Tuesday, November 16, 2021

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड जिल्ह्यात 2  व्यक्ती कोरोना बाधित

तर 4 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 681 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 445 एवढी झाली असून यातील 87 हजार 770 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 व ॲटीजन तपासणीद्वारे हिंगोली 1असे एकुण 2  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 4  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 4 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 22 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, खाजगी रुग्णालयात 3 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 65 हजार 241

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 61 हजार 402

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 445

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 770

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 

धार्मिक व प्रार्थना स्थळांना ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांना प्रवेशास मुभा

 

धार्मिक व प्रार्थना स्थळांना

ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांना

प्रवेशास मुभा

ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हादंडाधिकारी यांचे अटी व शर्तीनुसार आदेश निर्गमित

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  कोविड-19 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपायांसह धार्मिक आणि प्रार्थनास्थळे याठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी प्रवेश देण्याबाबत ब्रेक द चेन अंतर्गत मुभा देण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत आदेश निर्गमित केले.

 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील तरतुदी व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदी अन्वये जेष्ठ नागरीक व गरोदर महिलांना यापुर्वी प्रवेशास बंदी होती. आता नवीन आदेशान्वये ज्यांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेनंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत. अशा 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक व गरोदर महिलांना सुध्दा धार्मिक व प्रार्थना स्थळांना भेट देण्याची मुभा दिली आहे. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या क्षेत्रात प्रवेश करताना मुख आवरण (मास्क) घालणे, शारिरीक अंतर राखणे, (थर्मलस्कॅनिंग) व हात धुणे किंवा रोगाणुरोधक यंत्र अनिवार्य आहे. याशिवाय कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाय योजनांवर प्रमाणित कार्यचालन, कार्यपध्दती शासनाच्या आदेशातील अटी व शर्ती लागू राहतील.

 

या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. आदेशाचे काटेकोर अंमलबजावनी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसे नागरी भागात संबंधित आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत मुख्याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहील. हे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 16 नोव्हेंबर रोजी निर्गमित केले आहेत.

0000

निर्लेखित फर्निचर व साहित्यांची विक्री

 

निर्लेखित फर्निचर व साहित्यांची विक्री

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगाव कार्यालयात निर्लेखित केलेल्या फर्निचर व साहित्यांची विक्री निविदा पध्दतीने करण्यात येणार आहे. यासाठी नोंदणीकृत भंगार खरेदीदाराकडून निविदा मागविण्यात येत आहेत.  या निविदा 17 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 सकाळी 10 ते सायं 5 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून स्विकृत करण्यात येतील . विक्री करावयाचे साहित्य 17 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 सकाळी 10 ते सायं 5 या कालावधीत पाहता येईल. इच्छूक खरेदीदारांनी या संस्थेस भेट द्यावी.अधिक माहितीसाठी निविदेच्या अटी व शर्ती बाबतची माहिती भांडार विभागात पाहावयास मिळेल, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगावचे  प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा-2021 परीक्षा रविवार  21 नोव्हेंबर 2021 रोजी ही दोन सत्रात जिल्ह्यात 57 परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 4.30  या वेळेत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.  

या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात रविवार 21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता  येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वणी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

00000

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144

नांदेड, दि. (जिमाका) 16 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 नोव्हेंबर 2021  पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 नोव्हेंबर 2021  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 डिसेंबर 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी घोषित केले आहे.

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...