Monday, April 1, 2024

वृत्त क्र. 296

 सार्वत्रिक निवडणुकीत 80 टक्के मतदानाचे

उद्दिष्ट ठेवून व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड दि. १ :  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांनी मतदान केलं पाहिजे. यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करून नांदेड लोकसभा मतदारसंघात 80 % च्यावर मतदार मतदान करतील हे उद्दिष्ट ठेवून युवकयुवती व  नागरिकांच्या सहभागातून यापूर्वी मतदान कमी झाले आहे अशा क्षेत्रात  सर्व लोकमाध्यमे,सामाजिक माध्यमे व प्रत्यक्ष संवादातून मतदानाचा टक्का वाढवावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज स्वीपच्या बैठकीत केले.  ‍

 

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीप कक्षाच्या सदस्यांची आज बैठक महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी गाव व तालुकास्तर या ठिकाणी स्वीप कक्षाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती संबंधित तालुक्याचे प्रमुखतहसीलदारगटशिक्षणाधिकारी आणि संबंधित सदस्यांनी दिली.

 

 नागरी मतदार मतदान करण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे या सादरीकरणांमध्ये दर्शविण्यात आले. ज्या ठिकाणी मतदान अत्यंत कमी झाले अशा ठिकाणांची नोंद घेऊन त्या त्या ठिकाणी आयोजित करावयाचे कार्यक्रमलोकमत अनुकूल करणे,माध्यमांचा वापरप्रत्यक्ष भेटीगृह संवाद अशा विविध उपक्रमातून कक्षाचे सदस्य कार्य करीत आहेत.

 

देगलूरभोकर ,नांदेड ,कंधारलोहामुखेडकिनवट ,माहूर या तालुक्यांनी आपापल्या तालुक्यात करीत असलेल्या कामाचे सादरीकरण केले. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे ,माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगरयोजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी शालेय विद्यार्थीकनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या सहभागाबद्दल माहिती दिली.


मतदार जनजागृती मोहिमेत किनवटचे प्राध्यापक शाहीर मार्तंड कुलकर्णी यांनी दुर्गम भागातील गावांना भेट देऊन जनसंवाद कार्यक्रम आखला आहेयाची माहिती दिली.असंघटित क्षेत्रातील कामगारांना सुट्टी देण्याबाबत संबंधित आस्थापनांच्या मालकांना भेटून विनंती केली आहे. स्थलांतरामुळे जे मतदार बाहेरगावी राहतात त्यांना गावात आणण्यासाठी उपाययोजना सहायक जिल्हाधिकारी किनवट करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीवरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्यात येत आहे. प्रतिज्ञारिंगणपथनाट्य आई-बाबांना संकल्प पत्र ,भटक्यांच्या पालांच्या ठिकाणी भेटीलग्नकार्यात आवाहनमंदिरात आवाहनसामाजिक माध्यमेपथनाट्यछोटे छोटे व्हिडिओ तयार करून रंजकपणे माहिती देणे घोषवाक्य आदी तयारी करण्यात येत आहे. 

 

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

 नव मतदार युवक युवती मतदान करण्यासाठी उत्साहीत असतात. त्यांच्यातील उत्साहाला आपण सर्वांनी बळ द्यावे. यासाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालय ,वरिष्ठ महाविद्यालयविविध शैक्षणिक संस्थातरुणांचे सामाजिक संघटन आदींना यात सहभागी करून घ्यावे. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्यप्राध्यापक यांचा यामध्ये सहभाग घेऊन मतदान वाढविता येईल.  

 

महेश कुमार डोईफोडे महानगरपालिका आयुक्त        

शहरातील डॉक्टर्सलायन्स क्लबवेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मतदान जनजागृती अभियानात समाविष्ट करून घेण्यात येत आहे. मतदान करणाऱ्या रुग्णांना डॉक्टरची ट्रीटमेंट मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लायन्स क्लबच्या दवाखान्यात तशाच सोयी करण्याबाबत प्रयत्न आहेत. महानगरपालिका पातळीवर सर्व बाबतीत जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

0000







वृत्त क्र. 295

 नांदेडमध्ये सोमवारी दोन अर्ज दाखल 

आतापर्यत एकूण ५ अर्ज दाखल ४ एप्रिलपर्यंत मुदत १०८ अर्जाची उचल


नांदेड दि. १ : सोमवारी १६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आणखी दोन अर्ज दाखल झाले आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र केशव पोपळाईतकर यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज सोमवारी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या गुरुवारी एकशानिवारी दोन तर आज सोमवारी दोन असे एकूण आतापर्यंत ५ अर्ज दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत १०८ अर्जाची उचल झाली आहे.४ एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे.

 

आतापर्यंत इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाणअपक्ष म्हणून महारुद्र केशव पोपळाईतकरअकबर अख्तर खॉनसाहेबराव भिवा गजभारे जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण यांनी अर्ज दाखल केला आहे.

 

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे. २८ मार्च  ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उद्यापासून पुढील ३ दिवस अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.

00000




दि. 31 मार्च 2024

 वृत्त क्र. 294

 

जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे

'एमसीएमसी 'चे प्रमुख कार्य : अभिजीत राऊत

 

नियोजन भवनातील माध्यम कक्षाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 

नांदेड दि. 31 : राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, प्रिंट माध्यमात येणाऱ्या जाहिराती व मजकूर या माध्यमातून पेड न्यूज तर जात नाही याची देखरेख, पॉम्प्लेट, हॅन्डविल यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव तपासणे, जाहिराती व पेड न्यूजचा खर्चाचा अहवाल एक्सपेंडिचर ( खर्च ) विभागाला देणे ही प्रमुख कामे माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण  समितीचे (एमसीएमसी )असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये कॅबीनेट हॉलपुढे सर्व सुविधांनी युक्त अशा एमसीएमसी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एमसीएमसी समितीचे अध्यक्ष असतात त्यांनी या कक्षाला भेट देऊन आतापर्यंत झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी त्यांचे स्वागत माध्यम केंद्राचे प्रमुख जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले. यावेळी एमसीएमसी समिती सदस्य व माध्यम कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.

 

राजकीय प्रचाराच्या जाहिरातींबाबत भारत निवडणूक आयोगाने नियमावली निश्चित केली आहे.या नियमावलीनुसार राजकीय पक्ष व उमेदवारांना दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क,केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल,रेडिओ,सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स,सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती,ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती,बल्क एसएमएस,रेकॉर्ड केलेले व्हॉईस मेसेजेस,सोशल मीडिया,इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस अगोदर वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती या माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एम.सी.एम.सी.) पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले असून हे काम गांभीर्याने करण्याचे त्यांनी सांगितले.

 

जाहिरात प्रसारित होण्याच्या 48 तास अगोदर राजकीय पक्ष,उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरात प्रमाणीकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करावा.अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवसापूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे.माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती अर्थात एम.सी.एम.सी समिती ही अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो अर्ज ४८ तासात निकाली काढेल.समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या २४ तासात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन निर्मित केलेली जाहिरात प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे.टिव्ही चॅनलद्वारे जाहिराती जर प्रसारीत करावयाच्या असतील तर अशा जाहिराती समितीकडे प्रसारणाच्या तीन दिवस अगोदर प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे.समिती याबाबत दोन दिवसात निर्णय देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

जाहिरात प्रमाणीकरणासाठीचा अर्ज हा विहित नमुन्यात सादर करावा. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव व पत्ता, उमेदवार किंवा पक्षाचे नाव किंवा सदर जाहिरात एखादी संस्था- ट्रस्ट- संघटना यांच्याकडून दिली जात असल्यास त्यांचे नाव,मतदारसंघाचे नाव,राजकीय पक्षाचे मुख्यालयाचा पत्ता,ज्या चॅनल/केबल नेटवर्कवर जाहिरात प्रसारित करायची आहे त्याबाबत स्पष्ट माहिती कोणत्या उमेदवाराच्या हितासाठी सदर जाहिरात करण्यात आली आहे, त्याबाबत माहिती,जाहिरात सादर करण्यात येत असल्याचा दिनांक, जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली भाषा,त्याच्या संहिता लेखनाच्या (ट्रास्‍कींप) साक्षाांकित दोन प्रती, जाहिरातीचे शिर्षक,जाहिरात निर्मितीचा खर्च,जाहिरात जर चॅनेलव्दारे प्रसारित केली जात असेल तर किती वेळा ती प्रसारित केली जाणार आहे,त्याचे प्रस्तावित केलेले दर,त्यासाठी लागलेला एकूण खर्च आदी माहिती अर्जदाराने निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित नमून्यात स्वाक्षरीसह सादर करणे आवश्यक आहे, या बाबी काटेकोरपणे लक्षात घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आदर्श आचारसंहितेनुसार दिलेल्या निर्देशाचे जाहिरातीमध्ये पालन होणे आवश्यक आहे.या प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचविणाऱ्या बाबी, धार्मिक भावना दुखावणे, भारतीय घटनेचा अवमान करणे, गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करणे,कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण,महिलांचे चुकीचे चित्रण, तंबाखूजन्य किंवा नशा आणणाऱ्या पदार्थाच्या जाहिराती, हुंडा,बालविवाह यांना उत्तेजन देणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. इतर देशावर टिका नसावी.न्यायालयाचा अवमान जाहिरातीतून होता कामा नये. राष्ट्रपती व न्याय संस्था यांच्याबाबत साशंकता नसावी.राष्ट्रीय एकात्मतेला, सौहार्दतेला आणि एकतेला बाधा पोहचविणारा मजकूर त्यामध्ये नसावा.सुरक्षा दलातील कोणतेही सैनिक,व्यक्ती,अधिकारी यांची अथवा सैन्य दलाचे छायाचित्र जाहिरातीत नसावे.कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी, वैयक्तिक जीवनातील घटनांना धरुन त्यावर भाष्य नसावे. व्हिडीओ व्हॅनद्वारे प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे साहित्य याचे माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे.या वाहनाची निवडणूक विभागाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्या संमतीशिवाय प्रचार करणाऱ्या जाहिराती देता येणार नाहीत.अनुमतीशिवाय जाहिराती प्रकाशित झाल्यास प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात येईल.मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर मुद्रीत माध्यमाद्वारे प्रकाशित करावयाची जाहिरात प्रमाणीकरणसाठी समितीकडे दोन दिवस आधी जाहिरातीसह अर्ज सादर करणे आवश्यक राहणार आहे.

 

पेड न्यूज हा प्रकार आदर्श आचारसंहितेची संलग्न आहे. सारख्या बातम्या येणार नाही याची काळजी घ्यावी. मात्र, त्याचा सारखेपणा तपासताना बातम्यांमध्ये बातमीतून उमेदवाराचा प्रचार आदर्श आचारसंहितेचा भंग याकडे लक्ष वेधावे. एखाद्या घटनेतील सारखेपणा पेड न्यूज होत नाही. त्यामुळे संपादकांनी देखील या काळात प्रत्येक बातमीवर संपादकीय संस्कार होईल याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन, त्यांनी केले.

0000







दि. 31 मार्च 2024

 वृत्त क्र. 293

 

पर्यावरणपूरक-इको फ्रेंडली मतदान केंद्रांची विष्णुपूरी येथे उभारणी

 

नांदेड दि. 31 : नांदेड लोकसभा मतदारसंघातील पर्यावरण पूरक अर्थात इको फ्रेंडली मतदार संघ म्हणून विष्णुपुरी केंद्र पुढे आले आहे. नैसर्गिक हिरवेपणा जपत या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. हे मतदान केंद्र सर्वांना आकर्षित करत आहे.

चुनाव का पर्व,देश का गर्व संकल्पनेतून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारत देशात सध्या सार्वत्रिक निवडणूकीची धूम सुरु आहे. भारत निवडणूक आयोगाने यंदा इकोफ्रेंडली मतदार, ग्रीन मतदार बुथ उभारणीसाठी सूचना दिली आहे. याच सूचनेच्या अनुपालनासाठी जिल्हा ग्रामीण स्विप कक्षाच्या प्रमुख तथा जि.प.नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि डॉ. सविता बिरगे,शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.हा.विष्णुपूरी प्रशालेने इकोफ्रेंडली मतदान बुथ तयार केले आहे. याचे प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी विकास माने,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 087 नांदेड दक्षिण तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड , डॉ सविता बिरगे, नितेशकुमार बोलेलू , नायब तहसीलदार, मकरंद भालेराव-महसूल सहाय्यक, स्वीप कक्ष सक्रिय सदस्य नांदेड दक्षिण राजेश कुलकर्णी व संजय भालके यांनी भेट दिली. संपूर्ण मतदान परिसर नैसर्गिक झावळ्यांनी,विविध रोपांनी,प्लास्टिक मुक्तपणे तयार केला आहे.

 

पाणी पिण्यासाठी मातीच्या भांड्यांची,मडक्याचा वापर केला आहे. ग्रीन मँट प्रवेशद्वारापासून अंथरली असून विविध फुलझाडांच्या कुंड्यांनी प्रवेश केला जात आहे. केळीची पान, पारंब्या, हिरव्या नारळाच्या झावळ्या उपयोगात आणल्यामुळे परिसर थंडगार व रमणीय आकर्षक झाला आहे. प्रात्यक्षिक मतदार म्हणून विलास देशमुख हंबर्डे, मारोती ग्यानबाराव हंबर्डे, बाबुराव नामदेवराव हंबर्डे यांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने भाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्ज्वला जाधव, शिवाजी वेदपाठक,कृष्णा बिरादार, दत्ता केंद्रे, संतोष देशमुख, आनंद वळगे,उदय हंबर्डे, विकास दिग्रसकर, चंद्रकला इदलगावे,अर्चना देशमुख, कांचनमाला पटवे, शैलजा बुरसे,प्रिती कंठके , एम.ए.खदीर , मारोती काकडे ,कावळे गुरुजी आणि सर्व शिक्षकवृंदांनी भरीव परिश्रम घेतले आहेत.

 

कर्मचाऱ्यांचे कौतुक 

नांदेड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक केंद्र वैविध्यपूर्ण ठरावे निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात याव्यात तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्देशित  केल्याप्रमाणे सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी प्रतीक्षालय तयार करण्यासाठी केंद्रप्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांनी तयार असावे अशी सूचना यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन मीनल करनवाल यांनी केली आहे. मतदान प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदान प्रक्रिया कालावधीत आपले मतदान केंद्र नीटनेटके स्वच्छ व व्यवस्थित राहील याकडे लक्ष वेधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. विष्णुपुरी येथे उभारण्यात आलेल्या या केंद्राला शुभेच्छा दिल्या असून जिल्ह्यात निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या पद्धतीने अशी वेगवेगळी केंद्र उभी करण्यात आघाडी घ्यावी असे आवाहन केले आहे.

00000













दि. 31 मार्च 2024

 वृत्त क्र. 292

 

सशक्त लोकशाहीसाठी मतदान करा

- मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल

 

नांदेड, 31 - मतदान प्रक्रियेप्रति आजचे युवक जागरूक व्हावेत तसेच त्यांनी राष्ट्राच्या विकासाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक युवतींना मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. मतदान शक्ती असून  तो एक देशसेवेचाच एक भाग आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

 

नांदेड येथील एमजीएम महाविद्यालयात रविवार दिनांक 30 मार्च रोजी  स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाचे संचालिका तथा प्राचार्या डॉ. गीता लाठकर, उपप्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे, पत्रकारिता माध्यमशात्र विभागाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी तसेच सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

 

पुढे त्या म्हणाल्या,  कोणत्याही नागरिकांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली तर त्याला मतदानाचा हक्क प्राप्त होतो. ज्यांनी 18 वर्षे पूर्ण केले परंतु अद्यापही मतदार यादीत नोंदणी केलेली नसेल तर त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करावी. येत्या 4 एप्रिल पर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे. सन 2019 च्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 65 टक्के मतदान झाले होते. परंतु 35 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही. राष्ट्रीय विकास व सशक्त लोकशाहीसाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व मतदारांनी मतदान करावे.

 

शिक्षणासाठी काही युवक शहरात आले असतील त्यांनी आपल्या गावी जाऊन 26 एप्रिल रोजी मतदान करावे. मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे. प्रत्येक युवक-युवतींनी  यादिवशी शंभर टक्के मतदान करुन बळकट लोकशाहीसाठी शक्ती दाखवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी उपस्थित तीन हजार विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सांगितले.

 

नांदेड सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघाच्या स्पीप (जनजागृती) साठी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ग्रामीण भागासाठी तर शहरी भागासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांच्याही मार्गदर्शनात नांदेड लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमांनी मतदानासाठी जनजागृती केली जात आहे.

000000









  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...