Monday, March 13, 2023

वृत्त क्रमांक 121

 निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

योजनेतर्गत प्रशिक्षण संस्थेची निवड

नांदेड (जिमाका) दि. 13 :- .अल्‍पसंख्‍याक विकास विभाग मुंबई यांच्या शासन निर्णय 2 मार्च 2023 अन्वये वर्ष 2022-23 मध्‍ये अल्‍पसंख्‍याक समाजातील तरुणांसाठी तीन महिन्‍यांचे निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग नांदेड जिल्‍ह्यात चालविण्‍यास विवेकानंद बहुद्देशीय शिक्षण क्रीडा, सांस्‍कृतिक सामाजिक, व्‍यायाम प्रसारक मंडळ, वजिराबाद नांदेड या संस्‍थेस मंजुरी प्रदान करण्‍यात आली आहे.

या संस्‍थेमार्फत प्रशिक्षण वर्ग घेण्‍यात येणार असून, शासन निर्णयातील दिलेल्‍या सूचनांनुसार, इच्‍छुक तसेच यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतलेल्‍या आणि शासन निर्णयातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या इच्‍छुक उमेदवारांचे अर्ज मागवून घेण्‍याची कार्यवाही संबंधीत संस्‍थेमार्फत राबविण्‍यात येत आहे. तरी जिल्‍ह्यातील अल्‍पसंख्‍यांक समाजातील इच्‍छुक उमेदवारांनी शासनाच्‍या या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी संबंधीत संस्‍थेस (विवेकानंद बहुद्देशीय शिक्षण क्रीडा, सांस्‍कृतिक सामाजिक, व्‍यायाम प्रसारक मंडळ, वजिराबाद नांदेड-अध्‍यक्ष-विक्रांत खेडकर-मो.क्र.८३७९०६३९९९यांच्याकडे संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

वृत्त क्रमांक 120

 महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा

पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 13 :- महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार सन 2022-23 या वर्षासाठी वैयक्तीक व संस्थेसाठी असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. या दोन पुरस्कारांसाठी इच्छूक व्यक्ती व संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव बुधवार 15 मार्च 2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याणनांदेड यांच्याकडे विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्ताव चारित्र्य प्रमाणपत्रासह सादर करावेतअसे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराची नियमावली 8 मार्च 2019 रोजीच्या  शासन निर्णयात देण्यात आली आहे. यानुसार वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिककलात्मकसमाज संघटनात्मकअध्यात्मिक प्रबोधनसाहित्यिक क्षेत्रात काम करत असलेले व्यक्तीसंस्थेच्या कामाची दाद/दखल घेऊन त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो. समाजातील समाजसेवककलावंतसमाज संघटनात्मक कार्यकर्तेआध्यात्मिक प्रबोधनकारसाहित्यिकांनी पुढे यावेत या उद्देशाने हा पुरस्कार व्यक्ती व सामाजिक संस्थेसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. नियमावली बाबत 8 मार्च 2019 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहेअसेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

000000 

वृत्त क्रमांक 119

 किनवट तालुक्यातील त्या नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांमध्ये 

जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन जागविला आत्मविश्वास

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- किनवट तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असंख्यजणांची उपजिविका उपलब्ध असलेली शेती व पशुधनावर अवलंबून आहे. यात आदिवासीसह बंजारा व त्यातल्या त्यात मथुरा लभान सारख्या अत्यल्प संख्या असलेलाही समाज आहे. ग्रामीण भागातील  महिलांच्या आरोग्याचे प्रश्न अधिक गंभीर व याचबरोबर शेतकऱ्यांचाही नैराश्याचा कल अधिक असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी थेट गावांना भेटी देऊन शेतकरी, समाज प्रमुखांशी चर्चा सुरु केल्या आहेत. त्यांनी नुकतीच करंजी गावाला भेट दिली. येथील महंत भागचंद मशन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथेच त्यांचा इतर वरिष्ठ धर्मगुरू समक्ष ग्राम बैठक घेतली. दुपारी सुरू झालेल्या या ग्रामबैठकीला गावकऱ्यांनी झाडून हजेरी दिली.

 

"शेतीची उकल सोपी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक नानाविविध योजना हाती घेतल्या आहेत. शेतीपूरक उद्योगावर भर दिला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेसमवेत महाराष्ट्र शासनाने आणखी 6 हजार रुपयाची भर घातली आहे. वर्षाला 12 हजार रुपये ही सरळ मदत मिळणार असून आम्ही तुमच्य खंबीरपाठीशी आहोत.  याचबरोबर या परिसरात महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने विशेष लक्ष ही प्रशासनातर्फे दिले जात आहे. कली उमलतांना या नाविन्यपूर्ण मोहिमेंचाही आपण शुभारंभ केला असून मथुरा लभान समाज व इतर समाजातील व्यक्तीने अधिक सकारात्मक लोकसहभाग शासनाच्या या  योजनेत घ्यावा."

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

******

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...