Thursday, November 11, 2021

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 751 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 431 एवढी झाली असून यातील 87 हजार 775 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे मुखेड तालुक्यातर्गत 1 असे एकुण 1 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात कंधार तालुक्यातर्गत 2, खाजगी रुग्णालय 2 अशा एकूण 4 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 10, खाजगी रुग्णालय 5 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 60 हजार 992

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 57 हजार 183

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 431

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 755

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळांडूनी कामगिरी प्रमाणित करुन घेण्यासाठी अर्ज करावेत

 

शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळांडूनी

कामगिरी प्रमाणित करुन घेण्यासाठी अर्ज करावेत

नांदेड (जिमाका) दि. 11 :- भारतीय डाक विभागाद्वारा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आला आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या इच्छूक खेळाडूनी त्यांची कामगिरी प्रमाणित करुन घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात बुधवार 17 नोव्हेंबर 2021 पुर्वी कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्राच्या छायाकिंत प्रतिसह परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

या जाहिरातीमध्ये विविध खेळ प्रकारामध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करुन सहभाग अथवा प्राविण्यासह प्राप्त केलेले खेळाडू या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. अधिक माहितीसाठी भारतीय डाक विभागाची प्रसिध्द करण्यात आलेली जाहिरात पहावी.

0000

नवीन तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 

नवीन तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी

नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  जिल्ह्यात महा-रेशीम अभियान 2022 हे दिनांक 25 नोव्हेंबर 2021 पर्यत राबविण्यात येत आहे. सन 2022-23 मध्ये समुहाने मनरेगा योजनेतर्गंत तसेच वैयक्तीक नविन तुती लागवडीसाठी उत्सुक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. नोंदणीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, नवा मोंढा नांदेड कार्यालयास संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02462-284291 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाचे रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

0000

प्रवासी वाहतूकीबाबत तक्रार असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयास संपर्क करावा

 

प्रवासी वाहतूकीबाबत तक्रार असल्यास

प्रादेशिक परिवहन कार्यालयास संपर्क करावा

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने विविध मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. जिल्हयात संप काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी  खाजगी बस, स्कूल बस, मालवाहू वाहनमध्ये प्रवासी वाहतुक करण्याबाबत मुभा देण्यात आली आहे. याबाबत काही तक्रार असल्यास कार्यालयाचे दूरध्वनी क्र.02462-259900 / mh26@mahatranscom.in यावर ईमेल करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राउत यांनी केले आहे.

गृह विभाग (परिवहन) यांच्या 8 नोव्हेंबर 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व खाजगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बसेस मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता दिली आहे. जिल्हयातील प्रवासी वाहतुक सुरळीत होण्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या बस, स्कुल बस संघटनाच्या प्रतिनीधीची बैठक 9 नोव्हेंबर 2021 रोजी परिवहन कार्यालयात आयोजीत करुन सर्व घटनाच्या प्रतिनिधीना खाजगी बस उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश दिले.  जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधुन राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत या कार्यालयाने केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

संपकालावधीमध्ये जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रादेशिक परिहवन कार्यालयात 24 तास नियंत्रणकक्ष स्थापन करण्यात आला आहे. कार्यालयातील वायुवेग पथकाचे अधिकारी विविध तालुक्यातील डेपोला भेट देवून प्रवाशांना उदघोषकानी (Loud Spicker) माहिती सांगून खाजगी बसेस इतर वाहनांच्या केलेल्या सुविधाबाबत माहिती देत आहेत.

वायुवेगपथकामार्फत खाजगी बस वाहनांची तपासणी करुन जादा भाडे आकारणी इतर सुविधाबाबत प्रवाशाकडुन माहीती घेत आहेत. या कार्यालयातील वायुवेगपथकाव्दारे  हिंगोली गेट ,बाफना पाँईट , एस.टी.स्टॅड बाहेर तसेच जिल्हयातील विविध डेपो जवळ खाजगी प्रवासी वाहने उपलब्द करुन देण्यात आली आहेत.अशा प्रकारची एकूण 158 खाजगी बस,स्कुलबस, इतर खाजगी वाहने उपलब् करुन देण्यात आली आहेत परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गंत किनवट येथे शासकीय योजनाचा महामेळावा

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गंत

किनवट येथे शासकीय योजनाचा महामेळावा

कायदेविषयक साक्षरतेवरही विशेष भर

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या आदिवासी किनवट तालुक्यात आझादी का अमृत महोत्सवांतर्गंत वैशिष्टपूर्ण कायदेविषयक साक्षरतेचा जागर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या कालावधीमध्ये मांडवी येथे लोकाभिमूख ठरणाऱ्या या उपक्रमात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना तिथल्या तिथेच लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या महामेळाव्याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल. आणेकर,  जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर (घुगे), जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तीकुमार पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र एस. रोटे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर किनवट शंकर अंभोरे, सहदिवाणी न्यायाधीश विजय परवारे, तालुका दंडाधिकारी मृणाल जाधव व जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमूख उपस्थित राहणार आहेत.

 

गत दोन वर्षात कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर तालुक्यासह किनवट तालुक्यातील आदिवासी बांधवानीही आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळून आरोग्याची काळजी घेतली. तथापि या कालावधीत निर्माण झालेली इतर वैद्यकीय अडचणी, प्रशासकीय पातळीवर करावयाची कामे यांचा विचार करुन हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. अनेक शासकीय योजना या कायदेविषयक जबाबदारीशी सुसंगत असल्याने योजनासह कायदेविषयक साक्षरतेला चालना मिळावी यादृष्टीने जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या वतीने 2 ऑक्टोंबर पासून विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ही चळवळ राबविली जात असून मांडवी येथे या महामेळाव्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवापर्यत विविध योजना या पोहचविल्या जात आहेत.

 

या महामेळाव्यात 75 स्टॉलमध्ये आरोग्य सेवेसह आरटीओ कार्यालय, पोलीस विभाग, महसूल विभाग आदि संबंधित विभागाशी कुणाचे निगडित प्रश्न असतील तर तेही मार्गी लावण्याचे नियोजन केले आहे. याचबरोबर वैद्यकीय तपासणी,  कोवीडचे लसीकरण, रक्तदान शिबीरही आयोजीत करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेतर्गत असणारे शिक्षण, आरोग्य, कृषि, पशुधन विकास, बाल विकास प्रकल्प, पाणी पुरवठा व बांधकाम विभाग, आदिवासी विकास, भूमि अभिलेख,  बचतगट ग्राहक सल्ला आदी विविध प्रकारचे स्टॉल्स यात असतील. मांडवी परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र एस. रोटे यांनी केले आहे.

00000

 

 

 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...