Friday, December 22, 2017

वैद्यकीय शिक्षण मंत्री
गिरीष महाजन यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 22 :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 24 डिसेंबर 2017 रोजी नाशिक येथून नंदीग्राम एक्सप्रेसने सकाळी 8.10 वा. किनवट रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने किनवट महाआरोग्य शिबिराकडे प्रयाण व किनवट येथील महाआरोग्य शिबिरास उपस्थिती. दुपारी 1.35 वा. किनवट रेल्वेस्थानक येथून नंदीग्राम एक्सप्रेसने नाशिककडे प्रयाण करतील. 

00000
दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 22 :- जिल्ह्यातील  नांदेड तालुक्यातील नागापूर, धर्माबाद तालुक्यातील येलापूर, मुदखेड तालुक्यातील वरदडा तांडा, हिमायतनगर तालुक्यातील वाईतांडा या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार 26 डिसेंबर रोजी मतदान बुधवार 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश दिले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेली गावे याठिकाणी मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर सायं 6 वाजेपासून अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची तारीख व ठिकाणी 25 डिसेंबर 2017 रोजी वरीलप्रमाणे व मतदानाचा दिवस 26 डिसेंबर रोजी संपुर्ण दिवस. मतमोजणी होत असलेल्या शहर / गावात मतमोजणीचा दिवस बुधवार 27 डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे

000000
हमी भावाने तूर विक्रीसाठी
शेतकऱ्यांनी नोंदणी करावी
नांदेड, दि. 22 :- केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीभावाने हंगाम सन 2017-18 मध्ये तूर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरु आहे. खरेदी विक्री संघामार्फत देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, नांदेड, लोहा, भोकर, हदगाव येथे नोंदणी सुरु आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत नायगाव व किनवट येथे नोंदणी सुरु आहे. हमी भावाने तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. तूर खरेदीचे शेतकरी पेमेंट ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी सात / बाराचा उतारा पिक पेऱ्याची नोंद असलेला, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
नाताळ, नववर्षानिमित्त विविध
अनुज्ञप्त्या बंद करण्याच्या वेळेत सूट
नांदेड, दि. 22 :-  गृहविभागाने नाताळ व नववर्षानिमित्त 24, 25 व 31 डिसेंबर 2017 रोजी राज्यातील विविध मद्य विक्री अनुज्ञप्त्या निर्धारीत वेळेनंतर रात्री उशीरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासन मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एन. व्ही. सांगडे यांनी दिली आहे.
रविवार 24, 25 डिसेंबर व 31 डिसेंबर या कालावधीत अनुज्ञप्तीचा प्रकार- एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान), एफएलडब्ल्यू-2, एफएलबीआर-2 रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वाजेपर्यंत शिथिल करावयाचा कालावधी आहे. एफएल-3 (परवाना कक्ष) पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत. ई-2 रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत. एफएल-4 पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत. नमुना ई (बीआर बार) रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत. सीएल-3 "क" वर्ग नगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात (कॅन्टॉनमेट वगळून) रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत आणि त्याव्यतिरिक्त इतर क्षेत्रात रात्री 23.59 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वाजेपर्यंत. या वेळेच्या शिथिलतेच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था याचा विचार करुन जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार वेळेतील शिथीलता नाकारु शकतील, असे सहसचिव, गृह विभाग यांचे पत्रात नमूद केले आहे.
000000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 22 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बुधवार 27 डिसेंबर पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 6 वाजेपासून शुक्रवार 26 जानेवारी 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

00000
विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांचा दौरा
नांदेड, दि. 22 :- महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे रविवार 24 डिसेंबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 24 डिसेंबर 2017 रोजी नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 8.09 वा. किनवट रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह किनवटकडे प्रयाण. सकाळी 8.20 वा. शासकीय विश्रामगृह किनवट येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबीर उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- अटल मैदान, एमआयडीसी कार्यालयाजवळ गोकुंदा रोड किनवट. दुपारी 12 वा. मोटारीने किनवट येथुन शासकीय विश्रमागृह माहूरकडे प्रयाण. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन व राखीव.  दुपारी 2 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह माहूर येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 5 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.45 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन रेल्वे स्टेशन नांदेडकडे प्रयाण. सायं. 6 वा. रेल्वे स्टेशन येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

000000
आरटीओ कार्यालयाचे तालुका शिबीर  
नांदेड, दि. 22 :- प्रादेशीक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील 9 तालुक्यात मोटार वाहन निरीक्षकाचे तालुका शिबीर जानेवारी ते जुलै 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.   
या शिबीर कार्यालयाचा दौरा पुढीलप्रमाणे राहील.  
शिबिराचे ठिकाण
जानेवारी 2018
फेब्रुवारी 2018
मार्च 2018
एप्रिल 2018
मे
2018
जुन
2018
कंधार
5, 22
5, 22
5, 22
5, 21
5, 22
5, 22
मुखेड
8, 18
7, 21
7, 19
7, 19
7, 18
7, 19
किनवट
10
12
12
10
10
11
मुदखेड
12
14
14
13
14
14
हदगाव
15, 31
15
15, 28
16
15, 31
15, 28
हिमायतनगर
17
17
17
17
17
18
देगलूर
6, 20
6, 20
6, 20
6, 20
8, 21
6, 20
धर्माबाद
16, 25
16, 26
16, 26
12, 25
16, 25
13, 25
माहूर
30
----
31
28
30
30
वरील कालावधीत स्थानिक सुटी जाहीर झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होऊ शकतो, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
रब्बी हंगाम पाणी-पाळीसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22 :- सद्यस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्यातून लाभक्षेत्रातील उभी हंगामी व बारमाही पिकांना संरक्षणात्मक एक पाणी-पाळी डिसेंबर 2017 अखेर देण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरण) लाभक्षेत्रातील बागायतदारानी नमुना 77 अमध्ये पाणी अर्ज करावीत, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी केले आहे.  
            उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा कालवा कि.मी. 119 व इसापूर डावा कालवा कि.मी. 84 पर्यंतच्या वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांना, सिंचन वर्ष 2017-18 मध्ये इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने रब्बी हंगामाच्या प्रारंभी धरणात केवळ 14 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामासाठी सिंचन कार्यक्रम पुर्णपणे राबविणे शक्य होणार नाही.
खालील दर्शविलेल्या शर्तीस व शासनाच्या प्रचलीत नियमास अनुसरुन पाणी अर्जास मंजूरी देण्यात येईल. हंगामाची मुदत 15 ऑक्टोंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 पिकाचे नाव- उभ्या पिकांना संरक्षणात्मक पाणी पाळी. पाणी अर्जाचा विहित नमुना क्र  7 व 7 अ संबंधीत शाखा कार्यालयात विनामुल्य मिळेल. सदर पाणी अर्जात पिकाची मागणी 20 आरच्या पटीत नोंदवावी. अर्जातील पूर्ण माहिती भरुन पाणी अर्ज कार्यालयीन वेळेत शाखा कार्यालयात दाखल करुन त्याची पोंच पावती घ्यावी. पाणी अर्ज भरतेवेळेस थकबाकीदार लाभधारकांनी मागील थकबाकी व चालु पिकांची अग्रीम पाणीपट्टी भरुन सहकार्य             करावे म्हणजे दिलेला पाणी अर्ज मंजूर होईल. नियमानुसार पाणीपट्टी भरणा न केल्यास पाणी अर्ज नामंजूर होईल तेंव्हा नामंजुर क्षेत्रास कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. मंजुर क्षेत्रासच कालव्याचे पाणी अग्रक्रमाणे देण्यात येईल. नामंजुर व अनधिकृत क्षेत्रास कालव्याचे पाणी देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर राहणार नाही तेंव्हा मंजूरी घेवुनच पिकांचे नियोजन करावे. उडाप्याचे व वितरिका, मायनरच्या टेलच्या भागातील क्षेत्रास परवानगी दिली जाणार नाही. तेंव्हा कालव्याच्या पाण्यावर विसंबुन पिके घेवु नयेत याची नोंद घ्यावी या व्यतिरिक्त टेलच्या भागात पिके घेतल्यास व पाण्याअभावी पिके वाळल्यास त्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही.
प्रत्येक लाभधारकांनी ठरवुन दिलेल्या तारखे प्रमाणेच पिकास पाणी घ्यावे. तसेच दिवसरात्र पाणी घेणे बंधनकारक  आहे. दिवसा किंवा रात्री जेंव्हा पाणी पाळी येईल तेंव्हा पाणी घेतले नाहीतर नदी / नाल्यास पाणी वाया जाते त्यामुळे सिंचनाचा कालावधी वाढतो पर्यायाने पाणी पाळी अंतरात वाढ होते. त्यामुळे असे पाणी वाया गेल्यास ठरावीक मुदतीत पाणी देणे शक्य होणार नाही व त्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. सिंचन करतेवेळी मंजूर क्षेत्राचा पास जवळ ठेवावा. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपत्तीचा काटेकोरपणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाने टाळावा.
नैसर्गीक आपत्ती व काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास व त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलीत नियमानुसार शर्ती व अटीचे उल्लंघन झाल्यास लाभधारकास अगाऊ सुचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणी पुरवठा बंद करण्यात येईल. सिंचन नियमांचे पालन करणे प्रत्येक लाभधारकास बंधनकारक राहील. नियमाचे उल्लंघन केल्यास  संबंधीतावर शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. पाणी वापर संस्थानी पाणी पाळीतच संस्थेचे क्षेत्र भिजवुन घ्यावे, असेही आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.  

000000
वाहन नोंदणी प्रमाणपत्र
स्मार्ट कार्ड स्वरुपात
नांदेड, दि. 22 :-  सर्व संवर्गातील वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी) हे स्मार्ट कार्ड स्वरुपात 26 डिसेंबर पासून देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डसाठी दोनशे रुपये प्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. याबाबत संबंधीत वाहन वितरक व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
नूतन वर्ष स्वागताच्या करमणूक
 कार्यक्रमासाठी परवानगी आवश्यक
नांदेड, दि. 22 :- जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, क्लब, अथवा मॉटेल क्लब आणि अन्य करमणूक केंद्रे चालकांना व तत्सम करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना नूतन वर्षाच्या आगमनानिमित्त करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करावयाचे असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेत अर्ज सादर करावा व रीतसर परवानगी मिळवावी. विनापरवाना आयोजित करमणुकीच्या कार्यक्रमावर शासन नियमानुसार करमणूक शुल्काची दंडासह आकारणी करण्यात येईल.
विनापरवाना करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणे मुंबई करमणुक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 5 () गुन्हा असून विनापरवाना करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर सदर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 व तदांतर्गत मुंबई करमणूक शुल्क नियम 1958 च्या अधिन राहून नांदेड जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, क्लब अथवा मॉटेल कल्ब आणि अन्य करमणूक केंद्रे येथे नुतन वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ठिकाणी करमणुकीच्या कार्यक्रमावर मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 3 (1) (बी) नुसार करमणूक कराची आकारणी करण्यात येते

000000
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त रविवारी  
तहसिल कार्यालयात कार्यक्रम
नांदेड, दि. 22 :- ग्राहकांच्या हक्कांची व ग्राहक संरक्षण कायदा यांची जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने नांदेड तहसिल कार्यालय येथे रविवार 24 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 11 वा. राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील राहणार आहेत.
प्रमुख वक्ते म्हणून ग्राहक पंचायतीचे देवगिरी प्रांत उपाध्यक्ष डॅा. बा. दा. जोशी व विभागीय संघटक आर. एस. कमटलवार हे राहतील. या कार्यक्रमास ग्राहक व नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...