Tuesday, June 1, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 177 व्यक्ती कोरोना बाधित

5 जणाचा मृत्यू तर 281 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 179 अहवालापैकी  177 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 95 तर अँटिजेन तपासणीद्वारे 82अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 89 हजार 697 एवढी झाली असून यातील 86 हजार 137 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 187 रुग्ण उपचार घेत असून 34 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक  31 मे 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उमरी येथील 25 वर्षाचा पुरुष, अर्धापूर तालुक्यातील 77 वर्षाचा पुरुष, तर 1 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे बिलोली येथील 65 वर्षाची महिला तर सिडको नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, गाडीपुरा नांदेड येथील 65 वर्षाची महिला यांचा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 889 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 49, धर्माबाद 1, लोहा 2, तेलंगाना 1, नांदेड ग्रामीण 16, हदगाव 2, माहूर 3, हिंगोली 4, अर्धापूर 1, हिमायतनगर 3, मुखेड 3, यवतमाळ 2, भोकर 1, किनवट 2, उमरी 2, लातूर 3 तर  ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 40, हदगाव 2, नायगाव 2, परभणी3, नांदेड ग्रामीण 14, कंधार 4, वाशीम 1, लातूर 2, अर्धापूर 2, माहूर 2, उमरखेड 1, आदिलाबाद 2, देगलूर 2, मुखेड 4, हिंगोली 1, असे एकूण 177 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 281 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 4, किनवट कोविड रुग्णालय 7, माहूर तालुक्यातर्गंत 3, मुखेड कोविड रुग्णालय 4, कंधार तालुक्यातर्गंत 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 10, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 2, अर्धापूर तालुक्यातर्गत 1, हदगाव कोविड रुग्णालय 2, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 200, धर्माबाद कोविड केअर सेंटर 1, बिलोली तालुक्याअंतर्गत 3, उमरी तालुक्यातर्गत 1, खाजगी रुग्णालय 34 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 187 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 35, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 17, माहूर कोविड केअर सेंटर 17, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 20, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  9, देगलूर कोविड रुग्णालय 8,  नायगाव कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 2,  हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 5, भोकर कोविड केअर सेंटर 11,  एनआरआय कोविड केअर सेंटर 5, बिलोली कोविड केअर सेंटर  6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 702, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 253, खाजगी रुग्णालय 74 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 115 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 43 हजार 311

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 42  हजार 517

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 697

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 86 हजार 137

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 889

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.03 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-113

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-179

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 187

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-34

00000

 

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता

देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

बुधवार 2 जून 2021 रोजी परभणी येथून सायंकाळी 4 वा. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे आगमन. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोविड केंद्रास भेट. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचेसमवेत भेट व रात्री नांदेड येथे मुक्काम.

00000

 

जागतिक पर्यावरण दिनापासून

लोकसहभागातून वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेला आहे. मागील काही वर्षांपासून पर्यावरण जनजागृती आणि वृक्षलागवड यासाठी अनेक सेवाभावी संस्था शासनासमवेत पुढे आले आहेत. तथापि वृक्षलागवडीची चळवळ ही आता कोविड-19 पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन सारख्या प्रश्नापासून नव्या भूमिकेतून पुढे जाणे गरजेचे आहे. बदलते संदर्भ लक्षात घेत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चळवळ ही अधिकाधिक लोकसहभागातून प्रत्येकाच्या श्वासाशी निगडीत व्हावी यादृष्टिने येत्या 5 जून पासून संपूर्ण मराठवाडाभर राबविली जात आहे. अर्थात 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक नागरिकाने किमान 3 वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन मराठवाडा विभागाचे आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केले आहे. 

पर्यावरण संतूलनात लहान झूडपापासून मोठ्या वृक्षापर्यंत असलेली जैव विविधता, नदि, छोटे नाले, ओहोळ अर्थात नदिची परिसंस्था व या सर्वांचे तेवढेच महत्व असते. कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर ऑक्सिजनची निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा या आजाराने अप्रत्यक्ष प्रत्येक मानव जातीला निसर्गाकडे जबाबदारीने पाहण्याची व निसर्गाला आपल्याकडून पुन्हा काही वापस करण्याची संधी दिली आहे. मागील वर्षाच्या 30 जानेवारी पासून ते आतापर्यंत आपल्या देशात जवळपास 203 कोटी लोकांना बाधा होऊन गेली. यात 2.22 लाख लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. अजूनही 34 लाख 78 हजार लोकांवर उपचार सुरु आहेत. यातील कित्येकजण मृत्यूशी झूंज देत आहेत. 

हा आजार आपल्या श्वसनयंत्रणेवर, शरिरातल्या ऑक्सिजनवर घाला घालणारा ठरल्यामुळे पुन्हा एकदा प्राणवायुचे मोल व त्याची किंमत आपल्या लक्षात आली आहे. पहिल्या लाटेत देशाला 28 हजार मे. टन कृत्रिम प्राण वायुची गरज प्रतिदिन पर्यंत पोहचली होती. दुसऱ्या लाटेत हीच गरज 5 हजार मेट्रीक टनपर्यंत पोहचली. 

कृत्रिम वायु हा जो हवेत उपलब्ध आहे तोच गोळा केला जातो, निर्माण केला जातो. काही प्रमाणात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर वापर करुन स्थानिक पातळीवर थोडी बहुत गरज भागविली गेली. तथापि कृत्रिम माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती ही अप्रत्यक्ष खर्चिक व न परवडणारी आहे हे लक्षात आले. निसर्गात निर्माण होणारे ऑक्सीजन / प्राणवायु हा वृक्षाच्याच माध्यमातून होतो. झाड केवळ शोभा देत नाही तर निसर्गातील प्रदुर्षण शोषून घेवून हवेमध्ये प्राणवायु सोडण्याचे काम करतो. एका व्यक्तीला वर्षभरात जेवढा प्राणवायू लागतो तेवढा 7 ते 8 वृक्षांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. 

निसर्गाची ही देण लक्षात घेता प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवडीसाठी उर्त्स्फूत सहभाग घेवून येत्या 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने वृक्ष लागवडीच्या या महालोक सहभाग चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

00000

 

जिल्ह्यातील 94 केंद्रावर

कोविड-19 चे लसीकरण

उपलब्ध डोसप्रमाणे 45 वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 2 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको  या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, हैदरबाग,  शिवाजीनगर, कौठा, जंगमवाडी, दशमेश, श्रावस्तीनगर (विजयनगर)  व सिडको  या 11 केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 150 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे कोव्हॅक्सीनचे 70 डोस, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर तर ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

जिल्ह्यात 31 मे पर्यंत एकुण 4 लाख 29 हजार 362 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 1 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 2 हजार 630 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 19 हजार 940 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 22 हजार 570 डोस प्राप्त झाले आहेत.

 

हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

000000

 

पिकस्पर्धा खरीप हंगाम 2021 चे आयोजन 

 नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागातील शेतकरी अनेक प्रयोग करुन उत्पादकतेत वाढ करतात. याबाबत शेतकऱ्यांना प्रत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादकतेत भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन जिल्ह्याच्या एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवुन जिल्हयात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासुन पुर्वीच्या पिकस्पर्धच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे. 

सध्याच्या पिकस्पर्धेतील महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी पिकस्पर्धेतील समाविष्ट  पिके यात भात, ज्वारी, मका, नाचणी (रागी) तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल असे एकुण 11 पिके आहेत.

प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 आदिवासी गटासाठी 5 एवढी आहे. पिकस्पर्धा मध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग नागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबंधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. 

तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या ही सर्वसाधारण गटासाठी 5 आदिवासी गटासाठी 4  एवढी आहे. स्पर्धत भाग घेणा-या शेतक-र्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी पिकस्पर्धे सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क  सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये राहिल. 

अर्ज दाखल करण्याची तारीख  मुग उडीद पीकासाठी 31 जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग सुर्यफुल पिकासाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत राहिल. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या स्पर्धकांचे अर्ज विहीत नुमन्यामध्ये भरुन त्यासोबत ठरवुन दिलेले प्रवेश शुल्क चलन, सात-बारा, 8-अचा उतारा जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पुर्तता करुन तालुका कार्यालयात द्यावे. 

पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप हे तालुका पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसे रुपये पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये तर तिसरे 2 हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसचे बक्षिस 5 हजार रुपये एवढे राहिल. पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या WWW.Krishi.maharashtra. Gov.in या संकेतस्थ्ळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहाय्य्क, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रब्बी हंगाम 2020  मध्ये  पिकस्पर्धेसाठी जिल्हायातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास् शेतक-यांनी मुग उडीद पिकांसाठी 31 जुलै पुर्वी तर इतर खरीप  पिकांसाठी  31 ऑगस्  पुर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन   आर. टी. सुखदेव उप विभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी सर्व शेतक-यांना केले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...