Sunday, March 25, 2018


पाच दिवशीय जिल्हा कृषि महोत्सवाचे आज उद्घाटन

नांदेड:- कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) या विभागामार्फ़त आयोजीत केलेल्या पाच दिवशीय जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन नवा मोंढा मैदानात सोमवार दि.26.03.2018 रोजी दुपारी 12.30 वा. जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री. रामदास कदम, यांचे हस्ते होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, डॉ. टी.एस.मोटे प्रकल्प संचालक (आत्मा), डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, श्रीमती.शांताबाई पवार जवळगावकर, खासदार श्री. अशोकराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थितंामध्ये महापौर श्रीमती. शिला किशोर भवरे, खासदार राजीव सातव, खासदार डॉ.सुनिल गायकवाड, आ.अमर राजुरकर, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.डी.पी.सांवत, आ.वसंतराव चव्हाण, आ. प्रदीप जाधव (नाईक), आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.सुभाष साबणे, आ. श्रीमती अमिताताई चव्हाण, आ.हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. डॉ. तुषार राठोड, कृषि सभापती ®äúøÒ दत्तात्रय लक्ष्मण ®äúøÒ, नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.बी.आर.कदम उपस्थित राहणार आहेत.
दि.26 ते 30 मार्च 2018 या पाच दिवसीय जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे. सदर महोत्सवामध्ये कृषि कृषि संलग्न विभाग, शासनाचे विविध विभाग, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, विविध महामंडळे, खाजगी कंपन्या, महिला बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादीची दालने असणार आहेत. धान्य महोत्सवाचे खास आकर्षन कृषि महोत्सवामध्ये असणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला माल थेट ग्राहकांना येथे विक्री केला जाणार आहे. शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी खाजगी कंपन्यांची विविध दालनेही राहणार आहेत.
यात पाच दिवस विविध विषयावर तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात सोमवारी दुपारी 2 ते 3 यावेळेत केळी लागवड तंत्रज्ञान याविषयी  श्री.हणमंत राजेगोरे यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी 3 ते 4 यावेळेत हळद लागवड तंत्रज्ञान याविषयी प्रगतशील शेतकरी श्री.अशोक कऱ्हाळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. मंगळवारी सकाळी 11 ते 12 यावेळेत शेडनेट मधील भाजीपाल लागवड याविषयी प्रगतशील शेतकरी श्री. माधव सुर्यवंशी मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12 ते 1 यावेळेत हळद काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी येथील डॉ. देविकांत देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. बुधवारी सकाळी 11 ते 12 यावेळेत विक्रेता-खरेदीदार संम्मेलन होणार आहे. यात श्री.दत्तात्रय जाधव, कुकुटपालन याविषयावर मार्गदर्शन होणार आहे. दु.12 ते 1 यावेळेत श्री.राजेश भाटीया, यांचे सोयाबीन पिकासंबंधी मार्गदर्शन होणार आहे. गुरुवारी सकाळी 11 ते 12 यावेळेत ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी प्रगतीशील शेतकरी श्री. पांडूरंग आव्हाड शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दु.12 ते 1 या वेळेत रेशीम शेती हमखास उत्पादनाची हमी याविषयी जिल्हा रेशीम विकास अधिकारी, श्री. प्रकाश पाटील मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी 11 ते 12 यावेळेत कापूस लागवड गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन याविषयावर कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी येथील श्री.प्रा.माणिक कल्याणकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी 3 ते 5 यावेळेत मान्यवरांच्या उपस्थिती कृषि महोत्सवाचा समारोप होणार आहे. या पाच दिवशी कृषि महोत्सवात शेतकऱ्यांनी सहभागी होवून परिसंवादाच्या लाभ घ्यावा असे आवाहन मा.जिल्हाधिकारी, श्री. अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अशोक शिनगारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, डॉ. टी.एस.मोटे, प्रकल्प संचालक (आत्मा), डॉ. व्ही. व्ही. भरगंडे कृषि विकास अधिकारी श्री.पी.एस.मोरे यांनी केले आहे.

प्रकल्प संचालक (आत्मा)
नांदेड

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...