Tuesday, January 21, 2020


निवघा येथे शेतीशाळा संपन्न
नांदेड, दि. 21 :- मुदखेड तालुक्यातील निवघा येथे हरभरा पिकावरील शेतीशाळा माधव पवार यांच्या शेतात नुकतीच आयोजीत करण्यात आली होती. या शेतीशाळेस नांदेडचे उपविभागीय कृषि अधीकारी   आर. टी. सुखदेव, मुदखेड तालुका कृषी अधीकारी आर. एन. शर्मा, कृषी पर्यवेक्षक यु. के. माने, कृषी सहाय्यक  ए. एन. कंचटवार व मुख्य प्रवर्तक जी.पी.वाघोळे, कृषी पर्यवेक्षक बारड व शेतकरी उपस्थीत होते.
            या शेतीशाळेत शेतकऱ्यांच्यावतीने अशोक पवार यांनी 5 टक्के निंबोळी अर्क कसे करावे व उपयोग याविषयी सविस्तर माहिती दिली. घाटेअळीचे सर्व्हेक्षण व नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे व पक्षी थांबे यांच्या उपयोगाचे महत्व नवनाथ शिंदे या शेतकरी बांधवाने सांगीतले. तिरुपती पवार यांनी हरभरा ‍बियाण्यावर बिजप्रक्रिया कशी करावी याविषयी माहिती दिली. बिज प्रक्रिया केल्यामुळे हरभरा पिकात मररोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळुन येतो व पिकाची उगवण, वाढ चांगली होते या विषयी सांगीतले.
            उपविभागीय कृषी अधीकारी आर. टी. सुखदेव यांनी शेतीशाळे बद्दल समाधान व्यक्त करताना कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत माहीती दिली. तसेच हरभरा पिक हे सिंचनास अतिसंवेदनशिल असल्यामुळे रुंद सरीचा वापर तसेच तुषार संचाद्वारे सिंचन करावे व योजनांचा फायदा घ्यावा. घाटेअळीने आर्थीक नुकसान पातळी ओलांडली असल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के 30 मिली प्रती 10‍ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करण्याचे  व मररोग आढळुन येत असल्यास कार्बेन्डॅझीमची आळवणी करण्या विषयी सांगीतले.
मुख्य प्रवर्तक जी.पी.वाघोळे यांनी शेतीशाळेत किटकनाशकाचे मानवी शरीरावर होणारे दुष्परीणाम व त्यापासुन संरक्षण करण्या‍विषयीचे तसेच फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.
            निवघा येथील प्रगतशील शेतकरी उध्दवराव पवार यांनी शेतीशाळे विषयी समाधान व्यक्त करतांना शासनाच्या  विविध योजनांच्या लाभ घेउन शेतकऱ्यांनी स्वत:ची उन्नती करावी व हरभरा पिकात तुषार संचाव्दारे सिंचन करावे असे आवाहन केले. निवघा येथील कृषी सहाय्यक ए. एन. कंचटवार यांनी शेतीशाळेस उपस्थीत सर्व शेतकरी व अधीकारी वर्गाचे आभार मानले. 
00000

पिडीत निर्भयास
शासनाकडून आर्थिक सहाय्य
नांदेड, दि. 21 :- बिलोली तालुक्यातील नुकत्याच घडलेल्या दुर्देवी सामूहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत निर्भयास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर  यांनी तत्परतेने  अनु.जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार देय असलेले अर्थसहाय्य 4 लाख 12 हजार रुपये तात्काळ मंजुर करुन प्रदान करण्यात आले.
या अर्थसहाय्याचा धनादेश समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपअधिष्ठता वाय.एच चव्हाण  सहा. पोलिस निरिक्षक साईप्रकाश चन्ना, श्रीमती माधवी राठोड, समाज कल्याण निरिक्षक आणि कपिल जेटलावार उपस्थित होते.
00000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...