Wednesday, February 14, 2024

वृत्त क्र. 130

 आजपासून नांदेडच्या महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ

·         जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस कवायत मैदानाची पाहणी

·         प्रवेश निःशुल्क कुटुंबासह महासंस्कृती महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

·         शिवकालीन विविध मैदानी खेळाचा सकाळी १० ला प्रारंभ  

नांदेड (जिमाका) दि. 14 :- शिवकालीन विविध मैदानी खेळांचा सहभाग असणारा नांदेडचा महासंस्कृती महोत्सव उद्यापासून सुरू होणार आहे. आपले वेगळेपण जपणारा हा महोत्सव राज्यातील लोकप्रिय कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. प्रवेश नि:शुल्क आहे. त्यामुळे कलाक्रीडासांस्कृतिक कार्यक्रमाच्या पाच दिवसाचे साक्षीदार होण्याचे निमंत्रण जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिले आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने नांदेड येथे 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराजपर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उदया 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

राज्याचे ग्रामविकासपंचायत राजपर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहभागातून या महोत्सवाचे आयोजन होत आहे.

या महासंस्कृती महोत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. या महासंस्कृती महोत्सव पूर्वतयारीच्या अनुषंगाने नियोजन भवन येथे आज बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदेउपविभागीय अधिकारी विकास मानेउपविभागीय अधिकारी अरुणा संगेवारप्रकल्प संचालक संजय तुबाकलेउपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटीलउपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसेजिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुलेप्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगेसहायक आयुक्त रेणूका तम्मलवार व विविध विभागाचे अधिकारी व समिती सदस्य आदीची उपस्थिती होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदानस्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनतसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती इ. बाबी जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पोलीस कवायत मैदानाची पाहणी केली.

सिने व नाट्य कलावंताचा सहभाग

या महासंस्कृती महोत्सवात शिवकालिन व पारंपारिक मैदानी खेळविविध स्पर्धागीतनृत्यलोकगीतआदिवासीचे पारंपारिक लोकनृत्याचे प्रकार इत्यादीची रसिकांना अनुभूती मिळणार आहे. तसेच सुप्रसिध्द सिने व नाटय कलाकारांचा सहभाग या महोत्सवात असणार आहे. *शिवकालीन मैदानी खेळ वैशिष्ट्य* आज प्रारंभ होणाऱ्या या महासंस्कृती महोत्सवात दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते या कालावधीत शिवकालिन विविध मैदानी खेळांचे आयोजन पोलीस कवायत मैदानपोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मागे करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांना याचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

प्रवेश नि:शुल्क 

महासंस्कृती महोत्सवासाठी सर्व कार्यक्रम स्थळी प्रवेश निशुल्क आहे. प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कुटुंबासह यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आजचे कार्यक्रम

महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस कवायत मैदानावरील शिवकालीन व पारंपारिक मैदानी खेळाणे होणार आहे. खो -खो,कबड्डीलेझीमकुस्तीमलखांबआट्यापाट्याघुंगुर काठीलाठी-काठीरस्सीखेचगतकालगोरी इत्यादी विविध खेळांचे प्रात्यक्षिक स्पर्धात्मक स्वरूपात होणार आहे.नागरिकांनी यासाठी उपस्थित राहावेअसे आवाहन करण्यात आले आहे. 16,17, 18 फेब्रुवारी रोजी रात्री सहा ते दहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

00000








वृत्त क्र. 129

 अनुकंपा नियुक्ती ची तात्पुरती प्रतीक्षा सूची संकेतस्थळावर प्रसिध्द

·         26 फेब्रुवारी पर्यंत हरकती सादर करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 14 :- शासन सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट-अ ते गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील पात्र वारसास त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती ची योजना कार्यान्वित आहे. या योजनेतर्गंत नांदेड जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्याच्या ज्या वारसांनी 31 डिसेंबर 2023 अखेर जिल्हा परिषदेकडे विहित प्रस्ताव सादर केलेले आहेतअशाच उमेदवारांचे प्रस्ताव शासन निर्णयातील तरतुदीनुसार व अर्जासोबत सादर केलेल्या परिपूर्ण कागदपत्रांच्या पडताळणीनुसार प्रतीक्षासूचीमध्ये नाव समाविष्ट करुन तात्पुरती प्रतीक्षासूची जिल्हा परिषदेच्या www.zpnanded.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार ज्या उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज सादर केलेले आहेत. अशा उमेदवारांची पात्र प्रतीक्षासूची व ज्या उमेदवारांनी अपूर्ण प्रस्ताव सादर केलेले आहेतअशा उमेदवारांची अपूर्ण यादीतील प्रतीक्षासूचीचे अवलोकन उमेदवारांनी करावे. तसेच त्यांच्या नावासमोरील माहितीबाबत काही आक्षेप वा हरकती असल्यास तसेच ज्या उमेदवारांची नावे या प्रतीक्षासूचीमध्ये समाविष्ट झाली नसल्यास अशा उमेदवारांनी त्याच्या हरकती 26 फेब्रुवारी 2024 पर्यत कागदोपत्री पुराव्यासह कार्यालयाकडे समक्ष सादर करावी. तात्पुरत्या प्रतीक्षासूचीबाबत विहित मुदतीत प्राप्त झालेल्या हरकती आक्षेपाची छाननी करुनतात्पुरती प्रतीक्षा सूची अंतिम करुन त्यानुसार अनुकंपा पदभरतीबाबत पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकतीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावीअसे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

 00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...