Wednesday, June 6, 2018

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. 6:शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून काही कारणाने अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत सहभागाची मुदत आता 15 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
राज्यातील थकित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत ऐतिहासिक व पारदर्शक कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 या कालावधीत थकबाकीदार असलेल्या परंतु 2008 आणि 2009 च्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती. तसेच 2001 ते 2016 या कालावधीत इमूपालन, शेडनेट आणि पॉलिहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काही कारणाने आतापर्यंत अर्ज करता आले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच 30 जून 2018 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
-----000-----

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...