Thursday, July 8, 2021

 

जिल्ह्यातील 62 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 62 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 9 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील शासकीय श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय या 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत.  ग्रामीण रुग्णालय बिलोली, मुदखेड, उमरी या 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय लोहा या केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्यातील 24 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 3 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 7 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 54 हजार 428 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 8 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 31 हजार 830 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 11 हजार 190 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू

दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेशच्छूक विद्यार्थी करू शकतात नाव नोंदणी 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी दहावी नंतरच्या पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया 30 जून 2021 पासून शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू करण्यात आली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेट्रीकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, प्रॉडक्शन, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या शाखांचे प्रत्येकी तीन वर्षांचे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. या केन्द्रीभूत प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या निकलापुर्वीच प्रवेशच्छूक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर शुक्रवार 23 जुलै 2021 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करुन प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले आहे. 

यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) नसल्याने विद्यार्थ्यांना केवळ दहावीच्या गुणांनुसार प्रथम वर्षात प्रवेश मिळणार आहे. प्रथम वर्षात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी त्यांचे पालकांना मार्गदर्शन सहाय्य करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे विनामूल्य सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. 

दहावीच्या निकलापर्वीच प्रवेशच्छूक विद्यार्थ्यांना dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर नोंदणी अर्ज करता येईल. अर्जात विद्यार्थ्यांना शालांपरीक्षेचा आसन क्रमांक अचूकपणे टाकायचा आहे. शालांत परीक्षेच्या निकालानंतर माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन संबंधित विद्यार्थ्यांचे गुण प्राप्त होतील अर्जदार विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज अपडेट होईल. ऑनलाईन फॉर्म भरताना मु कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. प्रवेश अर्ज भरण्यासाठी -स्क्रुटिनी प्रत्यक्ष स्क्रुटिनी (म्हणजे संस्थेत जाऊन) असे पर्याय उपलब्ध आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी -स्क्रुटिनी या पर्यायाची निवड करता येईल. -स्क्रुटिनीमध्ये विद्यार्थी स्वतःच्या संगणकाद्वारे किंवा मोबाईलद्वारे प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाता  घरूनच अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात. प्रत्यक्ष स्क्रुटिनीसाठी  विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांसह सुविधा केन्द्रावर उपस्थित राहावे लागेल.

शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या 1964 मध्ये सुरू झालेल्या संस्थेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेट्रीकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, प्रॉडक्शन, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या शाखांचे प्रत्येकी तीन वर्षांचे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. तसेच या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या अनेक शिष्यवृत्या उपलब्ध आहेत. रोजगाराभिमुख अभियांत्रिकी शिक्षण ही काळाची गरज असून शालांत परीक्षा निकालापूर्वीच सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असेही आवाहन शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ.गोरक्ष गर्जे यांनी केले आहे.

0000

 

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 36.2 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात गुरुवार 8 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 36.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 47.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात गुरुवार 8 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 23.5 (25.4), बिलोली- 42.3 (57.2), मुखेड- 27.9 (63.2), कंधार- 20.3 (23.1), लोहा- 23.5 (27.7), हदगाव-38.8 (39), भोकर- 59 (62.8), देगलूर- 33.6 (52.3), किनवट- 57.7 (80.5), मुदखेड- 36.6 (39), हिमायतनगर-28 (30.2), माहूर- 21.4 (34.9), धर्माबाद- 45 (65.1), उमरी- 56.3 (75.6), अर्धापूर- 26.6 (27.9), नायगाव- 52.4 (70.4) मिलीमीटर आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...