Tuesday, December 29, 2020

 


सशस्त्रसेना ध्वजनिधीस

या क्युआर कोडद्वारे देता येईल देणगी !

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 29  :- सशस्त्रसेना ध्वजनिधीस नांदेड जिल्ह्यातून 1 कोटीपेक्षा अधिक देणगी जमा करण्याचा निर्धार केला आहे. देणगीदारांना सशस्त्र सेना ध्वजनिधीस सुलभ पद्धतीने आपले योगदान  / देणगी देता यावी यासाठी राज्यात प्रथमच नांदेड जिल्ह्याने क्युआर कोडची निर्मिती करुन हा कोड उपलब्ध केला आहे. सामाजिक संस्था, विविध संघटना, व्यापारी प्रतिष्ठान,  महाविद्यालये / शाळा  व सामान्य जनता यांनी  या क्युआर कोडद्वारे देणगी रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

 

भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुंटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र सेनादलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पूनर्वसनासाठी विविध कल्‍याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्रसेना ध्वजनिधीचा विनियोग केला जातो. अशा या उदात्त कार्यासाठी समाजाकडून सढळ हाताने मदतीची अपेक्षा आहे.

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सशस्त्रसेना ध्वजनिधीच्या पत्रकांची व क्युआरकोड स्टिकर्सचे सर्व ठिकाणी वाटप करण्यात येत आहेत.  सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी दिलेली संपुर्ण रक्कम आयकर कायदा 1961, कलम 80 जी (5)  (VI) अन्वये करमुक्त आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9403069447  वर संपर्क करावा,  असे आवाहन  नांदेडचे  सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर  यांनी केले आहे.

00000

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार 29 डिसेंबर 2020 चे सकाळी 6 वाजेपासून ते सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

41 कोरोना बाधितांची भर तर

30 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मंगळवार 29 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 41 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 29 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 30 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 891 अहवालापैकी 846 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 360 एवढी झाली असून यातील 20 हजार 293 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 295 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 572 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, देगलूर कोविड रुग्णालय 2, धर्माबाद तालुक्यांतर्गत 1, हदगाव कोविड रुग्णालय 2, मुखेड कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 4 असे एकूण 30 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, लोहा तालुक्यात 1, परभणी 1 असे एकुण 12 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 11, मुखेड तालुक्यात 9, किनवट 2, देगलूर 1, भोकर 1, कंधार 2, लोहा 2, यवतमाळ 1 असे एकुण 29 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 295 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 24, मुखेड कोविड रुग्णालय 20, देगलूर कोविड रुग्णालय 18, हदगाव कोविड रुग्णालय 4,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 122, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 45, हैद्राबाद येथे  संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 24 आहेत.   

मंगळवार 29 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 166, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 63 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 79 हजार 251

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 53 हजार 631

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 360

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 293

एकुण मृत्यू संख्या-572

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-623

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-295

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-16.           

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...