Wednesday, June 23, 2021

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड जिल्हा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

शनिवार 26 जून रोजी दुपारी 3.30 वा. अहमदपुर जि. लातूर येथून मोटारीने लोहा येथे आगमन व जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांच्या समवेत लोहा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. 4.15 वा. लोहा येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायं. 4.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5 वा. जिल्हास्तरीय समाज कल्याण विभागाची आढावा बैठक स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. 

रविवार 27 जून रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून हरीहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10.15 वा. नांदेड शहर जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नांदेड दक्षिण / उत्तर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.45 वा. नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नायगाव देगलूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 ते 2.45 वाजेपर्यंत नांदेड येथे राखीव. दुपारी 2.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत मुखेड व भोकर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.15 वा. नांदेड येथून मोटारीने हदगावकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. हदगाव येथे आगमन व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत हदगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. 6.30 वा. हदगाव येथून मोटारीने माहूरकडे प्रयाण. रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन मुक्काम. 

सोमवार 28 जून रोजी सकाळी 9 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत किनवट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 10 वा. माहूरगड येथून मोटारीने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.

00000

 

 जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोविशील्डचा पहिला आणि दुसरा डोस तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 24 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 11 केंद्रावर कोविशील्डचा 18 ते 44 वयोगट आणि 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको या 11 केंद्रावर प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस दिला जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 21 जून पर्यंत एकुण 5 लाख 11 हजार 936 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 22 जून पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 89 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 34 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. तसेच कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटासाठी फक्त दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

शासनाच्या अर्थसहायाचा लाभ घेण्यासाठी

घरेलू कामगारांनी वैयक्तीक माहिती अद्ययावत करावी 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- घरेलू कामगारांची नोव्हेंबर ते 31 मार्च 2021 या कालावधीत नोंदीत झालेली वैयक्तीक माहिती अद्यावत करण्याबाबत सूचना आहेत. महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत कामगारांना कोविड-19 प्रादुर्भाव काळात आर्थिक मदत करण्याच्यादृष्टीने शासनाने प्रत्येकी 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. सन 2011 ते 2014 पर्यंत नोंदीत घरेलु कामगारांची माहिती ऑनलाईन संकलित केली नाही. तसेच 2015 ते 2021 या कालावधीत बऱ्याच नोंदीत घरेलु कामगाराचे बँक तपशील उपलब्ध नाही. या कालावधीतील सर्व नोंदीत घरेलू कामगारांनी त्यांची वैयक्तीक माहिती तसेच बँक खात्याचा तपशील अद्यावत करण्यासाठी http://public.mlwb.inpublic या लिंकचा वापर करावा अथवा सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड, उद्योग भवन, तळ मजला, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड या कार्यालयाशी संपर्क करावा साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.

00000

 

 

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी  

रोजगार मार्गदर्शनपर वेबिनारचे शुक्रवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- लॉकडाऊन नंतर बेरोजगार उमेदवारांना / युवक-युवतींना रोजगाराकडे कसे जाता येईल याबाबत मार्गदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शुक्रवार 25 जून रोजी दुपारी 3 वाजता वेबीनारचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार / युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

या वेबिनारच्या माहितीसाठी (02462) 251674 या क्रमांकावर सपर्क करावा. वेबिनार जॉइन करण्यासाठी या https://meet.google.com/ziu-fbax-rvw गुगल मीट लिंकचा उपयोग करावा. वेबीनारसाठी आपले रजिस्ट्रेशन/नोंदणी करण्यासाठी या https://forms.gle/CCUhiFTWEFqNYuSj8 लिंकवर ऑनलाइन फॉर्म भरावेत. या वेबीनारमध्ये प्रताप श्रीनिवासन क्लस्टर हेड, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र औरंगाबाद, विजय जवंजाळ, सेंटर हेड, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र औरंगाबाद आणि विजय पुरोहित, सेंटर हेड, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र नांदेड हे मार्गदर्शन करणार आहे असे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 23 व्यक्ती कोरोना बाधित

तर  42 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 847 अहवालापैकी  15 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर अँटिजेन तपासणीद्वारे 5 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 184 एवढी झाली असून यातील 88 हजार 495 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 201 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 7, लोहा तालुक्यांतर्गत 4, अर्धापूर 1, परभणी 1, हिमायतनगर 1, कंधार 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, नायगाव 1, बिलोली 2, हदगाव 1, मुखेड 1 असे एकूण 23 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 42 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 1,  मुखेड कोविड रुग्णालय 1,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 32, खाजगी रुग्णालय 6 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 201 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 22,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  2, किनवट कोविड रुग्णालय 5, देगलूर कोविड रुग्णालय 3,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 88, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 60, खाजगी रुग्णालय 11 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 129 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 94 हजार 282

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 91 हजार 567

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 184

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 495

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 903

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-45

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-112

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 201

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2                       

00000

 

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष

आनंद निरगुडे यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 23 :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश आनंद वसंत निरगुडे (निवृत्त) हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

रविवार 27 जून रोजी औरंगाबाद येथून रेल्वेने सायं. 6.08 वा. नांदेड रेल्वेस्थानकावर आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. सोमवार 28 जून रोजी सहायक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नांदेड यांच्या सोबत बैठक. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. मंगळवार 29 जून रोजी सकाळी 9 वा. श्री गुरु गोविंद सिंघजी राष्ट्रीय विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

 

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री

जयंत पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे 26 व 27 जून रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.   

शनिवार 26 जून रोजी दुपारी 3.30 वा. अहमदपुर जि. लातूर येथून मोटारीने लोहा येथे आगमन व लोहा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ- व्यंकटेश मंगल कार्यालय लोहा. सायं. 4.15 वा. मोटारीने लोहा येथून नांदेडकडे प्रयाण. सायं. 5 वा. नांदेड येथे आगमन व नांदेड जिल्हा जलसंपदा अधिकाऱ्यांची आढावा बैठक स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व बैठकीनंतर राखीव. रात्री शासकिय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. 

रविवार 27 जून रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजेपर्यंत हरिहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष यांचेकडे राखीव. सकाळी 9.30 ते 10.15 वाजेपर्यंत पत्रकार परिषद स्थळ एम.जी. कॉलेज नांदेड. सकाळी 10.15 ते 10.45 वाजेपर्यंत नांदेड शहर जिल्हा कार्यकारिणी बैठक. सकाळी 10.45 ते 11.15 वाजेपर्यंत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सकाळी 11.15 ते 11.45 वाजेपर्यंत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी 11.45 ते 12.30 वाजेपर्यंत नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठक. दुपारी 12.30 ते 1.15 वाजेपर्यंत नायगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी 1.15 ते 2 वाजेपर्यंत देगलूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी 2 ते 2.45 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.45 ते 3.30 वाजेपर्यंत मुखेड विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी 3.30 ते 4.15 वाजेपर्यंत भोकर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. या सर्व बैठकांचे स्थळ- एम. जी. कॉलेज नांदेड. सायं. 4.15 वा. मोटारीने नांदेडहून हदगावकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. हदगाव येथे आगमन व हदगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ- संत रोहिदास सभागृह नगरपालिका हदगाव. सायं. 6.30 वा. हदगाव येथून मोटारीने माहूरकडे प्रयाण. रात्री 8 वा. माहूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...