Thursday, June 25, 2020


वृत्त क्र. 573   
कोरोनातून 19 व्यक्ती झाले बरे
नवीन 5 व्यक्ती बाधित  
नांदेड (जिमाका) दि. 25 :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 19 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 331 बाधितांपैकी एकूण 267  व्यक्ती कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  बुधवार 25 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 36 अहवालापैकी 31 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात नवीन 5 व्यक्ती बाधित आढळले.  
नवीन बाधितांमध्ये विसावानगर येथील 17 वर्षाचा 1 पुरुष, कंधार तालुक्यातील चिखलभोसी  येथील 26 वर्षाचा 1 पुरुष, 19  व 26  वर्षाच्या दोन महिला, देगलूर येथील 59 वर्षाची महिला या बाधितांचा समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.  
पन्नास बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील 5 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. वय 50  55 वर्षाच्या दोन स्त्री बाधित व 38,65 व 75  वर्षाचे तीन बाधित पुरुषांचा यात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 50  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 13, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 32 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1  बाधित व्यक्ती उपचार घेत असून 3 बाधित  औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. गुरुवार 25 जून रोजी 122  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 381,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 981,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 170,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 05,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 331,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 14,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 267,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 50,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 122 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 572


 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा  
नांदेड (जिमाका) दि. 25 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 26 जून 2020 रोजी मुंबई येथून दुपारी 12 वा. खाजगी विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व नांदेड येथे मुक्काम.
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...