Thursday, September 22, 2016

राष्ट्रीय स्वच्छता मोहिम 25 सप्टेंबर ते
11 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार
नांदेड, दि. 22 :- स्व. पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या 25 सप्टेंबर 2016 रोजीच्या जयंती दिनापासून 11 ऑक्टोंबर 2016 या जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीदिनापर्यंत राष्ट्रीय स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी असे केंद्र शासनाने कळविले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी पंतप्रधान महोदयांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करुन 2 ऑक्टोंबर 2014 पासून देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यास एक वर्षे पूर्ण होत असल्याच्या अनुषंगाने या अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने लोकांच्या वर्तणुकीत चिरस्थायी बदल करण्यास्तव व्यापक जनजागृती करण्यासाठी एक राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यास अनुसरुन ही मोहीम राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये रविवार 25 सप्टेंबर ते मंगळवार 11 ऑक्टोंबर 2016 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
तसेच राष्ट्रीय स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असताना अभियानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वॉकेथॉन स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, पथनाट्य, पदयात्रा, संगीत व निबंध स्पर्धा, चर्चासत्र, प्रदर्शन, स्वच्छताविषयक इतर सामुदायीक उपक्रम आयोजित करण्यात यावेत. रेडीओ, टिव्ही, वृत्तपत्रे इत्यादी जनसंपर्क माध्यमाचा इंटरनेट मोबाईल इत्यादी डिजीटल माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शासनाच्या दि. 23 सप्टेंबर 2015 रोजीच्या परिपत्रकाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संकेतांक 201509231616296525 असा आहे. संबंधितांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हा प्रशासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नांदेड यांनी केल्या आहेत.
0000000
जप्त केलेल्या रेतीसाठ्याच्या तिसऱ्या फेरीचा   
तहसिल कार्यालयात आज लिलाव
 नांदेड दि. 22 -  नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून 40 ठिकाणचा अंदाजे 17 हजार 136 ब्रास रेतीसाठा जप्‍त करण्यात आला असून या रेती साठ्याचा तिसरी फेरी लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली शुक्रवार 23 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 3 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
इच्छुकांनी नांदेड तालुक्यातील स्थळाचे ठिकाण असलेला रेतीसाठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000
ओटिएसपी योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी
प्रस्ताव सादर करण्यास 30 सप्टेंबर मुदतवाढ
           नांदेड, दि. 22 :-  सन 2016-17 या वर्षामध्ये ओटिएसपी (आदिवासी) योजनेअंतर्गत नवीन विहिर व इतरबाब घटकांचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी कार्यालयात सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधितांनी परिपूर्ण अर्ज शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 पर्यंत पंचायत समिती स्तरावर सादर करावेत, असे आवाहन उपाध्यक्ष तथा सभापती कृषि समिती जिल्हा परिषद नांदेड व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषि‍ विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

000000
जिल्ह्यात दिवसभरात
सरासरी 16.96 मि.मी. पाऊस   
           नांदेड, दि. 22 :- जिल्ह्यात  गुरुवार 22 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 271.38 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 16.96 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 846.49 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची  टक्केवारी  88.59 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात गुरुवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 15.63 (932.39), मुदखेड- 7.67 (667.69), अर्धापूर- 4.67 (896.33) , भोकर- 14.75 (1045.75), उमरी- 12.00 (731.60), कंधार- 23.17 (749.31), लोहा- 20.33 (975.00), किनवट- 24.29 (900.89), माहूर- 0.25 (1108.75), हदगाव- 3.29 (958.26), हिमायतनगर- 14.33 (842.31), देगलूर- 23.17 (619.68), बिलोली- 33.00 (853.00), धर्माबाद- 22.00 (717.05), नायगाव- 21.40 (762.60), मुखेड- 31.43 (783.27) आज  अखेर  पावसाची सरासरी 846.49  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 13543.88) मिलीमीटर आहे. 

00000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...