Monday, October 25, 2021

ब्रेक द चेन- सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमीत

 

ब्रेक द चेन- सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमीत

नांदेड, (जिमाका) दि. 25 :- साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील तरतूदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना 14 मार्च 2020 अन्वये प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहेत त्या कारणासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून  तसेच फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात रेस्‍टॉरंट आणि भोजनालय व इतर आस्थापना उघडण्यासाठी  पुढीलप्रमाणे सुधारित मार्गदर्शक सूचना आदेश निर्गमीत केले आहेत.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 चे नियम 10 व 11 अन्वये इतर सर्व अस्थापना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 चे नियम 19 अन्वये हॉटेल, रेस्टॉरेंटस व भोजनालय रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. पुढील आदेश निर्गमित होईपर्यत हा आदेश लागू राहणार आहे.आस्थपनांच्या अधिनस्त कर्मचारी, मालक, चालक, व्यवस्थापक सेवा पुरवठादार  यांनी कोविड 19 चे दोन्ही डोस  घेणे बंधनकारक आहे तसेच दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.वेळोवेळी ब्रेक द चेन आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.पालन न करणाऱ्या नागरिकांना भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील.आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच शहरी भागात आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका पंचायत मुख्याधिकारी यांची राहील.आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांचे विरूध्द कार्यवाही केली जाणार नाही.या सर्व प्रक्रियेवनियंत्रण ठेवण्याची जबाबदारी Incident Commander) उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांची राहिल. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 22 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमीत केले आहेत.

0000

 

 

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार

 

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार

नांदेड, (जिमाका) 25 : 90 देगलूर बिलेांली विधानसभेची पोटनिवडणूक दिनांक 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाला 30 ऑक्टोबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे.तसेच मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 प्रमाणे देगलूर विधानसभा क्षेत्रात भरणारे सर्व आठवडी बाजार 30 ऑक्टोबर रोजी बंद राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

देगलूर या गावातील भरणारे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सुरू राहतील.

0000

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाला बरा

 

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाला बरा

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 519 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2  तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 377 एवढी झाली असून यातील 87 हजार 700 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, असे एकूण 2  बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1  व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 25 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 20 अशा एकूण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 50 हजार 864

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 47 हजार 252

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 377

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 700

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-06

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

 महिला संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती अनिवार्य 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- महिलाचे संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नुसार प्रत्येक कार्यालयीन / कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुर्वी अशा समित्या काही कार्यालयाने स्थापन केल्या आहेत त्या अद्यावत कराव्यात. या अंतर्गंतची तक्रार समिती गठीत करुन त्याचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास iccdwcdned@gmail.com या ई-मेलवर उपलब्ध करुन देण्यात यावाअसे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अब्दूल रशिद शेख यांनी केले आहे.   

शासकीयनिमशासकीयखाजगी कार्यालयेसंघटनाशासन अनुदानित संस्थामहामंडळेआस्थापना संस्थाज्याची शासनाने स्थापना केली असेल किंवा नियंत्रणाखाली असेल किंवा पुर्ण किंवा अंशत: प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निधी शासनामार्फत किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनीनगरपरिषदसहकारी संस्था किंवा कोणत्याही खाजगी क्षेत्र कंपनी किंवा खाजगी उपक्रमसंस्थाइंटरप्रायजेसअशासकीय संघटना सोसायटी ट्रस्टउत्पादकपुरवठावितरण व विक्री यासह वाणिज्य व्यावसायिकशैक्षणिककरमणूकऔद्योगिक इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादाररुग्णालयेसुश्रुषालयेक्रिडा संस्थाप्रेक्षागृहे इत्यादी ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक आहे. ज्या आस्थापनेवर 10 किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी असतील अशा कार्यालयीन किंवा कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी स्वंतत्र अधिनियम करण्यात आले आहे. 

अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखादया मालकाने () अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही. () अधिनियमातील कलम 13,14,22 नुसार कारवाई केली नाही () या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदारीचे पालन न केल्यास 50 हजार रुपयापर्यत दंड होईल तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास लायसन्स रद्ददुप्पट दंड अशी तरतूद आहेअसे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...