेड व परभणी या जिल्ह्याने या कार्यक्रमांतर्गत  उत्कृष कार्य केलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड,  जिल्हा शल्य चिकित्सक परभणी,  व एंन्जेडर हेल्थ यांच्या संयुक्त विध्यमाने दि 10जानेवारी, 2020 रोजी  हॉटेल फर्न (परभणी) येथे कुटुंब नियोजन कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा प्रदात्याचा गौरव समारंभ घेण्यात आला.
सदरील कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय माहूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मोरे, अधिपरिचारिका श्रीमती छाया मुदळे यांचा गौरव करण्यात आला. तसेच ग्रामीण रुग्णालय  माहूर या संस्थेसही (IUCD) तांबी श्रेणीकरिता सन्मानित करणात आले. तसेच स्त्री रुग्णालय नांदेड या संस्थेस सर्वोत्कृष्ठ गर्भनिरोधक इंजेक्शन (अंतरा) ची सेवा, कुटुंब नियोजन, मार्गदर्शन सल्लाकेंद्र व तांबी श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आला.
सदर कार्यक्रमाची नांदेड जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ
भोसीकर व अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर बाह्य संपर्क अधिकारी डॉ.अविनाश वाघमारे, डॉ एच के साखरेडॉ हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
  स्त्री रुग्णालय नांदेड  येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगेवार व वैद्यकीय अधीक्षक माहूर डॉ भोसले यांच्या अधिनस्त संबंधित कार्यक्रमात  काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक उपसंचालक आरोग्य सेवा लातूर मा. डॉ माले यांनी केले आहे. यातून इतर आरोग्य संस्थांनी प्रेरणा घेऊन आपल्या संस्थेचे नाव उज्वल  करावे असे आवाहन केले आहे.  
सदर कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, (परभणी) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर  देशमुख,  किशोर सुरवसे, (RCHO) डॉ. जी. के. सीरसुलवार, तसेच  कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. सदरील कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडण्यासाठी एंन्जेडर हेल्थ या संस्थेचे प्रतिनिधी  एम कल्पना, व राहुल यांचे सहकार्य लाभले.
0000

महिला आर्थिक विकास महामंडळाचे
अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांचा दौरा कार्यक्रम
नांदेड, दि. 15  :- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे या दिनांक 18 व 19 जानेवारी, 2020 या दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार, दि. 18 जानेवारी, 2020 रोजी सायंकाळी 6-00 वाजता विमानाने नांदेड विमानतळावर आगमन.              6-15 वाजता शासकीय विश्रामगृह  राखीव व निवास राहील.
रविवार, दिनांक 19 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9-30 वाजता नाळेश्वर येथे बचत गटातील महिलांनी सुरु केलेल्या मत्स्य पालन व्यवसायास भेट व चर्चा. 11-00 वाजता हॉटेल ताज पाटील येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्ञानज्योत राज्यस्तरीय पुरस्कार 2020 या खाजगी कार्यक्रमास उपस्थिती. 4-00 वाजता खडकुत येथे बचतगटातील महिलांच्या दुग्ध व्यवसायास भेट व मार्गदर्शन . 6-00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे परतीचा प्रवास.
0000


विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा कार्यक्रम
नांदेड, दि. 15  :-  विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे दिनांक 17 जानेवारी, 2020 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार, दि. 17 जानेवारी, 2020 रोजी पहाटे 4-00 वाजता रहाटे कॉलनी, नागपूर येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, माहूर ता.माहूर जि. नांदेडकडे प्रयाण. 8-00 शासकीय विश्रामगृह , ता. माहूर जि. नांदेडकडे आगमन व राखीव. 9-00 वाजता रेणुकादेवी माता मंदिर (माहुरदेवी) ता. माहूर जि. नांदेड येथे माहुर देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती. दुपारी 1-00 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, माहूर ता. माहूर जि. नांदेड येथून रहाटे कॉलनी, नागपूरकडे प्रयाण. 5-00 वाजता रहाटे कॉल्नी, नागपूर येथे आगमन व राखीव.  
0000



राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 15 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
00000


सण, उत्सवात ध्वनी वापराची
अधिसूचना निर्गमीत 
नांदेड, दि. 15 :  ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2020 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केली आहे.
या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 173 / 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन 1 मे, दिवाळी, ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबरसाठी एक दिवस. गणपती उत्सव दोन दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव तीन दिवस (पहिला दिवस, अष्टमी व नवमी ) तर  उर्वरित दोन दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल.
या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना आदेश 2 जानेवारी 2020 रोजीपासून नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे, असेही अधिसूचनेत नमुद केले आहे.
००००


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 14 :- जिल्ह्यात रविवार 26 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.  
00000


सक्तीने पदे अधिसूचित करणारा कायदा
1959 नियमावली 1960 कायदाचे पालन करावे
नांदेड, दि. 15 :- विभाग प्रमुख / आस्थापना प्रमुखांनी पदे भरण्यासाठी सक्तीने पदे अधिसूचित करणारा कायदा 1959 व 1960 या कायदाचे पालन करणे आवश्यक आहे.
याबाबत आस्थापनेवरील जी स्थाई, अस्थाई, कंत्राटी आदी विविध प्रकारची पदे भरावयाची असतील अशी पदे भरणेबाबत सदर कायदाचे पालन होण्याच्या अनुषंगाने रिक्तपदे भरण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswavam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या स्वत:चा युझर आयडी व पासवर्ड वापरुन जी पदे भरावयाची आहेत अधिसूचित करावे. तत्संबंधीची पात्र असलेल्या उमेदवारांची यादी विभाग प्रमुख, आस्थापना प्रमुखांनी आपल्या स्तरावरुन काढून घ्यावी. त्यासंबंधीचा अहवाल सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नांदेड कार्यालयास कळवावा. जर युजर आयडी पासवर्ड उपलब्ध नसेल तर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नांदेड कार्यालयास वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी केले आहे.
00000


व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचा प्रमाणपत्र
अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 15 :-  महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांच्यावतीने राबविण्यात येत असलेला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी इच्छूक संस्था, व्यवस्थापनाकडून 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज मागविण्यात आली आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या http:/vit.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येतील.
मान्यता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती मंडळाच्या माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे. माहिती पुस्तिका मंडळाच्या www.msbve.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परिपूर्ण अर्जावरच पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच संस्थेला सर्व प्रकारच्या शुल्काचा ऑनलाईन भरणा करावा लागेल.  
अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याशी संपर्क साधावा किंवा मंडळाचे संकेतस्थळ www.msbve.gov.in पहावे, असे आवाहन प्र. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जि. जि. पाटनूकर यांनी केले आहे.
000000


डाक जीवन विमा
व्यवसायासाठी एजंटची भरती
नांदेड, दि. 15 :- नांदेड डाक विभागात डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा व्यवसायासाठी डायरेक्ट एजंटच्या भरतीसाठी मुलाखत घेण्यात येत आहे.
डाक जीवन विमा 16 एजंट तर ग्रामीण डाक जीवन विमा 15 एजंटसाठी वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष दरम्यान मुलाखतीच्या रोजी आवश्यक आहे. पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त लोकवस्तीचे ठिकाणी नियुक्तीसाठी बारावी उत्तीर्ण तर इतर ठिकाणी दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे.
सुशिक्षित बेकार, माजी विमा सल्लागार, माजी विमा एजंट, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्तो, महिला मंडळ कार्यकर्ते अर्ज करु शकतात. जीवन विमा उत्पादने विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती आदी बाबी अपेक्षित आहेत. नियुक्ती परवाना तत्वावर आणि कमिशन धर्तीवर राहील. सर्व इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज शनिवार 25 जानेवारी 2020 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.30 ते 6 वाजेपर्यंत अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड 431601 येथे भेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे व सोबत बायोडाटा, अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन नांदेड विभाग अधिक्षक डाकघर शिवशंकर बी लिंगायत यांनी केले आहे.
000000



माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना
प्रोफाईल भरण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 15 :-काही माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची प्रोफाईल भरण्याबाबतची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. प्रोफाईल भरण्याची लिंक सद्यस्थितीत बंद असल्याने अशा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोफाईल भरण्यासाठी पुन:श्च अंतिम 13 ते 25 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मान्यता प्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून वेळोवळी अद्ययावत माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी प्रोफाईल भरण्याबाबत पुन:श्च 13 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली होती.
वाढीव कालावधीत ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची प्रोफाईल भरावयाचे राहिले आहे किंवा अपूर्ण राहिले आहे अथवा ज्यांना भरलेली माहिती त्यांना अवश्यक असल्यास दुरुस्ती करावयाची असल्यास समक्ष मंडळ कार्यालयात येऊन प्रोफाईल भरण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रोफाईल संपूर्ण भरलेले आहे त्याची हार्ड कॉपी मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने प्रमाणीत करुन तात्काळ मंडळ कार्यालयास पाठविण्यात यावी, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000


माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना
प्रोफाईल भरण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 15 :-काही माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची प्रोफाईल भरण्याबाबतची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. प्रोफाईल भरण्याची लिंक सद्यस्थितीत बंद असल्याने अशा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोफाईल भरण्यासाठी पुन:श्च अंतिम 13 ते 25 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मान्यता प्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून वेळोवळी अद्ययावत माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी प्रोफाईल भरण्याबाबत पुन:श्च 13 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली होती.
वाढीव कालावधीत ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची प्रोफाईल भरावयाचे राहिले आहे किंवा अपूर्ण राहिले आहे अथवा ज्यांना भरलेली माहिती त्यांना अवश्यक असल्यास दुरुस्ती करावयाची असल्यास समक्ष मंडळ कार्यालयात येऊन प्रोफाईल भरण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रोफाईल संपूर्ण भरलेले आहे त्याची हार्ड कॉपी मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने प्रमाणीत करुन तात्काळ मंडळ कार्यालयास पाठविण्यात यावी, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...