Thursday, April 6, 2023

 समता पर्वानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व पथनाट्य कार्यक्रम संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 6 :- सामाजिक न्याय विभागातर्गंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्यावतीने 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतापर्व अभियानातर्गंत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यत संवाद साधण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वानिमित्त 6 एप्रिल 2023 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळा हदगाव येथे पथनाट्य, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी. आर. बुरकुले, तर कार्यालय अधीक्षक आर. व्ही .सुरकूटलावार यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडल्या. यावेळी कनिष्ठ लिपिक सुदर्शन खराटे, अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कार्यरत अनु. जाती. मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा पथनाट्यात सुमारे 1 हजार 200 विद्यार्थी-विद्यार्थीनीनी सहभाग नोंदविला.

0000

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय

महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 6 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे  आयोजन करून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ.पी. टी. जमदाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीचे अधिष्ठाता डॉ. संजय मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप बोडके तसेच सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम बाह्यरुग्ण विभागात भित्तीपत्रकाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. एमबीबीएस दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थांनी पथनाट्याद्वारे शासनाच्या विविध आरोग्य योजनांची जनजागृती केली. डॉ. पी.एल. गट्टानी यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जागतिक आरोग्य दिनाचे महत्व विषद केले. 

मानवी जीवनात उत्तम आरोग्यासाठी केवळ रुग्णालयावर अवलंबून न राहता प्रत्यकाने स्वतः दैनंदिन जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे असल्याचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात उद्भवणाऱ्या विविध आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संशोधनाचे योगदान महत्वाचे असल्याचे डॉ. संजय मोरे यांनी विषद केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप बोडके यांनी शारीरिक आरोग्य बरोबरच मानसिक स्वास्थ्य हे पण तेवढेच महत्वाचे असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला डॉ. आर.डी. गाडेकर, डॉ. इस्माईल इनामदार, डॉ. महावीर नाकेल, डॉ. ज्योती भिसे, डॉ.मैदपवाड, डॉ.ओमप्रसाद दमकोंडवार तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक, नर्सिंग विद्यार्थी, एम.बी.बी.एसचे विद्यार्थी, निवासी डॉक्टर  आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पी.एल. गट्टानी, प्राध्यापक व विभाग प्रमुख, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गीतांजली केंद्रे, सर्व निवासी डॉक्टर्स, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे, अर्जुन राठोड, सा.आ. परिचारिका ममता उईके आणि बळीराम कांबळे व केशरबाई शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश्वर माचेवार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. फेरोज खान यांनी केले.

0000  



सोमवारी आयटीआय शिकाऊ उमेदवारासाठी भरती मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 6 :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केन्द्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने सोमवार 10 एप्रिल 2023 रोजी आयटीआय उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनांतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे.

या मेळाव्यासाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. फिटर, एसएमडब्लु, एमआरएसी, मेकॅनिस्ट, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन कोप्पा, टीडीएम, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, आयसीटी एस एम, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल, मेकॅनिकल व सर्व आवश्यक ट्रेडसाठी एकूण 850 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...