Wednesday, January 18, 2023

वृत्त क्रमांक 30

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

फिरते पथक व व्हिडीओ देखरेख पथकाला

विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- 05-औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 अनुषंगाने नियुक्त केलेले फिरते पथक व व्हिडीओ देखरेख पथकाला शासनाने 11 जानेवारी 2023 रोजीच्या अधिसूचनेद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 21 नुसार विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. या संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खालील अधिकार प्रदान केले आहेत.

 

याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशासोबत संलग्न केलेल्या यादीनुसार निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले फिरते पथक संख्या-32 व व्हिडिओ देखरेख पथक संख्या-32 यांना निवडणूक कालावधीपर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. अशाप्रकारे नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खालील अधिकार प्रदान केले आहेत. हे आदेश पुर्वलक्षी प्रभावाने अधिसुचना प्रसिद्ध झालेला दिनांक 11 जानेवारी 2023 पासून अंमलात राहतील, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 29

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार

मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी दक्षता घ्यावी

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

§   औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीबाबत दुसरे प्रशिक्षण संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 18 :-05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रीयेत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी  भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दक्षता घेवून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. 


05-औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदान प्रक्रीयेत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी  करावयाच्या प्रक्रियेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे दुसरे प्रशिक्षण संपन्न झाले.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरीउप जिल्हाधिकारी (निवडणूक) संतोषी देवकुळे, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसिलदार राम बोरगावकर व  निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व तालुक्याचे अधिकारीकर्मचारी यांची उपस्थिती होती.


ही निवडणूक जिल्ह्यातील 30 मतदान केंद्रावर होत असून यासाठी प्रत्येक केंद्रावर 4 याप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. ही निवडणूक प्रक्रीया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशिवाय होत आहे. मतपत्रिका व बॅलेट नुसार ही निवडणूक प्रक्रीया होत असल्याने निवडणूक कामात नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी काळजीपुर्वक कामकाज करावे असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. तसेच निवडणूकीत मतदारांना ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्राबाबत यावेळी माहिती दिली.


या निवडणूक प्रक्रीयेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी निवडणूकीच्या एक दिवस अगोदरपासून ते मतदान प्रक्रिया संपूर्ण होईपर्यत करावयाच्या कर्तव्याबाबत तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी मतदानाची पध्दत, मतदान पध्दतीबाबत मार्गदर्शक सूचना, कर्तव्ये व जबाबदाऱ्या यासह मतपेट्या उघडणे, बंद करणे, सीलबंद करणे, कागदी सील, मतपत्रिका व मतदान याद्या तपासणी, मतदानाच्या दिवशी अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक साहित्य ताब्यात घेताना घावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.


तसेच मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाची आकडेवारी दर दोन तासांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक राहील.  मतदान सुरु होण्यापूर्वी तसेच मतदान संपल्यानंतर मतपेटी व इतर मतदानाचे साहित्य हाताळण्याबाबत चे प्रात्यक्षिक यावेळी करुन दाखविले. या प्रशिक्षणास अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतपेटी हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र वितरीत केले.

0000







वृत्त क्रमांक 27

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे /

चिन्हांचे कापडी फलकेभाषण देण्यावर निर्बंध

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत  यांनी सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे / चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यावर प्रतिबंधित केले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी शनिवार 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 28

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

मतदान केंद्राची अंतिम यादी गुरुवारी होणार प्रसिद्ध

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुक 2023 साठी निश्चित करण्यात आलेली मतदान केंद्राची अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर व संबंधित कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी  प्रसिद्ध  होणार आहेअसे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...